Wednesday 15 March 2023

 



Reflections for the homily of the Fourth Sunday in the Holy Season of Lent (19/03/2023) by Br. Reon Andrades.




प्रायश्चित काळातील तिसरा रविवार


दिनांक: १९/०३/२०२३

पहिले वाचन: १ शमूएल १६:१ब, ६-७,१०-१३अ

दुसरे वाचन: एफीसकरांस पत्र ५:८-१४

शुभवर्तमान: योहान ९:१-४१


विषय: अंधकाराचा धिक्कारप्रकाशाचा स्विकार.



प्रस्तावना:

आज आपण प्रायश्चित काळातील चौथा रविवार साजरा करत आहोत. आजची वचने आपल्याला जगासाठी प्रकाश बनण्यास पाचारण करीत आहेत. पहिल्या वाचनात आपण ऐकतो की शमूएल दावीद राज्याला देवाच्या आज्ञेनुसार अभिषिक्त करीत आहे. जणू काही दावीद राजा ह्यापुढे इस्राएली लोकांसाठी प्रकाश बनत आहे. शुभवर्तमानात प्रभू येशू ख्रिस्त खुद म्हणतो कि, मी ह्या जगात असेपर्यंत जगाचा प्रकाश आहे. ख्रिस्त आज आपणास आव्हान करत आहे कि आपणही प्रकाशाची मुले बनू शकतो. परमेश्वराचा प्रकाश इतरापर्यंत पोहोचविण्यास आपण त्याचे साधन बनावेत व त्याचे प्रकाशाचे राज्य ह्या जगात प्रस्थापित करण्यास आपण कार्गत व्हावे म्हणून आपण या मिस्साबलिदानात प्रार्थना करूया.


बोध कथा:

कार्डिनल जॉन हेन्री न्यूमाँन ॲंग्लिकन धर्मगुरु, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीले नावाजलेले शिक्षक होते. त्यांनी हाती घेतलेली समाजसुधारणेची चळवळ चालू असताना त्यांची प्रकृती बिघडली व त्यांना युरोपमध्ये उपचारास जावे लागले. वयाच्या अवघ्या ३२ व्या वर्षी आजाराशी झुंज देत असताना परदेशात उपचार घेत असताना त्यांची प्रकृति अगदीच खालावली व अतिशय दयनीय परिस्थितीत त्यांना आपल्या मायदेशी परतण्याची इच्छा त्यांना झाली. परंतु वाहतूक परिस्थिती अनुरूप नसल्याने ते सहजरीत्या घरी परतू शकत नव्हते. त्यावेळेस त्यांना इंग्रजीत अतिशय हृदय स्पर्ष गाणं लिहिले, Lead kindly light amid the encircling gloom, lead thou me on… the night is dark and I am far from home, lead thou me on. अशी त्यांनी प्रकाशाच्या देवाकडे प्रार्थना केली, की अंधार खूप आहे व मी घरापासून दूर आहे तुझ्या प्रकाशाने तू मला मार्ग दाखवा. परमेश्वराने त्यांची प्रार्थना ऐकली ते बरे झालेते सुखरूप पणेआपल्या मायदेशी परतले. तद्नंतर ते रोमन ख्रिस्ती धर्माचे धर्मगुरू झाले व आज संत म्हणून घोषित केले आहेत.


मनन चिंतन:

आपण प्रायश्चित काळाला सुरुवात केलेली आहे व आज आपण चौथ्या आठवड्यात पदार्पण करत असताना, आजची उपासना ख्रिस्त हा जगाचा प्रकाश आहे याची ओळख आपणास करून देत आहे. आजच्या शुभवर्तमानात प्रभू ख्रिस्त म्हणतो की, मी जगाचा प्रकाश आहे (योहान ९:५). इतकेच नव्हे तर त्याने आपल्या कृत्याने आपणास उदाहरण हे घालून दिले आहे. एका आंधळ्या मनुष्याला दृष्टी देऊन जणू काही त्याला प्रकाशाची अनमोल अशी देणगी बहाल केली आहे. दृष्टी देऊन शारीरिक प्रकाश नव्हे तर आपण पुढे वाचलं तर करून येईल कि त्याला  आध्यात्मिक दृष्टीही दिली आहे. त्याच्या विश्वासाला बहर आणली आहे.

आजच्या पहिल्या वाचनात आपण ऐकतो की शमूएल दावि या लहान मेंढपाळाला इस्रायेलचा राजा म्हणून देवाच्या आज्ञे अनुसार अभिषिक्त करत आहे. जणू काही आता सौल नाही तर दावीद इस्राएली लोकांचा प्रकाश बनणार आहे व त्यांना दिशा दाखवणार आहे. ह्या विषयावर संत पौल कसा गप्प बसेल ? म्हणूनच तो इफिसीकरास पत्र यात लिहितो की, कारण तुम्ही एकेकाळी अंधारात होता; तरी आता प्रभुमुळे प्रकाश झाला आहात, म्हणून प्रकाशाच्या मुलांना शोभेल असे तुमचे आचारण असू द्या (इफी ५:८).  पुढे तो म्हणतो प्रकाशात चालणाऱ्यांची लक्षणे, चांगुलपणा, नीति व सत्य ही आहेत. यावर आणखी भाष्य करणे गरजेचे नाही कारण हा संदेश पारदर्शक आहे.

जर का आपण शुभवर्तमानात पाहिलं तर, आपल्याला कळून चुकेल की प्रभू ख्रिस्त आज असामान्य रीतीने आंधळ्या माणसाला बरे करीत आहे. आज तो शब्दांनी नव्हे तर कृतीचा वापर करत आहे. प्रकाश हा अंधकार दूर करत असतो, तर दुसरीकडे न दिसणाऱ्या गोष्टी आपल्याला स्पष्टपणे दाखवत असतो. अज्ञानता, गैरसमाज यासारख्या नकारात्मक गोष्टींना तो दूर करत असतो. त्याचप्रमाणे प्रभू येशूला ठाऊक होते की तो दिवस शब्बाथाचा होता व त्या दिवशी काम करणे नियमाविरुद्ध होते. याचे औचित्य साधून प्रभु येशू माती उचलून व आपल्या थुंकीने त्याचा चीख्खल बनवून त्या माणसाच्या डोळ्या लावतो व त्यास शिलोहचा कुंडावर धुण्यास सांगतो.  या कृत्याद्वारे प्रभू येशू शास्त्री व परुशी व सर्व इस्राएल जनतेला त्यांच्या परंपरेवर पुनर्विचार करण्याचे आव्हान करत आहे. समाजातील काही परंपरा आपल्या व इतरांच्या जीवनात अडचणी निर्माण करतात. या परंपरा आपणास व इतरांस अंधाराकडे घेऊन जात असतात किंबहुना जात आहेत. अशा काही परंपरे मुळे आपली व आपल्या समाजाजी प्रगती होण्याऐवजी दुर्गती होत आहे. आज आपल्या समाजात आपल्याला अनेक गरीब दिसत आहे. कुणीतरी खरेच म्हटले आहे की, गरीब जन्मत नाही तर समाज गरीबांना जन्म देत असतो. आज आपण समाजात गरीब व श्रीमंत, शिक्षित व अशिक्षित, स्वतंत्र व बंधिस्त, जात-पात पाळणारे, नावाजलेले व समाजाने बहिष्कृत केलेले, मेहनत करणारे व लाच-लुबाडी करणारे इत्यादि पहायला मिळतात. या सामाजिक असमान्तेला कारणीभूत कोण? आपला समाज? आपल्या परंपरा? अथवा आपली विचारसरणी व अंधारामध्ये राहायची आपली वाईट सवय?

आज प्रभू ख्रिस्त आपणास यावर प्रकाश घालण्यास सांगत आहे आपण ख्रिस्ताचा प्रकाश परिधान करून, या सर्व सामाजिक प्रश्नांवर प्रकाश घालण्यास देवमाता व दैव शब्द आपणास पाचारण करीत आहे. ज्या रीती, परंपरा वाईट सवयींमुळे गरीबांचा छळ होत असेल अथवा इतरांची जीवन अवघड बनत असेल तर त्यासर्व परंपरा व वाईट सवयी आपण ख्रिस्ताच्या प्रकाशात पाहायला हवा. ते पाहून त्यांतील आपल्या सर्वांच्या प्रगतीआड येणारे घटक ओळखून त्यात सुधारणा करूया. हे सर्व करण्यासाठी कार्डिनल जॉन हेन्री न्यूमाँन सारखी परमेश्वरावर श्रद्धा ठेवणे प्रार्थना करणे गरजेचे आहे.


श्रद्धावंतांच्या प्रार्थना

प्रतिसाद: “हे प्रभू, आम्हाला तुझ्या प्रकाश्याची मुले बनव.”

१. आपण प्रार्थना करूया आपले पोपे महाशय, सर्व धामागुरू, धर्माभागिनी व सर्व धार्मिक पुढार्यांसाठी कि त्यांना परमेश्वराचे राज्य या जगात पसर्विण्य्साठी शारीरिक बळ व पवित्र आत्म्याचे समर्त्या लाभावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

२. आज जगात तणावाचे वातावरण पसरत आहे, आर्थिक समस्या व मंदी, युद्ध व नैसर्गिक आपत्तींना सर्व सामान्य माणूस बळी पडत आहे, ह्या सर्वांपासून आपले रक्षण व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

३. जगाचा प्रकाश आपणास बनता यावे व समाजात एकोपा, प्रेम व शांतीचे वातावरण पसरविण्यास आपण कणखर व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

४. अनेक युवक युवती देवापासून दुरावलेले आहेत, त्यांना परमेश्वराचे पाचारण लाभावे व ख्रिस्ताच्या प्रकाशयत त्यांनी त्यांच्या जीवनाची वाटचाल करावी म्हणून आपण प्रार्थना करुया.

५. आपल्या गाव, वाड्यात, कुटुंबात शांतीचे वातावरण प्रस्थापित व्हावे व ख्रिस्ताच्या प्रकाश्याची मुले म्हणून आपण ओळखली जावी म्हणून आपण प्रार्थना करूया.

६. थोडा वेळ शांत राहून आपण आपल्या वैयक्तिक व सामाजिक गरजांसाठी प्रार्थना करूया. 


No comments:

Post a Comment