Monday 19 December 2022

 

                               Reflection for the Homily of Christmas Day (25/12/2022) By: Br. Jordan Dinis.                      नाताळ सण (सकाळ)

दिनांक: २५/१२/२०२२

पहिले वाचन: यशया ६२:११-१२

दुसरे वाचन: टायटसला पत्र ३:४-७

शुभवर्तमान: लुक २:१५-२०


प्रस्तावना:

गाईच्या गोठ्यात ख्रिस्त जन्मला पूर्वीच्या चांदण्यात तारा उगवला. आजचा दिवस ख्रिस्ती लोकांसाठी हर्षाचा आणि आनंदाचा आहे. आज अखिल विश्व व ख्रिस्त सभा नाताळ म्हणजे येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस साजरा करत आहे. आजची उपासना आपल्याला आनंद घोष, जल्लोष करण्यास आमंत्रण देत आहे. देवाचा पुत्र येशू जगाचा तारणारा जगात अवतरला आहे. आज तिन्ही वचने याची पुष्टि करतात. शब्द मानव झाला आणि आम्हा मध्ये राहिला. तो मानवाला पापापासून सोडवण्यास व जगाच्या सर्व वाईट शक्तीपासून मुक्त करण्यास जन्माला आला आहे. आज देवाच्या आपल्यावर असलेल्या अपार प्रेमाबद्दल आभार मानूया. प्रभू येशूला माझे जीवन, माझे कुटुंब यांचा तारणारा म्हणून स्वीकारण्यास तसेच त्याच्या जन्माने जो आनंद /हर्ष आपल्याला दिला आहे तो इतरांना देण्यास देवाची विशेष कृपा आणि आशीर्वाद लाभावा म्हणून आपण प्रार्थना करूया.

मनन चिंतन:

ख्रिस्त जयंती साजरा करण्यासाठी जमलेल्या माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, प्रत्येक वर्षी 25 डिसेंबरला मोठ्या आनंदाने आणि थाटामाटाने आपण येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस साजरा करतो. या सणानिमित्ताने आपण शुभेच्छा पाठवतो नाताळ गीते गातो व गोड गोड पदार्थांचा आस्वाद घेतो. त्याचप्रमाणे एकामेकांना मोठ्या प्रेमाने आलिंगन देतो आणि नाताळच्या शुभेच्छा त्यांना देत असतो.

बोधकथा:

एक तरुण मुलगा मध्यरात्री जागा होतो कारण त्याच्या घराबाहेर ट्रेन त्याची वाट पहाते. तो ट्रेनमध्ये बसतो आणि इतर मुलांना त्या ट्रेनमध्ये पाहून आश्चर्यचकित होतो. ट्रेन त्यांना उत्तर टोकावर घेऊन जाते. तिथे ते नाताळ वृक्ष पाहतात आणि सांता क्लॉजला भेटतात. मुलाला सांता क्लॉज कडून त्याची पहिली ख्रिसमस भेट मिळते. मुलगा सांता क्लॉजला विनंती करतो कि मला हरिणी वरचा घंटा पाहिजे. सांता क्लॉज त्याला तो घंटा देतो पण, जेव्हा तो घरी जायला निघतो तो घंटा त्याच्याकडून हरवतो. ती घंटा सर्व ठिकाणी शोधतो पण त्याला तो घंटा सापडत नाही. नाताळच्या मध्यरात्री त्याच्या बहिणीला ती घंटा सापडते आणि त्याचा आदल्या दिवशी त्याची बहीण ती घंटा त्याला भेट म्हणून देते. घंटा पाहून तो खूप आनंदित होतो.

माझ्या प्रिय बंधू भगिनींनो नाताळ हा आनंदाचा क्षण आहे. जर आपल्याला कळले की नाताळ येत आहे तेव्हा आपण भेटवस्तूंची वाट पाहत असतो. त्या तरुण मुलाप्रमाणे मुलगा भेटवस्तूमध्ये खूप मग्न झाला होता. परंतु त्याला त्याची भेट वस्तु परत मिळाली. या भूतलावरती 2000 वर्षापूर्वी प्रभू येशूने जन्म घेतला. त्याचा जन्म घेण्याचे कारण एक होते ते म्हणजे, संपूर्ण मानव जातीला पापांपासून मुक्त करावे. तो देव होता परंतु आपल्या प्रेमासाठी त्याने या भूतलावर जन्म घेतला.

आजची तिन्ही वचने येशूच्या जन्माचा प्रसार करत आहेत. यशया संदेष्ट्याच्या वाचनात आपल्याला ऐकायला मिळते की सियोनेच्या कन्येला म्हणा, पहा तुझे तारण येत आहे पाहा वेतन त्याचपाशी आहे व पारिपत्य त्याचसमोर आहे.

आजच्या शुभवर्तमानात प्रभू येशूला पाहण्यासाठी मेंढपाळ खूप दूरचा प्रवास करून येतात कारण त्यांना जगाचा मालक प्रभू येशूला पहावयाची इच्छा होते. जेव्हा ते प्रभू येशूला पाहतात तेव्हा ते खूप आनंदी होतात. जेव्हा ते त्याच्या घराण्याला परत जाता, तेव्हा ते प्रभू येशूची स्तुती सर्व गावो-गावी पसरत जातात.

आज संत पौल तीमतीस लिहिलेल्या पहिल्या पत्रामध्ये आपणा सर्वांना प्रश्न विचारत आहे ज्याला आपल्या घरची अवस्था चांगली ठेवता येत नाही, तो देवाच्या मंडळीचा सांभाळ कसा करील? देवाच्या मंडळीचा सांभाळ करण्यासाठी देवाच्या आज्ञे प्रमाणे वागावें लागते. त्याच्या तत्वावर आपण आपले पाऊल टाकले पाहिजे. देवाच्या तत्वावर पाऊल टाकणे सोपे नाही. देवाच्या तत्वावर पाऊल टाकणे म्हणजे दुःखाला आमंत्रण देणे.

2000 वर्षापूर्वी प्रभू या भूतलावरती आपल्या प्रेमाचा संदेश घेऊन आला. त्याने प्रेम काय आहे याची शिकवण त्याने आपल्याला त्याच्या जीवनातून दाखवून दिली आहे, जेणेकरून आपण सुद्धा तेच प्रेम दुसऱ्यांना देऊ. ख्रिस्ती म्हणून नाताळ साजरा करायचे मुख्य कारण म्हणजे मौजमजा नाही तर आपले प्रेम दुसऱ्यांना द्यायचे हाच ख्रिस्ताचा मुख्य संदेश आहे.


विश्वासू लोकांच्या प्रार्थना

प्रतिसाद : हे देहधारी ख्रिस्ता, आमची प्रार्थना ऐक.

1. पोप फ्रान्सिस, सर्व कार्डीनल्स, बिशप्स, धर्मगुरु, धर्मभगिनी ह्यांनी आपले सर्व आयुष्य प्रभूसेवेसाठी अर्पण केले आहे. त्यांना देवाची  कृपा व आशिर्वाद मिळावा व देवाची सुवार्ता जगाच्या कानाकोपऱ्यात पसरविण्यासाठी त्यांना सामर्थ्य लाभावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

2. जे युवक व युवती देवापासून दूर गेलेले आहेत व त्यांच्या जीवनामध्ये काही धैर्य नाही, अशा सर्व युवक व युवतींना देवाच्या प्रेमाचा स्पर्श व्हावा व ते देवाच्या जवळ यावेत म्हणून आपण प्रार्थना करुया.

3. आज येशू ख्रिस्त आपल्यामध्ये जन्मलेला आहे. ख्रिस्ताने शांतीचा व प्रेमाचा संदेश आपल्याला दिलेला आहे. हाच संदेश आपण इतरांना द्यावा व इतरांचे जीवन आनंदमय व शांतीमय बनावे म्हणून आपण प्रार्थना करु या.

4. हे प्रेमळ ख्रिस्ता, सर्व बालकांना विशेष करून जी मुले अनाथ-आश्रमांमध्ये आहेत व ज्या मुलांच्या आई-वडिलांनी त्यांना सोडून दिलेले आहे. हे प्रभो तू त्यांचा सांभाळ कर, त्यांची काळजी घे व त्यांना चांगला मार्ग दाखव. इतरांनी त्यांच्यासाठी मदतीचा हात पुढे करावा म्हणून आपण प्रार्थना करुया.

5. आता आपण थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक व सामाजिक हेतूं प्रभूचरणी ठेऊया.

No comments:

Post a Comment