Wednesday 16 March 2016


Reflections for the homily of Palm Sunday  (20/03/2016) By: Camrelo D'Mekar.

झावळ्यांचा रविवार





दिनांक: २०/०३/२०१६.
पहिले वाचन: यशया ५०:४-७.
दुसरे वाचन: फिलीप्पैकरांस पत्र २:६-११.
शुभवर्तमान: लुक २२:१४-२३:५६.


' माझ्या इच्छेप्रमाणे नको तर तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे.'




प्रस्तावना:

     आज आपण प्रभूच्या दु:खसहनात सहभागी होण्यास येथे एकत्र जमलो आहोत. आजपासून ख्रिस्तसभा पवित्र आठवड्यास सुरुवात करत आहे. आजची उपासना आपणास प्रभू येशूचे दु:खसहन आणि प्रेम ह्या विषयावर मनन-चिंतन करण्यास आमंत्रण देत आहे.    
आजच्या पहिल्या वाचनात आपण ऐकतो की, आपल्या निवडलेल्या लोकांना आध्यात्मिक व नैतिक मार्गदर्शन करून त्यांना आपल्या करारात एकत्र ठेवण्यासाठी देवाने संदेष्ट्यांची निवड केली. ह्या संदेष्ट्यांनी निर्भिडपणे सत्याची बाजू घेत त्यांच्या पडत्या काळात ईस्रायली लोकांचा सांभाळ केला. दुसऱ्या वाचनाद्वारे संत पौल आम्हाला आम्ही आमचे ख्रिस्ती जीवन कशाप्रकारे जगले पाहिजे याविषयी मौलिक मार्गदर्शन करतात. प्रभू येशू ख्रिस्ताने देहधारण स्वीकारून विनम्रपणे स्वत:ला संपूर्ण मानवतेच्या सेवेसाठी अपर्ण केले. तर शुभवार्तिक लूक प्रभू येशूने संपूर्ण विश्वाच्या पापोद्धारासाठी क्रुसावरील यातना सहन केल्या व हे त्याचे आपल्यावर असलेल्या प्रेमाचे प्रतिक असे स्पष्ट करतो.
     पवित्र आठवड्याची सुरुवात करीत असताना आपण प्रभूच्या प्रेमाचा आदर्श आपल्या शब्दांतून आणि कृतीतून इतरांना देण्याचा प्रयत्न करूया, जेणेकरून ह्या त्याच्या प्रेमाखातर कोणताही क्रूस वाहण्यास व त्याची सुवार्ता जगजाहीर करण्यास आपण तत्पर असू. 

सम्यक विवरण

पहिले वाचन: यशया ५०:४-७

     प्रस्तुत उतारा दु:ख सहन करणारा कोंकरु ज्याला ‘मसीहा’ म्हणून संबोधले जाते. असं हा दु:ख, यातनांचा स्वीकार करतो, ह्याला प्रभूच्या करुणेविषयी उपदेश द्यायचा आहे. त्यामुळे त्याला कित्येक अडचणींना सामोरे जावे लागेल. पण देव मात्र त्यांचे धैर्य सोडणार नाही. देवाचा संदेष्टा म्हणून त्याला उपदेश करण्याचे दान लाभले आहे. त्याचा शुभसंदेश वैरी आणि मित्र ह्यांच्या हृदयाला स्पर्श करणारा आहे, त्यामुळे वैरी त्याचा अधिकच प्रतिकार करतील. पण तो त्याचे कार्य चालूच ठेवणार. कोणत्याही प्रकारचा अपमान आणि शारिरिक हानी देवाचे हेतू कमकुवत करणार नाही. सर्व प्रकारची हानी किंवा अपमान व्यर्थ ठरेल. अखेरी देवाचा संदेष्टा विजयी होईल असे ह्या उताऱ्यातून स्पष्ट होते.

दुसरे वाचन: फिलीप्पैकरांस पत्र २:६-११

     संत पौल येशूला देवाच्या रुपामध्ये आपणासमोर सादर करतो. येशूने देवाचे दैवीपण अंगीकारून सुद्धा स्वत:ला महान मानले नाही. यहुदी परंपरेत ‘दैवीपण’ म्हणजे ‘मृत्यूपासून माफी’ (देवाला मृत्यू नसतो). येशू ख्रिस्ताने स्वत:चे दैविपण स्वत:च्या स्वार्थासाठी कधीच वापरले नाही. मात्र एखाद्या नोकरासारखा निर्बल, शक्तिहीन झाला. कारण मानवी अस्तिव हे आध्यात्मिक गुलामगिरीच्या शक्तीत असून, त्याचा अंत मृत्यूत होतो. येशू ख्रिस्त हा देवाच्या आणि मानवजातीच्या नजरेत एक मानव होता. त्यामुळे त्या जीवनात तो एका सामान्य माणसासारखा जगला. मृत्यू हा येशूच्या आज्ञाधारकतेचा अंत नव्हता. मात्र एखाद्या माणसाप्रमाणे की, ज्याच्या जीवनाचा शेवट मृत्यूनेच होऊन, त्याने देवाच्या आज्ञेचे पालन केले. त्यामुळे त्याला क्रूसावरील मरण भोगावे लागले. क्रूसावरील मरण हे गुलाम आणि जे समाजातील रीतीरिवाज पाळत नसत त्यांना दिले जात असे.

शुभवर्तमान: लुक २२:१४-२३:५६.

     आजच्या शुभवर्तमानाची सुरुवात वल्हांडणाच्या भोजनाद्वारे होते. एका कुटुंबाचे उदाहरण आपल्यासमोर प्रकट केले आहे. ह्या भोजनाला स्वर्गीय भोजनाचा अर्थ दिला गेला आहे. येशूच्या मरणाच्या घटकेपर्यंत तो त्याच्या शिष्यांना भोजन देत होता. आपणास येथे सेवेचे मार्मिक उदाहरण दिसून येते. सर्वात महान तोच आहे जो सर्वांची सेवा करतो. सेवा करीत असताना आपल्याला सैतान फसवण्याचा प्रयत्न करील. त्या कारणामुळे प्रभू येशू पेत्राचा विश्वास ढळू नये, म्हणूने त्यांच्यासाठी प्रार्थना करतो. (लुक.२२:२२)येशूचा करुणामय दृष्टीक्षेप पेत्राला पश्याताप करायला भाग पाडतो. गेथसेमनी बागेत येशू प्रार्थना करी असताना घुडगे टेकून प्रार्थना करतो; ह्यावरून प्रभू येशूचा नम्रपणा, विनम्रशीलता दिसून येते. येशूच्या दु:खसहनाद्वारे देवाचे आपल्यावर असलेले प्रेम ह्याची प्रचीती येते. त्याच्या दु:खसहनाद्वारे त्याने आपल्या सर्वांचे तारण करून आपल्याला पापमुक्त केले आहे.

मनन चिंतन:

     ‘ह्यावर्षीचा उत्तम शुक्रवार मला भितीदायक वाटतो’, हे प्रामाणिक आणि साधे-सरळ वाक्य मला एका मुलाने सांगितले; जेव्हा तो त्याच्या प्रभूवरील श्रद्धेविषयी माझ्याशी संवाद करत होता. हे तो फक्त त्याच्यासाठी म्हटला नाही, त्याला काही कटू अनुभव आले असतील आणि हेच अनुभव आपल्यालासुद्धा आले असतील.
येशू प्रमाणे आपण कसा विचार करू? त्याला वल्हांडणाचे शेवटचे भोजन घेण्याची इच्छा झाली, पण गेथसमेनी बागेत प्याला पिण्यासाठी त्याचे मन हादरून गेले. जेव्हा भयानक वेळ आली, तेंव्हा तो एकदम सरळ आणि कणखर, त्या मुलासारखा नाखूष झाला, ज्याला पवित्र शुक्रवारची भीती वाटत होती. “हे पित्या, तुझी इच्छा असेल तर हा प्याला माझ्यापासून दूर कर, तरी माझ्या इच्छेप्रमाणे नको तर  तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे” (लुक २२:४२). त्याने जणू यातनेची चव अगोदरच घेतली होती. त्याला भीतीमुळे घाम फुटला, मात्र यशया संदेष्ट्याने अगोदरच भाकीत केल्यामुळे हा ‘आम्हाबरोबर देव’ मागे फिरणार नाही. एखाद्या वेढलेल्या सैनिकाप्रमाणे ज्याकडे स्वत:चे रक्षण करण्यासाठी ढाल नव्हती, तसाच तो जीवन आणि मृत्यूला  सामोरा जात होता. देवाचा, मानवरुपामध्ये असलेला अवतार ह्याची परीक्षा त्याने पूर्णपणे स्वत:ला वाहून आपल्यासाठी केला. ही तर आपली मानवी परिस्थिती आहे; कधी भव्य तर कधी विचित्र. आपल्याला झालेल्या जखमा भरून काढण्यासाठी फक्त औषधाच्या मलमपट्याने जखमा झाकत नाहीत. आपल्या पापांची मुक्तता करण्यासाठी फक्त आपण वाईट गोष्टी नाकारत नाही. तर मी तर दोषी नाही! मी तर दोषी नाही, असे आपण अनेकदा म्हणतो. ही जीवनाची कार्यपध्दती आहे. जेव्हा आपल्यावर संकटाचे वादळ येते, त्यावेळेस आपण दयेची याचना करत असतो. दु:खावलेलं मन स्वत:च सहन करतो. इतरांना दिलेल्या त्रासाबद्दल तर आपण काही म्हणतच नाही.    
     मनुष्य संकटापासून कसा पळून जाण्याचा प्रयत्न करील? आपण कधीच आपल्या मुलांना बाळगणार नाही त्यांचे पालन पोषण करणार नाही, कधीच कोणाला जन्म देणार नाही आणि जन्म घेणार नाही, ह्या जगात येण्याचा विचार करणार नाही की, ज्यामध्ये सततचे, दु:खे आणि अडी-अडचणी आहेत. त्यामुळे आपण कधीच कोणावर रडणार नाही, पण प्रभू येशूच्या बाबतीत असे तो नाही म्हणाला, ‘माझ्यासाठी रडू नका, तर स्वत:साठी रडा’ (लुक:२३-२८), असा त्याने येरुशलेमच्या स्रियांना सल्ला दिला; आणि तो पुढे म्हणाला, ‘स्वत:साठी व आपल्या मुलाबाळांसाठी रडा’ (लुक:२३-२८). म्हणूनच आपण आपणास झालेल्या दु:खामध्ये स्वत:साठी रडत असतो. आपल्याला झालेल्या मानसिक आणि शारीरिक त्रासाबद्दल, आपल्याला इतरांनी नाकारल्याबद्दल आणि आपली हानी केल्याबद्दल आपण एकटेच अश्रू ढाळत असतो. आपण आपल्या मुलांकरीता रडतो आणि ज्यांना मुले नाही त्यांकरीता सुद्धा रडतो. अश्रू हे सदृश असतात. आपण कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी ते आपल्याला दिसतातच. आपण कित्येक वेळा मरत असतो, आपण आपले हृद्य आणि अश्रू आपल्या युवकांसाठी गाळत असतो, आपल्या जवळच्या व्यक्तीच्या मृत्यूमुळे शोक करतो, मित्र-मैत्रिणींच्या दूर जाण्यामुळे, नाते तुटल्यामुळे, आपल्या आई-वडिलांच्या वेगळे राहण्यामुळे मन चिंतीत होऊन जाते. आपण प्रेमासाठी घाम गाळतो आणि दु:खामुळे रक्त वाहतो.
      मात्र तो ज्याला  आपल्यासारखे मानवी होण्याची काही गरज नव्हती, त्याने मानवी रुपाचा स्वीकार केला परंतु दु:खापासून पळून गेला नाही. त्याने गेथसेमनी बागेत प्रवेश करून एदेन बागेत झालेल्या आज्ञाभंगाला नवीन आज्ञाधारकतेची प्रतिमा दिली. सि.एस.लुईस त्यांच्या एका कवितेत लिहितात, ‘प्रेम हे डोळ्यांतील अश्रूंप्रमाणे उबदार आहे; अशांत, न बोलवलेले, स्वच्छ करणारे आणि समाधानी प्रेम हे वसंत ऋतूप्रमाणे नवीन असते: नवीन आणि ताजे-तवाने धीट आणि धाडसी; त्यांच्या कवितेची सांगता ते पुढील प्रमाणे करतात. प्रेम हे टोचलेल्या खिळ्यांप्रमाणे असह्य आहे. कदाचित आपण ह्या क्रुसाला घाबरलो असेल, पण कधीतरी आपण त्या तेजस्वी, उज्वल, अलंकित नोकराच्या समोर जाऊन त्याला धन्यवाद म्हणू, कारण त्याने माझ्या आणि  तुमच्यासाठी दुःखाच्या वेदना सहन केल्या होत्या.
     कल्पना करा की, तुमचे नाव जोरजोरात वाचले जात आहे तुम्ही शहरातील रस्त्यावरून जात आहात आणि तुम्ही सर्व लोकांना तुमच्याकडे आकर्षित केले आहे. तुम्ही एक महत्वाचे व्यक्ती आहात तुम्ही आंतरराष्ट्रीय स्तरावर पहिले नाव कमावले आहे. हा तर तुमच्यासाठी असामान्य अविश्वसनीय अनुभव असेल कारण सर्व लोक तुमची स्तुती व प्रशंसा करत आहेत.
      आता तुम्ही पुन्हा एकदा कल्पना करा की, तुमचे नाव जोरजोरात घेतले जात आहे पण ह्यावेळेस ते मात्र तुमची टीका करण्यासाठी, तुमची निंदा करण्यासाठी आणि लोकांनी तुम्हांला मारण्यासाठी, हा तर वेगळाच अनुभव तुम्हाला आला असेल. ह्या वेळेला तुम्हांला काय वाटत असेल? काहीकांनी अशा गोष्टीचा अनुभव घेतला आहे. नाझरेथकर येशूने मानवी जीवन धारण करून हे दोन्ही गोड आणि कटू अनुभव स्वीकारले. त्याला माहित होते की, परमेश्वराला मानवी आनंद आणि दु:ख ह्याची जाणीव आहे. त्यामुळे आपल्याला माहिती पडेल की, देव आपल्यासारखाच एक मानव होता.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

प्रतिसाद: हे प्रभू आमची प्रार्थना ऐक.
१. ख्रिस्तसभेची धुरा वाहणारे पोप महाशय, महागुरू, धर्मगुरू व सर्व व्रतस्थ ह्या सर्वांना ख्रिस्ताचा प्रकाश व त्याची सुवार्ता इतरांपर्यंत पोहचवण्यास शक्ती व सामर्थ्य लाभावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
२. ज्या देशांचे दुसऱ्या देशाबरोबर युद्ध चालू आहे, त्या देशातील पुढाऱ्यांनी आणि नागरिकांनी मित्रभावाने युद्ध संपुष्टात आणण्याचा नितिमय प्रयत्न करावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
३. उच्च पदावर असलेल्या अधिकाऱ्यांना पवित्र आत्म्याने प्रेरणा देऊन निस्वार्थाने गरीब व दुर्लक्षित झालेल्या लोकांची सेवा त्यांनी करावी आणि आपली संपत्ती त्यांच्या हितासाठी अर्पण करावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
४. जे लोक आजारी आणि विविध दु:ख सहन करत आहेत, त्यांच्यावर प्रभू परमेश्वर दया करो आणि आपल्या कृपेने चांगले आरोग्य प्राप्त करून जीवनामध्ये निराशी न होवो म्हणून आपण प्रार्थना करूया.
५. जे लोक आपल्या प्रियजनांच्या मृत्यूमुळे शोक करीत आहेत आणि दु:खी आहेत परमेश्वर त्यांचे सांत्वन करो आणि अनंत जीवनावर विश्वास ठेवावा म्हणून त्यांना वरदान देवो म्हणून आपण प्रार्थना करूया.
६. थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक व सामाजिक हेतूंसाठी प्रार्थना करूया.




No comments:

Post a Comment