Thursday, 9 April 2026

Reflections for the homily of Second Sunday of Easter (12/04/2026) by Fr. Benjamin Alphonso 


पुनरुत्थान काळातील दुसरा रविवार

दैवी दयेचा रविवार

दिनांक: १२/०४/२०२६
पहिले वाचन:  प्रेषितांची कृत्ये २:४२-४७.
दुसरे वाचन: १ पेत्र १:३-९.
शुभवर्तमान:  योहान २०:१९-३१.


प्रस्तावना

आपला देव प्रेमळ, दयाळू व क्षमाशील आहे. आज पुनरुत्थान काळातील दुसरा रविवार आहे तसेच आजचा रविवार दैवी दयेचा रविवार म्हणून साजरा केला जातो. संत पोप जॉन पॉल दुसरे ह्यांनी सिस्टर मारिया फॉस्टीना ह्यांना २००० साली संत म्हणून घोषित केले. सिस्टर फॉस्टीना फक्त ३३ वर्ष जगल्या. प्रभू येशने त्यांना अनेक वेळा दर्शन देऊन देव दयाळू व क्षमाशील आहे असा संदेश दिला व ही गोष्ट लोकांपर्यंत पोहोचावी असे सांगितले. आजची तिन्ही वाचणे सुद्धा आपल्याला देवावरील विश्वास व देवीची दया ह्याविषयी प्रचिती देत आहे.

आजचे पहिले वाचन प्रेषितांची कृत्ये या पुस्तकातून घेतले आहे. या वाचनात आपण पहिल्या ख्रिस्ती समूहाविषयी ऐकतो. त्यांनी कशाप्रकारे एकत्र भाकर मोडली, प्रार्थना केली व गरिबांना दान केले. आजचे दुसरे वाचन जे संत पेत्राच्या पहिल्या पत्रातून घेतले आहे. पेत्र सांगतो की, देव महादयाळू आहे, देवाने आपल्या तारणासाठी एकुलत्या एका पुत्राला पाठवले. आजचे शुभवर्तमान जे योहान लिखित शुभवर्तमानातून घेतले आहे ते थोमा व त्याच्या अल्प विश्वासाबद्दल सांगत आहे. थोमाचा विश्वास मजबूत नव्हता पण प्रभू येशूच्या दर्शनाने त्याचा विश्वास मजबूत होतो. आपला देवावरील विश्वास मजबूत व्हावा व आपल्याला दैवीदयेचा अनुभव यावा म्हणून या मिस्सबलिदानात विशेष प्रार्थना करूया.

मनन चिंतन

ख्रिस्ताठाई माझ्या प्रिय बंधू-भगिनींनो, आज आपण पुनरुत्थान काळातील दुसरा रविवार साजरा करीत आहोत. आजचा रविवार, देऊळमाता, दैवी दयेचा रविवार म्हणून साजरा करत आहे. आणि देऊळमाता आपणा सर्वांना सांगते की, आपला देव दयाळू, प्रेमळ आणि क्षमाशील आहे. पोप फ्रान्सिस ह्यांनी २०१६ साली (“Misericordia et misera”  “करुणा आणि दुर्दैवी व्यक्ती”) नावाचे परिपत्रक प्रसिद्ध केले आणि यामध्ये पोप फ्रान्सिस आवर्जून सांगत आहे की, आपला देव क्षमाशील आणि दयाळू आहे. देव नेहमी आपल्या बरोबर आहे आणि देवाची दया आपल्या बरोबर आहे. आणि आजची वाचने आपल्याला तेच सांगत आहे, की आपला विश्वास महत्त्वाचा आहे.

एक सुंदर अशी कथा आहे ,की आपला विश्वास कसा डगमलत असतो. एकदा एक शिकारी होता, तो जंगलात शिकारीसाठी गेला होता आणि त्याचा देवावर फार विश्वास होता, तरीसुद्धा त्याचा विश्वास तितका मजबूत नव्हता. जंगलामधून तो फिरत असताना अचानक एका दरीत पडणार होता, त्याचा पाय घसरला आणि तेव्हा त्या जंगलामध्ये तो मदतीसाठी आरोळी ठोकू लागला. कोणीतरी मला मदत करा ,त्यांनी आपला हात एका मोठ्या झाडाच्या मुळाला पकडलेला होता, परंतु कोणी मदतीला येईना, तेव्हा त्याला देवाची आठवण झाली आणि तो देवाला मनू लागला. हे देवा मी तर तो ख्रिस्ती आहे, माझा तुझ्यावर विश्वास आहे, मी प्रत्येक रविवारी मिसाला जातो, दानधर्म करतो, उपवास करतो, मला वाचव. आणि असे जेव्हा तो म्हणत होता तेव्हा त्याला आवाज ऐकू आला, जर तुझा माझ्यावर विश्वास असेल तर तु हात सोड. तो थोडा वेळ थांबला आणि पुन्हा म्हणू लागला, दुसरा कोणी आहे का. होय माझ्या प्रिय बंधू-भगिनींनो, आपला विश्वास कधीकधी डगमलू लागतो आणि जर देवाकडून दया हवी असेल प्रेम हव असेल तर आपला विश्वास मजबूत असायला हवा आहे.

आजचे पहिले वाचन प्रेषितांचे कृत्ते या पुस्तकातून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आपण ऐकतो की पहिले नवख्रिस्ती कशाप्रकारे एकत्र येतात, आणि त्यांनी कशा प्रकारे आपली संपत्ती एकत्र आणली आणि गरिबांना मदत करत होते आणि गरिबांसाठी प्रार्थना करत होते. आजचे दुसरे वाचन संत पेत्राच्या पत्रातून घेतलेले आहे आणि संत पेत्र सांगत आहे, की देव महान दयाळू आहे आणि त्याच्यासाठी देवाने आपला एकुलता एक पुत्र ह्या जगात आपल्या तारणासाठी पाठवलेला आहे. जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो, जो कोणीत्याच्या मार्गाचा अवलंब करतो त्याचे तारण नक्कीच होत असते. आजचे शुभवर्तमान, संत योहानाच्या शुभवर्तमानातून घेतलेले आहे. आणि तेव्हा आपण ऐकतो, की येशूचे शिष्य, येशूच्या मृत्यूनंतर भरलेले होते आणि म्हणून ते एका बंद खोलीत होते. त्यामध्ये येशू त्यांच्यासमोर प्रकट होते आणि त्यांना सांगतो की, तुम्हास शांती असो आणि येशू त्यांना दाखवतो की मी पुनरुत्थित झालेलो आहे आणि येशू त्याच्या मधून निघून जातो. ही गोष्ट जेव्हा घडते तेव्हा थॉमा त्या दिवशी हजर  नव्हता, तेव्हा त्याला सांगतात की थोमा, येशु पुनरुत्थित झालेला आहे आणि आम्ही त्याला पाहिले आहे. थोमा सांगतो, त्याच्या घायामध्ये हात घातल्याशिवाय मी विश्वास ठेवणार नाही. आणि पुन्हा जेव्हा ते बंद खोलीत एकत्र असतात, येशु त्यांच्यामध्ये हजर होतो आणि थोमा सांगतो, थोमा पुढे ये, माझ्या घायामध्ये, हाताच्या घायामध्ये, कुशीत घायामध्ये हात घाल आणि विश्वास ठेवणार हो आणि विश्वासहिन होऊ नको आणि थोमा म्हणतो, हे माझ्या देवा हे माझ्या देवा.

होय माझ्या प्रिय बंधू-भगिनींनो, थोमाचा विश्वास मजबूत नव्हता आणि येशू स्वतः हजर झाला आणि त्याचा विश्वास मजबूत झाला. आपल्या जीवनामध्ये कधी-कधी आपला विश्वास अशा प्रकारे कमी होत असतो. आपल्या जीवनात जेव्हा अडचण येतात, दुःख येतात, तेव्हा आपला विश्वास कमी होऊ लागतो. पण येशू आपल्यामध्ये हजर आहे आणि आज आपण दैवी दयेचा रविवार साजरा करीत आहोत.

सिस्टर किंवा संत मारिया फॉस्टीना ह्यांना येशूने अनेकवेळा दर्शन दिले आणि त्यांना सांगितले जाऊन माझ्या लोकांना सांग, की देव दयाळू, प्रेमळ, आणि शमाशील आहे आणि ही गोष्ट सर्वापर्यंत पोहोचवा. २००० साली पोप जॉन पोल दुसरे ह्यांनी सिस्टर मारिया फॉस्टीना ह्यांना संत घोषित केले. आणि तिची जी डायरी होती ही ती प्रसिद्ध केली. त्या डायरीमध्ये तिने आपला अनुभव लिहिलेला आहे की देव दयाळू आहे आणि प्रेमळ आहे. आपला विश्वास मजबूत होणे फार महत्त्वाचे आहे.

एक सुंदर अशी घटना आहे .खलील इब्राहिम नावाचे एक लेखक होते. त्यांच्या जीवनातील एक घटना आहे. एकदा ते घरात एकटेच होते. त्यांच्या घराला आग लागली होती आणि ते पहिल्या मजल्यावर होते. त्याचे आई-वडील बाहेर गेलेले होते. जेव्हा ते परत येतात तेव्हा दिसतो की सर्व ठिकाणी धूर आहे. खलील मदतीसाठी हाक मारत होता. वडिलांनी खालील यांना सांगितले की, मी बाहेर खाली उभा आहे, माझ्या आवाजाच्या दिशेने उडी टाक, मी तुला पकडेल. सुरुवातीला खलीलची हिंमत होत नव्हती, नंतर त्याने हिम्मत धरून आवाजाच्या दिशेने उडी टाकली आणि वडिलांना त्यांना पकडले आणि त्याच्या विश्वासाने त्याला वाचवले.

आज देऊळमाता आपल्याला सांगत आहे की, देव दयाळू आहे, त्याच्यावर विश्वास ठेवा त्याच्या दयेवर विश्वास ठेवा आणि आपल्याला तारणप्राप्ती नक्कीच होऊ शकते. आपल्या सर्वांसाठी ज्यांचा विश्वास कमी आहे त्यांच्यासाठी प्रार्थना करूया की, आपला विश्वास मजबूत व्हावा, आणि देवाची दया आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवावी आणि आपल्या सर्वांचे तारण व्हावे म्हणून आपण प्रभूचरणी प्रार्थना करूया.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना

प्रतिसाद: हे प्रभू आमची श्रध्दा दृढ कर.

१.आपले परमगुरु पोप लियोबिशप्स आणि व्रतस्थ लोकांनी त्यांच्यावर सोपवलेल्या जबाबदाऱ्या पार पाडाव्यात व लोकांना दैवी दयेचा अनुभव घेण्यास मदत करावी म्हणून प्रार्थना करू या.

२. ख्रिस्ताच्या दैवी दयेचा अनुभव घेऊन आपण सर्वांनी प्रभूच्या सहवासात एका हृदयाचे व्हावे म्हणून आपण प्रार्थना करू या.

३. जे देवापासून दूर गेले आहेत त्यांची देवावरची श्रध्दा वाढावी  व त्यांचा ख्रिस्ताच्या पुनरुत्थानात नवीन जन्म व्हावा म्हणून आपण प्रार्थना करू या.

४. प्रभूची शांती सदैव आपल्या कुटुंबात नांदावी व आपण सर्वांनी ख्रिस्ताच्या शांतीचे साधन व्हावे म्हणून प्रार्थना करू या.

५. पुनरुत्थित ख्रिस्तावरील आपला विश्वास दृढ व्हावा व संत थोमाप्रमाणे आपणही आपल्या श्रध्देची कबुली करावी म्हणून प्रार्थना करू या.


No comments:

Post a Comment