Tuesday 8 October 2013

Suresh Alphonso hails from St. Gonsalo Garcia Parish, Gass. He belongs to the St. Bonaventure Capuchin Province, Maharashtra. Presently, he is pursuing his theological studies at JDV, Pune.  A man of deep faith and conviction, his homilies are presentation of his works among poor and needy. He is also well known for his paintings and arts.



सामान्यकाळातील अठ्ठाविसावा रविवार.
दिनांक:१३/१०/२०१३.                                                 
वर्ष-
राजे, :१४-१६.
२ तिमथि, :-१३.
लूक, १७:११-१९.
''जा तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे.''
प्रस्तावना:
आजची वाचने आपणास आपली ख्रिस्ती श्रद्धा बळकट करण्यास मदत करतात देवावरील विश्वास वाढवितात. देव माणसाचा न्याय त्याच्या विश्वासावरून करतो. देवाची तारणप्राप्ती जो त्याच्यावर विश्वास ठेवितो अशा सर्वासाठी बहाल केली आहे. जर आपल्याकडे मोहरीच्या दाण्याइतका विश्वास असेल तर परमेश्वर आपल्या जीवनात चमत्कार व अदभूत कृत्य घडवून आणू शकतो. ज्याप्रमाणे दहा कुष्ठरोग्यांना त्याच्या विश्वासामुळे नवीन जीवनाचे दान मिळाले त्याचप्रमाणे आज ख्रिस्तसभा आपणा सर्वाना आपला विश्वास दृढ करण्यास आवाहन करीत आहे.

पहिले वाचन( राजे, :१४-१६).
एलिशाच्या सांगण्यावरून नामान याने  यार्देन नदीमध्ये सात वेळा बुचकळ्या मारल्या तेव्हा त्याचे शरीर एका  लहान बालकाप्रमाणे झाले व त्याच्या कुष्ठ रोगातून त्याला मुक्ती मिळाली. नामान हा आपल्या धन्याच्या पदरी एक थोर प्रतिष्ठित मनुष्य होता परमेश्वराची कृपा त्याच्यावर होती ( राजे अध्याय :). त्यानंतर त्याने आपला देवावरील विश्वास व्यक्त केला आणि देवाचे आभार मानले. त्याने आश्वासन दिले कि यापुढे तो ह्याच देवाला आपली भेट अर्पण करणार.

दुसरे वाचन(२ तिमथि, :-१३).
संत पौल तिमथिला आठवण करून देतो कि येशु ख्रिस्त हा दाविदाच्या घराण्यातला असून तो खरा  मनुष्याचा व देवाचा पुत्र आहे आणि आपल्या सगळ्यासाठी तो क्रुसावर मरण पावला व मेलेल्यातून उठला. म्हणूनच संत पौल म्हणतो कि जरी आपण अविश्वासी राहिलो तरी तो विश्वसनीय राहतो ह्यास्तव जर आपण येशुबरोबर मरण पावलो तर त्याच्याबरोबर जिवंतहि राहू.  

शुभवर्तमान (लूक, १७:११-१९)
येशू हा येरुशलेमेस सामारिया गालिली ह्यांच्या सरहद्दीवरून जात होता. तेव्हा तो दहा कुष्ठरोग्यांना भेटतो बरे करतो. दहा हा पूर्ण अंक आहे असे आपण शास्त्रात पाहतो.
·        सदोम या नगरासाठी आब्राहाम देवाकडे मध्यस्थी करत असताना दहा चांगल्या लोकाद्वारे संपूर्ण नागरिकांना क्षमा करण्यास वर्तवितो (उत्पत्ती, १८:३२).
·    जुन्या करारात देव आपणास दहा आज्ञा देत आहे (अनुवाद, ) संपूर्ण इस्रायली जनतेबरोबर एक नवीन करार करत आहे.
·         मत्तय २५ मध्ये दहा कुमारीचा दृष्टांत आपणास दहा अंकाचे महत्व पटवून देत आहे.
अश्या प्रकारे दहा कुष्ठरोग्यांना बरे करून प्रभू येशु कुठलाही भेदभाव नसलेली देवाची माया दर्शिवत आहे. फरक इतकाच कि त्यापैकी फक्त एकच (शमरोनी मनुष्य) मागे फिरून येशूचे आभार मानत त्याच्या चरणाशी नतमस्तक होतो (लूक, १७:१६). ह्यावरून शमरोनी माणसाची देवावरील कृतज्ञता आपण पाहत आहोत. शमरोनी व्यक्ती कडून देवाचे आभार होणे अपेक्ष्यात नव्हते तरीही तो देवाचे आभार मानत परत येत आहे. ज्या ज्यू लोकांकडून आभाराची अपेक्षा केली जात होती ते मात्र हि गोष्ट विसरून जातात.
देवाची महिमा हा योग्य व उचित असा प्रतिसाद आहे. येशूचे आभार मानून त्याच्या चरणाशी शरण जाणे  हे येशूच्या कर्तुत्वाची जाणीव कृतज्ञ मनाची भावना होती. त्याला दाविद पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताची महंती कळली होती. असाच  प्रतिसाद ओवी २ राजे :१५ येथे आढळतो जेथे नामान कुष्ठरोगी बरा झाल्यावर देवाचा गौरव गाऊन आपला विश्वास प्रकट करतो.
दहा कुष्ठरोगी बहुतेक एकमेकांस प्रोत्साहन देण्यास एकमेकांच्या मदतीस जमले होते. त्यांना ख्रिस्ताकडून रोगमुक्त होण्यास मोठी मदत मिळणार होती ते त्याच अपेक्षेने एकत्र जमले होते. आणि म्हणूनच 'आम्हावर दया करा' असे मोठयाने ते ओरडत होते. आपण येथे दहा कुष्ठरोगी काही विशिष्ट अशी दया मागताना पाहत नाही. त्या दहा लोकांनी बहुतेक दुस-याकडून दान मागितले असेल. परंतू त्यांना येशूकडून बरे होण्याची म्हणजेच दयेची अपेक्षा होती.
·         'आम्हावर दया करा' ह्यांची तुलना लूक,१६:२४, १८:३८-३९ बरोबर करू शकतो.
·         ईयोब १९-२१ मध्ये ईयोब आपल्या मित्रांना विनंती करतो कि ''मजवर दया करा.''
·         होसेय : मध्ये देव म्हणतो, ''यहुदाच्या घराण्यावर मी दया करीन.''
·         योएल मध्ये आपण परमेश्वराची दया पाहतो.
·         मार्क१:४१ मध्ये येशूला कुष्ठरोग्यांची दया येते तो त्यांना शुध्द करतो.
·         मत्तय २०:३४ मध्ये दोन आंधळे येशूला विनवणी करतात, ''दाविदाच्या पुत्रा, आम्हांवर दया करा.''
आणि त्यामुळे 'दया करा' म्हणजे रोगमुक्त करा असे म्हणणे अयोग्य ठरेल. 'दया करा' यांचा व्यापक अर्थ येथे लक्षात घेणे जरुरीचे आहे. आम्हांला आमच्या समाजात स्थान द्या, देवाच्या राज्यांत सहभागी करून घ्या व देवाची कृपा आम्हावर सुद्धा असावी अशी विनंति 'दया' या शब्दाद्वारे मांडली जात आहे.
ओवी १७-१८ मध्ये आपण पाहतो कि येशू त्यांना बरे केल्यानंतर सांगतो कि, ''जा तुम्ही जाऊन स्वत: याजकांना दाखवा.'' लूक ५:१४ शी तुलना केली तर 'याजक' हे अनेक वचन होय. कारण येथे येशूने कुष्ठरोग्याला बरे केले त्याला निक्षून सांगितले, ''कोणाला सांगू नकोस तर जाऊन स्वत: याजकाला दाखव''. येशूला असे वाटत होते की शमरोन्यांने एखादया शमरोनी याजकाकडेच जावे. कारण शमरोनी याजक हे अव्यवहार्य होते. कुष्ठरोग्याला समाजात स्थान व याजकाला आपल्या कर्तुत्वाची जाण असे दोन हेतू एकाच क्रियेमध्ये येशू साधत आहे.
पुढे १७-१९ मध्ये येशू म्हणतो की, 'तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे'. लूकच्या शुभवर्तमानात विश्वास हा जवळ किंवा जपून ठेवण्यापेक्षा तो ख्रिस्तशास्त्राची ओळख करून देतो व येशूवरील विश्वास - प्रभू ख्रिस्त, देवाचा पुत्र जो मेलेल्यांतून उठला पुन्हा येईल - ह्याचा संदर्भ देतो. 'तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे' हे कुशलरित्या देवाच्या प्रेमामध्ये जोडण्यात आले आहे (लूक, :२०), देवाच्या राज्यात प्रवेश (१८:२४-२५) आणि वारसहक्कानी सार्वकालीन जीवन (१८:१८-३०).

मनन चिंतन (जीवनासाठी):
. देवाचे आभार कसे मानावेत?:
आजच्या शुभवर्तमानात आपण उपकार, आभार रोगमुक्त होण्याविषयी ऐकतो व दहा कुष्ठरोगी शुध्द झालेले पाहतो. पण त्यांच्यातला फक्त एक जण प्रभूचे आभार मानण्यासाठी मागे फिरतो. असे का झाले? कारण आभार मानण्यासाठी जो आला होता, त्याने  ख्रिस्त जाणला होता व अनुभवला होता. त्याला खरा मसिहा दाविदपुत्र येशू कळला होता त्याचा बरे होण्याचा स्पर्श प्राप्त झाला होता. त्याला आता त्याच्या कृर्तत्वाची जाणीव झाली होती येशू हा देवाचा पुत्र, जगाचा तारणारा आजा-यांना बरे करणारा हे त्याला चांगले ठाऊक झाले होते.
कुष्ठरोग हे आपल्या दुर्बलतेचे, आजारीपणाचे, आपल्या पापाचे लक्षण होय. गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी प्रभू येशू या जगात आला. त्याने रोग्यांना बरे केले. आपल्या सर्वांच्या पापासाठी आपला प्राण दिला आपली श्रध्दा बळकट करण्यासाठी तो मरणातून उठला जिंवत झाला. आपण ह्यासाठी प्रभूचे आभार मानले पाहिजेत. -याचवेळेला आपल्याला अनेक अडचणींना, संकटांना सामोरे जावे लागते, जीवनात मोठे संकटं आल्यावर आपण देवाला स्मरतो, त्याला शरण येतो, व नवस बोलतो. जो जिकडे सांगेल तेथे देवाला शोधण्यास धाव घेतो, प्रार्थनेचा डोंगर करतो व शेवटी त्या रोग्यांप्रमाणे प्रार्थना करतो हे येशू, आम्हांवर दया कर, आमच्या पापांची क्षमा कर, ह्या संकटातून आम्हाला मुक्त कर. आणि परमेश्वर आपली प्रार्थना ऐकतो, आपल्यावर दया करतो आपले संकट दूर करतो. पण आपण त्या शमरोन्यासारखे आभार मानतो का? त्या नऊ कुष्ठरोग्यांसारखे आपण देवाकडे पाठ फिरवतो का? आपली गरज भागल्यानंतर आपण देवाला विसरतो. आपण देवाच्या कार्याचे आभार मानत नाही. आभार हा हक्क नव्हे तर कुतज्ञता आहे. ती बळजबरीने नव्हे तर स्वखुशीने व स्वमनाने दर्शिविली जाते. ती उपकार फेड नाही. ती तर ज्याने कृपेची किमया केली आहे त्याची आठवण आहे. आणि म्हणूनच त्या उपकारकर्त्या देवाची आठवण करणे अगत्याचे आहे.
. आपल्या कार्यातील देवाचे आभार:
आज सर्व ठिकाणी पवित्र आत्माची चळवळ फोफावली आहे. -याच लोकांना देवाच्या प्रेमाचा स्पर्शाचा अनुभव येतो. काही आध्यात्मिक दान प्राप्त करतात. प्रभूच्या मळ्यात कार्य करताना अनेक संकटांना तोंड दयावे लागते. सुवार्तेच्या कार्यात अनेक अडथळे येतात किंवा आणले जातात तसेच काही वेळा विरोध सहन करावा लागतो. अशावेळी आपण प्रभूचा धावा करतो. प्रभूला शरण गेल्यावर त्याचे वचन आपल्याला प्राप्त होते आणि त्या वचनाद्वारे आपण सर्व प्रकारचे दु: सहन करण्याचे सामर्थ्य मिळवितो.
संत पौल फिलीपीकरांस पत्रात म्हणतो, ''प्रभू मध्ये सर्वदा आनंद करा.'' म्हणजेच आपली सर्व विनंती व स्तुती आभार प्रदर्शनासह देवाला कळवा. संत पौल ख्रिस्ताच्या दर्शनानतंर पूर्णपणे बदलले  व त्याने ख्रिस्ताच्या कार्याला पूर्णपणे वाहून घेतले. जेव्हा त्याला संकटे आली, दु: इतर अडचणी आल्या तेव्हा त्याने प्रभूचे आभार मानले तो यशस्वी होत गेला. आपल्याला सुध्दा ख्रिस्त सापडला आहे. आपणसुद्धा पौलासारखे आभार मानूया. पौल करिंथीकरास पत्रात म्हणतो जर हात, पाय, डोके, डोळे, कान म्हणतील आम्ही शरीराचे अवयव नाही तर माणसाचे शरीर होऊ शकत नाही. तसेच जर आपण काम केले नाही तर आपणाला खाण्याचा अधिकार राहत नाही. त्याप्रमाणे जर आपण आभार मानले नाहीत तर आपण खर्या अर्थाने ख्रिस्ती धर्म अंगीकारत नाही. त्यामुळे सदासर्वकाळ प्रभूचे आभार मानणे हे आपले आदय ख्रिस्ती कर्तव्य आहे.

बोधकथा
एक शिक्षक आपला अनुभव सांगत होता की  त्याचे सारे आयुष्य शिक्षकी पेशात गेले. अनेकांचे जीवन फुलविले. बहरविले आकार दिला. अनेकांच्या निराशमय जीवनात आशेची मंगल ज्योत पेटविली. काही उच्च पदावर पोहचले. माझ्या प्रेरणेमुळे चांगल्या पदावर काम करणा-या एका व्यक्तीला माझी आठवण झाली. एक दिवस त्याने मला एक आभार पत्र सप्रेम भेट वस्तू पाठविली. बघून मन भरून आले. खूप बरे वाटले कृतघ्न झालो. परंतू मी त्याला पत्रात लिहिले, माझ्यामुळे अनेक विदयार्थ्यांना पुष्कळ फायदा झाला तू एकटाच नव्हता इतर खूप विदयार्थी होते; पण आभार पत्र लिहणारा तू एकटाच निघालास. इतर कुठे गेले?

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
आपले उत्तर: हे प्रभो तुझ्यावरील आमचा विश्वास दृढ कर.
. अखिल ख्रिस्तसभेची धुरा वाहणारे आपले पोप महाशय, सर्व कार्डिनल्स, बिशप, धर्मगुरू धर्मभगिणी ह्यांच्या प्रेषित कार्यावर देवाचा आर्शिवाद असावा ख्रिस्तसभेचे कार्य नेहमी पुढे जात राहावे म्हणून प्रार्थना करू या.
. आपल्या देशात जे धर्मगुरू धर्मभगिणी मिशन विभागात कार्य करतात त्यांना त्यांच्या मिशन कार्यात प्रभूची मदत मिळावी सर्व संकटांना सामोरे जाण्यास धैर्य मिळावे म्हणून प्रार्थना करू या.
. आपल्या सर्व राजकीय नेत्यांनी आपला राजकीय धूर्तपणा सोडून तसेच भष्टाचार इतर सर्व वाईट मार्ग सोडून निस्वार्थीपणे लोकांची देशाची सेवा करावी, म्हणून प्रार्थना करू या.
. आपल्या देशात खून, चो-या, मारामा-या, बलात्कार इतरांची छळवणूक पिळवणूक होते, बाँम्बस्फोट दंगली होतात त्या थांबाव्यात सर्वात प्रेम पसरून  सर्वांनी बंधूप्रेमाने राहावे सर्वत्र शांतीचे राज्य यावे म्हणून प्रार्थना करू या.
आपण आपल्या वयक्तिक गरजा प्रभू चरणाशी ठेवूया .

11 comments: