Thursday 21 July 2022

Reflection for the Homily of 17th SUNDAY IN ORDINARY TIME (24-07-22) By Br. Aaron Lobo

सामान्य काळातील सतरावा रविवार







दिनांक: २४/०७/२०२२
पहिले वाचन: उत्पत्ती १८:२०-३२.
दुसरे वाचन: कलस्सैकरांस पत्र २:१२-१४.
शुभवर्तमान: लुक ११:१-१३


 प्रस्तावना :

आज संपूर्ण  ख्रिस्तसभा सामान्यकाळातील सतरावा रविवार साजरा करित आहे. आजची उपासना आपणास प्रार्थनेचे खरे महत्व पटवून देत आहे. त्याचप्रमाणे खरी प्रार्थना काय आहे व ती कशी केली पाहिजे ह्या विषयी आपणास सांगत आहे. देवाने आपल्याला त्याची चांगली लोकं म्हणूण बनवले आहे. परंतु पापांमुळे आपण चांगल्या मार्गापासून वाईट मार्गाकडे वाटचाल करतो. परंतु देवाने आपल्या पुत्राद्वारे व त्याच्या क्रूसावरील बलिदानाद्वारे आपणा सर्वांना पुन्हा एकदा त्याच्या पुत्राचे स्थान दिले आहे. येशू ख्रिस्ताच्या जीवनाद्वारे व त्यांने शिकवलेल्या प्रार्थनेद्वारेच आपल्याला कळून येते कि, आपण खरोखर देवाची लेकरे आहोत व देव आपला प्रेमळ व दयाळू बाप आहे.

     ज्या प्रमाणे प्रार्थनेद्वारे आपण आपल्या देवाबरोबर एक बाप आणि मुलाचे नाते असे ओळखून घेतो, त्याच प्रमाणे आपण इतरांना सुद्धा हे नाते दाखून द्यावे अशी आपली जबाबदारी आहे. इतरांनी केलेल्या वाईट गोष्टींवर किंवा त्यांच्या पापी वृत्तींवर लक्ष न देता, त्यांचा न्याय न करता आपण आपल्या प्रार्थनेद्वारे त्यांना सुद्धा देवा जवळ नेले पाहिजे. म्हणून  आज आपण ह्या पवित्र मिस्साबलीदानात सहभागी होत असता, परमेश्वराकडे प्रार्थना करूया कि, परमेश्वराने आपणास दुसऱ्यांना समजून घेऊन त्यांच्यावर प्रेम करण्यास कृपा व शक्ती द्यावी.

मनन चिंतन

       प्रार्थना ही आपल्या जीवनातील एक महत्वाचा घटक आहे. आज जर आपल्याला आपल्या मित्रांबरोबर संवाद साधायचा असेल तर आपण मोबाईल चा वापर करतो परंतु जर आपल्याला देवाबरोबर संवाद साधायचा असेल तर आपण प्रार्थना करतो. परंतु आपल्या समोर काही  प्रश्न उद्भवतात: आपण प्रार्थना का करावी? आपण ती कशी करावी? ती कोणासाठी करावी? त्याचे आपल्याला काय लाभ आहेत? ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे आजच्या वाचनात मिळतात. आजच्या शुभवर्तमानात प्रभू येशू आपल्या “आमच्या स्वर्गीय बापा” ह्या प्रार्थनेचे महत्व पटवून देतो कि, देवा आपला प्रेमळ बाप आहे व प्रार्थना ही आपला देवाबरोबर एक प्रकारचा संवाद आहे.

प्रार्थनेत चांगले किंवा मोठ्या  शब्दांची गरज नसते. तर खऱ्या प्रार्थनेत आपल्या भावना आणि हेतू महत्वाचे असतात. आपण जर आपल्या जीवनावर लक्ष केंद्रित केले तर आपल्याला कळून चुकेल कि आपण कशाप्रकारे प्रार्थना करतो. अनेक वेळा आपल्या प्रार्थना जणू काही देवाबरोबर केलेला देवान-घेवान असते. “देवा जर तू मला चांगले आरोग्य दिले तर मी एक मिस्साबली अर्पण करीन, जर तू मला चांगली नोकरी दिली तर मी देवळाला अमुक रक्कम देणगी म्हणून देईन, अश्याप्रकारे आपण देवा मला हे दे आणि ते दे अशाप्रकारे प्रार्थनेत मांगतो.

परंतु येशू आपल्याला पटवून देतो कि प्रार्थाना ही फक्त देवाबरोबर केलेला देवान-घेवान सारखा कारोबार नाही तर एक प्रेमळ नातं आहे. सर्व प्रथम प्रार्थना म्हणजे देवाचा गौरव आहे. आपल्या प्रार्थनेची सुरवात सुद्धा आपण देवाचा गौरववाने केली पाहिजे. आपण केलेल्या स्तुती आराधनेने देवाचे गौरव वाढत नाही तर आपल्याला कळून चुकले पाहिजे कि परमेश्वर किती महान आहे. दुसरे म्हणजे प्रार्थनेद्वारे आपण देवाकडे आपल्या जीवनातील भौतिक आणि आध्यात्मिक गरजेसाठी मागतो. अनेक वेळा आपण आपल्या आध्यात्मिक गरजेसाठी न प्रार्थना करतो फक्त भौतिक गरजांसाठीच मागतो. परंतु ह्या प्रकारे प्रार्थना न करता आपण आपल्या आध्यात्मिक गरजेसाठी मागितले पाहिजे. कारण आध्यात्मिक गरज ही भौतिक गर्जे पेक्षा जास्त महत्वाची असते. मत्तय लिखित शुभवर्तमानात ६:३३ मध्ये प्रभू येशू सांगतो कि, पहिल्यांदा तुम्ही देवाचे राज्य व त्याचे नितीमात्व मिळविण्याचा प्रयत्न करा म्हणजे त्याबरोबर या सर्व गोष्टीही तुम्हांला मिळतील. अनेक वेळा असेही होते कि आपण प्रार्थना करतो परंतु आपणाला ते मिळत नाही आणि म्हणून आपण देवाबरोबर नाराज होतो. आपण विसरतो कि, आपल्या जीवनासाठी जे उपयोगी आहे त्याची जाणीव देवाला आहे. ज्या हेतूसाठी आपण प्रार्थना करतो ती आपल्याला हानिकारक असतात परंतु ती आपल्याला चांगली वाटते. ज्या प्रमाणे एक प्रेमळ बाप आपल्या भूकेल्या मुलास खायला विंचू किंवा साप देत नाही त्याच प्रमाणे आपला प्रेमळ पिता आपल्या जीवनाला असलेल्या हानिकारक गरजा पूर्ण करत नाही. तर आपल्या स्वर्गीय पित्याला आपणासाठी आपण मागितलेल्या गरजांपेक्षाही काहीतरी उत्तम असे द्यायचे आहे. म्हणूनच एखादी आपली  प्रार्थना पूर्ण झाली नाही तर आपण हताश न होतं आपणा आपल्या प्रार्थनेत तत्पर राहिले पाहिजे.

शेवटच म्हणजे, आपण स्वतःसाठी तसेच दुसऱ्यांसाठीही प्रार्थना केली पाहिजे, म्हणजे आपल्या प्रार्थनेला खरा अर्थ लाभेल. ह्याचे उत्तम उदाहरण आपण आजच्या पहिल्या वाचनात पाहतो. सदोम व गमोरा ह्याचे रहिवासी हे पापी जीवन जगात होते तरी सुद्धा आब्राहाम परमेश्वराजवळ त्यांची सुटका व्हावी म्हणून प्रार्थना  करतो.  आपण आपणा स्वतःसाठी किंवा आपल्या नातेवाहीकांसाठी प्रार्थना न करता इतरांसाठी सुद्धा केली पाहिजे.

आज आपण ह्या पवित्र मिस्साबलीदानात सहभागी होत असता आपण परमेश्वराची स्तुती, आराधना करून स्वतःसाठी तसेच इतरांसाठीही प्रार्थना करावी म्हणून परमेश्वर पित्याकडे मागुया.


प्रतिसादहे प्रभू आमची प्रार्थना एकूण घे.

 .ख्रिस्त सभेचे पोप महाशयसर्व बिशप्सधर्मगुरू व व्रतस्थ जे ख्रिस्ताच्या मळ्यात कार्य करत आहेत त्यांची ख्रिस्ताने शिकाविलेलेया प्रार्थनेद्वारे त्यांची श्रद्धा बळकट व्हावी व इतरांची श्रद्धा त्यांनी बळकट करावी म्हणून आपण प्रार्थना करूया.


२. जे तरुण-तरुणी देवापासून दूर गेलेले आहेत त्यांना प्रार्थनेची गोडी लाभून प्रभु प्रेमाचा स्पर्श होऊन, त्यांनी अंधाराचा मार्ग सोडून प्रकाशाचा मार्ग निवडण्यास त्यांस प्रेरणा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.


३. आजच्या उपासनेमध्ये सहभागी झालेल्या सर्व भाविकांनी ख्रिस्ताने शिकविलेल्या प्रार्थनेद्वारे  जीवनावर मनन-चिंतन करून सर्व वाईटांपासून व मोहांपासून दूर रहावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

 

४. जे आजारी व दु:खी कष्टी आहेत त्यांना त्यांच्या जीवनात प्रार्थनेद्वारे ख्रिस्ताचा स्पर्श लाभाव व  प्रार्थना त्यांचा आधारस्तंभ  बनावा  म्हणून आपण प्रार्थना करूया.

 

५.जे लोक पुरग्रस्तात मरण पावले आहेत त्यांच्या आत्म्यांना चिरकाळ शांती लाभावी व ज्या लोकांची आर्थिक व इतर हानी झाली आहे अश्यांना आर्थिक मदत मिळावी व पुन्हा त्यांचे जीवन सुरळीतपणे चालावे म्हणून आपण प्रार्थना करूया. 

 

६. थोडावेळ शांत राहून आपल्या वैयक्तिकसामाजिक व कौटुंबिक  हेतूंसाठी प्रार्थना करूया.



 


No comments:

Post a Comment