Tuesday 5 March 2024

 



Reflection for the 4th SUNDAY IN THE SEASON OF LENT (10/03/2024) By Fr. Suhas Pereira.




दिनांक: १०-०३-२०२४

पहिले वाचन: २ इतिहास ३६:१४-१६,१९-२३

दुसरे वाचन: इफिसकरांस पत्र २:४-१०

शुभवर्तमान: योहान ३:१४-२१


उपवासकाळातील चौथा रविवार


प्रस्तावना:

आज आपण उपवासकाळातील चौथा रविवार साजरा करत आहोत. आजच्या रविवाराला उल्हासाचा रविवार असेसुद्धा संबोधलं जातं. उपवासकाळाच्या प्रवासाचा अर्धा टप्पा आपण पार केलेला आहे. दैवी तारण हे परमेश्वराने आपल्या पत्राद्वारे संपूर्ण जंगल दिलेले अद्भुत दान आहे. आजची जगाला मिळालेल्या देवाची दया, माया  आणि कृपेवर आपलं लक्ष केंद्रित करत आहेत. आजचं पाहिलं वाचन देवाचं आपल्या प्रजेविषयी असलेल्या संयम आणि करुणेविषयी सांगते. पारसचा राजा कोरेश ह्याची परमेश्वराने त्याच्या करुणेचं आणि त्याच्या प्रजेच्या बाबिलोनच्या गुलामगिरीतून तारणाचसाधन म्हणून निवड केली. आजच्या दुसऱ्या वाचनात संत पौल म्हणतो कि देवाची दया आणि करुणा इतकी अपरंपार आहे, कि देवाने आपल्याला त्याच्या पुत्राद्वारे तारणाचे आणि सार्वकालिक जीवनाचे दान दिलेले आहे. आजचं शुभवर्तमान  प्रभू येशू ख्रिस्ताचे तारणकर्ता असे वर्णन करते:"देवाने जगावर एवढी प्रीति केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. देवाने आपला पुत्र यासाठी दिला की, जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला अनतंकाळचे जीवन मिळावे" (योहान , १६).  प्रभू येशाने आपल्या क्रुसाद्वारे संपूर्ण मानवजातीचे तारण केले आहे. या सत्याचे आपण आजच्या उपासनेमध्ये स्मरण करूया. आणि परमेश्वर पित्याला प्रभू येशूद्वारे धन्यवाद देऊया.


मनन चिंतन:

आजच्या पहिल्या वाचनात आपण ऐकलं कि, देवाच्या प्रजेतील अनेकांचे दुराचरण वाढले आणि त्यांनी अधिकाधिक पापे केली. ते परमेश्वराच्या बाबतीत अप्रमाणिक झाले. त्यांनी यरुशलेममधल्या परमेश्वराने पवित्र केलेलले  मंदिर भ्रष्ट केले. देवाने लोकांना सावध करण्यासाठी पुन्हापुन्हा संदेष्टे पाठवले. आपल्या प्रजेविषयी आणि मंदिराविषयी त्याच्या मनात करुणा होती म्हणून परमेश्वर असे वागलापण या परमेश्वराच्या प्रजेने मात्र संदेष्ट्यांची टर उडवली, संदेष्ट्यांच्या सांगण्याकडे दुर्लक्ष केले. देवाच्या संदेशांची हेटाळणी केली. अखेर देवाचा क्रोध अनावर झाला. निर्गमच्या पुस्तकात (२१, -) आपण वाळवंटातील विषारी सापांविषयी वाचतो: देवाने मिसऱ्यांच्या गुलामगिरीतून मुक्त केलेलं इस्रायली लोक आता वाळवंटात नाउमेद, हताश झाले होते. त्यामुळे त्यांनी देवाविरुद्ध आणि मोशेविरुद्ध बंद पुकारले, विद्रोह केला. तेव्हा परमेश्वराने विषारी सापांना लोकांमध्ये सोडले आणि अनेक लोकांचा सर्पदंशाने बळी गेला. परंतु ज्या लोकांनी मोशेने वाळवंटात एका खांबावर उंचावलेल्या पितळेच्या सापाकडे पाहिले, त्यांचा मृत्यूपासून बचाव झाला. जो साप सुरुवातीला मृत्यूचे कारण होता, त्याच सापाचं रूपांतर जीवनाच्या आणि तारणाच्या चिन्हात झाले. याचा अर्थ काय? आणि हि विचित्र गोष्ट आपण आपल्या आजच्या संदर्भात कशी समजू शकतो?

     आजचं शुभवर्तमान  निर्गमच्या पुस्तकातील या घटनेचा संदर्भ घेत आहे. मोशेने खांबावर उंचावलेल्या पितळेच्या सापाची तुलना आजच्या शुभवर्तमानात प्रभू येशू ख्रिस्ताशी करण्यात आलेली आहे: " ज्याप्रमाणे मोशेने वाळवंटात सापाला उंचाविले, त्याचप्रमाणे मनुष्याच्या पुत्रालासुद्धा उंचाविले जाईल." निर्गमच्या पुस्तकातील सापाची गोष्ट आपण आजच्या काळात, आपल्या संदर्भात एका नव्या अर्थाने आणि अलंकारिक पद्धतीने समजू शकतो. अनेक वेळा आपणसुद्धा विषारी सापाप्रमाणे वेगवेगळ्या पद्धतीने विष पसरवू शकतो. अनेक वेळा आपण आपल्या कडव्या आणि वाईट वृत्तींमुळे इतरांच्या चांगल्या जीवनात विष कालवून त्यांचं जगणं कठीण करू शकतो. अनेक वेळा आपण आपल्यातील इतरांबद्दलचा हेवा, मत्सर, संशय अशा वाईट प्रवृत्तीमुळे आपल्या सभोवतालचं मानवी जीवन दूषित करू शकतो, मानवी नातेसंबंधांचा नाश करू शकतो. विषारी सापांमुळे मानवी जीवनाचा जसा नाश झाला, तसाच आपल्यातील दुर्गुणांमुळे हे जग आणि मानवी जीवन दूषित होऊ शकते, विषमय होऊ शकते.

     परंतु आपल्या समाजात आणि मानवी जीवनात अशा अनेक वाईट गोष्टी आणि दुःखे आहेत, ज्याला आपण मानवप्राणी स्वतः जबाबदार नाहीत. आपल्या जगात असं बरच काही आहे जे मानवी जीवनास घटक ठरते, आपल्याला दुःख देते. उदा. जीवघेणे आजार, अपघात, अपयश, दुर्दैवाचे आघात. या सगळ्या गोष्टींवर मनन-चिंतन करत असताना कदाचित आपल्याला प्रश्न पडेल कि, त्या काळात इस्रायलच्या लोकांचं जसं तारण झालं, तसं आपलंसुद्धा या सर्व समस्यांपासून तारण होईल का? आपल्यासाठीसुद्धा तारणाचा, मुक्तीचा मार्ग उपलब्ध आहे काआजचं शुभवर्तमान या प्रश्नाला सकारात्मक उत्तर देताना आपलं लक्ष क्रुसावर खिळलेल्या मनुष्याच्या पुत्राकडे, प्रभू येशू ख्रिस्ताकडे वेधत आहे. जाइव्ह आपण पापी पामर क्रुसावरील ख्रिस्ताकडे पाहतो तेव्हा तो आपल्यालाआपण आपलं जीवन कसं जगलो पाहिजेत हे दाखवतो. क्रुसावर खिळलेल्या ख्रिस्तामध्ये आपण अशा मनुष्याला पाहतो, ज्याने कधीही इतरांचा द्वेष, हेवा, मत्सर केला नाही आणि इतरांच्या जीवनात विष कालावण्याचा प्रयत्न केला नाही. तर ख्रिस्त असा व्यक्ती होता, जिने फक्त प्रेम केलं, सहन केलं, क्षमा केली. कदाचित आपल्याला नम्र, सहनशील, प्रेमळ, क्षमाशील ख्रिस्ताचे उदाहरण, त्याचा आदर्श आपल्या जीवनात घेण्यास लाज वाटत असेल. परंतु त्याला मात्र आपली लाज वाटत नाही. आपला न्याय करण्याची त्याची इच्छा नाही, तर त्याला आपल्याला आपल्या पापातून वर काढायचं आहे, आपल्या जीवनाला नवी दिशा द्यायची आहे. आपण एकमेकांच्या जीवनात विषाची भूमिका ना बजावता, अमृताची भूमिका बजावावी म्हणून त्याला आपल्याला धैर्य द्यावयाचे आहे, शक्ती द्यावयाची आहे.

     म्हणूनच आपल्या जीवनात जेव्हा अपयश, दुःख आजाराचा सामना आपल्याला करावा लागेल, तेव्हा आपण आपलं लक्ष क्रुसावरील ख्रिस्तावर केंद्रित करूया आणि देवसुद्धा आपल्यासाठी आणि आपल्याबरोबर दुःख भोगतो या सत्याचे विस्मरण करूया: देवाने या जगावर इतकी प्रीती केली, कि त्याने आपला एकुलता पुत्र जगाच्या तारणासाठी  दिला,कि जेणेकरून त्यांच्याद्वारे आपल्याला जीवनदान प्राप्त व्हावे. म्हणूनच संत पेत्र आपल्याला दुःखामध्येसुद्धा आनंद करण्यासाठी आमंत्रण देत आहे: "तुम्ही ख्रिस्ताच्या दु:खसहनाचे भागीदार झाल्याबद्दल आनंद करा. यासाठी की, जेव्हा त्याचे गौरव प्रकट होईल तेव्हा तुम्ही आनंदाने आरोळी मारावी" ( पेत्र , १३).

     शुभशुक्रवारच्या दिवशी आपल्याला क्रुसाधारी ख्रिस्ताकडे पाहण्याचे आमंत्रण दिले जाते: "क्रूसाचे लाकूड पहा हो, ख्रिस्त (जगाचे तारण) टांगला या वरती". क्रुसाद्वारेच तारण आहे; क्रिसद्वारेच जे तुटलेलं आहे, वेगळं झालेलं आहे ते सर्व बरं होते आणि एक होते. आपल्या जीवनात क्रुसाधारी ख्रिस्त केंद्रबिंदू बनला पाहिजे. म्हणजेच आपल्या संकटात, विपत्तीमध्ये आणि दुखत जेव्हा आपण त्याच्याकडे पाहू तेव्हा तो आपल्याला त्याच्या दैवी शक्तीने त्याच्याकडे आकर्षित करील आणि आपल्याला बरेपण लाभेल. कारण ख्रिस्त स्वतः सांगतो: "जेव्हा पृथ्वीपासून वर उचलला जाईन, तेव्हा मी सर्व लोकांना माझ्याकडे ओढीन” (योहान १२, ३२). या पवित्र क्रुसावरील श्रद्धेनेच आणि भरवशाची आपण म्हणूया: नमन क्रूस, आमचा एकमेव भरवसा, नाव क्रुसा आमचे तारण, नमन क्रुसा आमची नवजीवनाची आशा. आमेन 


विश्वासू लोकांच्या प्रार्थना

आपल्या परमेश्वर पित्याच्या महान प्रेमावर विश्वास ठेवून आणि तो आमच्या सर्व प्रार्थना ऐकून आमच्या गरजांचे निवारण करील या आत्मविश्वासाने आपण आपल्या विनंत्या देवा चरणी मांडू या.

प्रतीसाद: हे परमेश्वरा आमची प्रार्थना ऐक

) आपल्या देऊळमातेची प्रभूच्या सुवार्तेची घोषणा आणि पश्चातापासाठी तिने दिलेले आमंत्रण सर्व लोकांनी स्वीकारावे. म्हणून आपण प्रार्थना करूया.

) आपल्या सर्व जागतिक पुढार्यांनी आणि आपल्या सर्व नेत्यांनी प्रभू येशूच्या शिकवणुकीत एक अतुलनीय मार्गदर्शक ओळखावा आणि त्याच्या शिकवणुकीचा आदर्श आपल्या कार्यात घ्यावा. म्हणून आपण प्रार्थना करूया

) ज्या लोकांनी युद्धांमुळे आपलं सर्वकाही गमावलेला आहे आणि ज्यांना उपासमार, हिंसाचार आणि लाचारी सहन करावी लागत आहे अशा सर्वांना परमेश्वरी औदार्य, करून आणि प्रेमाचा अनुभव यावा म्हणून आपण प्रार्थना करूया.

) ज्या व्यक्ती आजारी आहेत त्यांना त्यांच्या दुर्बलतेमध्ये परमेश्वरी कृपा आणि शक्तीद्वारे सबळ होण्याचा अनुभव यावा, म्हणून आपण प्रार्थना करूया.

) या उपवासकाळात प्रार्थना, उपवास आणि दानधर्म या तीन महत्वाच्या कृत्यांद्वारे आपल्याला परमेश्वराच्या समीप येण्याचा अनुभव या. म्हणून आपण प्रार्थना करूया.

 

हे परमेश्वर, तुझा पुत्र येशू ख्रिस्ताने शांती आणि समेटाचे दान जगाला दिले आहे. आमच्याप्रती तुझे प्रेम अनुभवण्यासाठी आमच्या हृदयाचे डोळे उघडण्यास आम्हाला मदत कर. हि प्रार्थना आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो.


No comments:

Post a Comment