Wednesday 4 December 2013



Manuel Fernandes hails from Our Lady of Victories, Mahim, Mumbai. He belongs to the St. Bonaventure Capuchin Province, Maharashtra. This down to earth homily is expression of his being imbibed in Franciscan spirituality and his love towards nature.





आगमन काळातील दुसरा रविवार            
०८ -१२- १३
वर्ष-
यशया ११ : - १०
रोमकरासपत्र १५ : -
मतय   : -१२

प्रस्तावना:
आज आपण आगमन काळातील दुसरा रविवार साजरा करीत आहोत. आजच्या उपासनेची  तिन्ही  वाचने  येणा-या  मसिहावर आपले लक्ष केंद्रित करतात. यशया संदेष्टा आजच्या पहिल्या वाचनात म्हणतो कि 'जेव्हा प्रभू येशु येईल तेव्हा तो दुबळ्यांचा न्याय यथार्थतेने करील आपल्या मुखाच्या फुंकराणे दुर्जनांचा संहार करील; धार्मिकता त्याचे वेष्टन सत्यता त्याचा कमरबंद होइल.' दुसरीकडे संत पौल म्हणतो; 'तुम्ही एकमताने एकमुखाने आपल्या प्रभू येशु ख्रिस्ताचा जो पिता आणि देव त्याचा गौरव करा ज्या प्रमाणे प्रभू येशु ख्रिस्ताने तुमचा स्वीकार केला तसाच तुम्हीही एकमेकांचा स्वीकार करा.' संदेष्टा योहान बाप्तीस्ता आजच्या शुभवर्तमनात म्हणतो; 'माझ्यापेक्षा समर्थ जो येत आहे तो तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने करिल; म्हणुन पश्याताप करा, देवाकडे वळा देवासाठी मार्ग तयार करा.' देवासाठी मार्ग तयार करणे म्हणजे देवाच्या इच्छेला आपल्या जीवनात प्राधान्य देऊन आपल्या मनाची हृदयाची आध्यात्मिक तयारी करणेप्रभूचा मार्ग तयार करण्यासाठी त्याला योग्य रीतीने स्विकारण्यासाठी या पवित्र मिस्सबलिदानात विशेष प्रार्थना करू या.

सम्यक विवरण : मत्तय : १२

.     बाप्तिस्मा करणारा योहान एका महत्वपूर्ण धार्मिक चळवळीचा प्रणेता होता. भावी काळात देव न्यायनिवाडा करणार या -या जाणीवेने त्याने पश्चातापाचे आवाहन केले. देवाचे लोक ह्या नात्याने इस्राएल देवाच्या पाचारणाशी विश्वासू राहिले नाही. त्यांचे वर्तन मागे होते तसेच आत्ताही राहिले त्यात बदल झाला नाही असा स्पष्ट इशारा त्याने दिला आहे. आपण आब्राहामाची मुले (मत्तय :) आहोत असे गर्वीन्याऱ्या  लोकांना तो बजावीत आहे कि न्यायातून सुटून जाण्यासाठी केवळ यहुदी असल्याचे निमित्त पुरेसे नाही. यहुदी म्हणून न्याय होणे टळणार नाही हेच तो सांगत आहे. ह्या आवाहनाला प्रतिसाद देणा-यांना बाप्तिस्मा देण्याची त्याची रीत होती. त्यामुळे बाप्तिस्मा घेणारे 'अवशिष्ट' लोक ठरले जात. हेच आता देवाच्या -या  लोकांचे प्रातिनिधिक  होते. इस्रालयात सामील होणा-या पराराष्टीयांनाही असाच बाप्तिस्मा घेणे अगत्याचे होते.
योहानाचे कार्यध्येय ह्यामधील सात्तत्य, सहसंबंध दाखवण्याची दक्षता मत्तयने घेतली आहे. मत्तय : "पश्चाताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे." ही योहानाची घोषणा मत्तय :१७"पश्चाताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले" ह्या  येशूच्या घोषणेसारखीच आहे. पुढे येशूच्या शिक्षणातही योहानाच्या शब्दांचे पडसाद उमटलेले दिसतात (मत्तय १२:३४,२३:३३). यहुदी वंशात जन्म झाला एवढ्यावरच विसंबून राहणे पुरेसे नाही ह्या योहानाने दिलेल्या इशा-याला मत्तय :१०-१२ मधून ठाम दुजोरा दिला आहे. हे लक्षात घेता योहान केवळ येशूच्या आगमनाची घोषणा करणारा नव्हता. त्याने येशूच्या भावी कार्यध्येयाचा आरंभ केला तथापि योहान हा केवळ निरोप्या होता हे यशया ४०: ह्या ओवीतून स्पष्ट होते. तसेच जो येत आहे तो माझ्यापेक्षा समर्थ आहे (मत्तय :११)ह्या शब्दांनी याला दुजोरा मिळतो. पाणी आणि पवित्र आत्मा(मत्तय :११) ह्याच्या भेददर्शक तुलनेने खरे आध्यात्मिक नवीकरण याशुच्या सेवाकार्यातून होणार ह्याविषयी शंका उरत नाही.

.     पश्चाताप करा ह्या शब्दाचा जुन्या करारामध्ये हिब्रू शब्दशूबअसा आहे त्याचा अर्थ "परत मागे फिरणे" (return) असा आहे. 'परत मागे फिरणे' यामध्ये दोन अर्थ दडले आहेत. ) पापापासून मागे फिरणे (turn from sin) म्हणजेच अत्याचार, अन्याय, लबाडी, लुबाडणे,गैरफायदा घेणे, मुर्तिपूजा, विश्वासघात ह्याकडे पाठ फिरवणे. ) देवाकडे परत येणे [turn to God] - संपूर्ण तन-मन-धनाने विश्वासपूर्वक अंतकरणाने देवाला शरण जाणे.
देवाचे संदेष्ष्टे विशेषता यिर्मया, यह्ज्केल, होशेय, आमोस ह्यांनी इस्रायलच्या लोकांनी पश्चाताप करावा म्हणून अनेकदा उपदेश केला. पश्चाताप देवावरील विश्वास ह्या दोन्ही गोष्टी एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत: पश्चातापाने मनुष्य देवाकडे वळतो, विश्वासाने तो देवाला शरण जातो, देवाच्या हाती आपले सर्वस्व सोपवतो केवळ त्याच्यावरच अवलंबून राहतो. नव्या कराराच्या शिकवणीनुसार पश्चातापी मनुष्य देवाकडे वळतो तो येशु ख्रिस्तामध्ये देवाला भेटतो त्यावर विश्वास ठेवतो. प्रेषितांची कृत्ये :३८ मध्ये पेत्र येरुसलेमेत जमलेल्या यहुद्यास म्हणतो ''पश्ताताप करा तुमच्या पापक्षमेसाठी येशु ख्रिस्ताच्या नावे बाप्तिस्मा घ्या''. इस्रायल लोक देवाची उपासना, रूढी संप्रदाय यांना महत्व देत असत परंतु त्यांना आपल्या पापांविषयी काही वाटत नसे त्यांना फक्त धर्माचा गर्व होता. त्यांनी पश्चाताप करून येणा-या मसिहास स्विकारण्यास तयार व्हावे अशी घोषणा योहानाने केली. तो गरीब होता तरी पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने त्याने देवाचा संदेश दिला शेकडो लोक स्वःताची पापे पदरी घेऊन पश्चाताप करू लागले.

बोधकथा

एका धर्मगुरूच्या खोलीमध्ये एक भल मोठ चित्र लावलेले होते, त्या चित्रामध्ये येशु क्रुसावर टांगलेला असा दाखवलेला होता तर योहान बाप्तीस्ता त्या क्रूसावरील येशूकडे बोट दाखवत होता. एके दिवशी एका माणसाने त्या धर्मगुरूंना विचारले कि तुमचे काम काय आहे, तुम्ही काय कार्य करता? तेव्हा ते धर्मगुरू त्या चित्राजवळ जाऊन योहान बाप्तीस्ताच्या बोटाजवळ आपले बोट ठेवत म्हणतात 'हे माझे काम आहे'.(या बोधकथेत जे धर्मगुरूंनी उत्तर त्या माणसाला दिले ते एकदम योग्य आहे. हे काम फक्त धर्मगुरूंचेच नव्हे तर आपणा सर्वांचे आहे. बोट दाखवणे म्हणजे चुका काढणे असेच नव्हे तर एखाद्या रांगळना-या बालकाला जशी एखादी माता बोट पकडून चालवते तसेच वाट चुकलेल्या व्यक्तीला परमेश्वराकडे आणणे, त्यांना मार्ग दाखवणे.)

मनन चिंतन
देऊळ मातेने आपल्याला ह्या आगमन काळात चार आठवडे दिले आहेत जेणेकरून आपला तारणारा देव स्व:ताचे सर्व वैभव सोडून आपल्या प्रेमाखातर ह्या भुतलावरती येणार आहे, त्याला अभिवादन त्याचे स्वागत करण्यासाठी आपण नेहमी तयार असलो पाहिजे. जर आपल्याला लांबच्या प्रवासाला जायचे असेल तर आपण त्यासाठी बरेच धडपडतो. प्रत्येक गोष्ट घेतली आहे कि नाही ह्याची पुन्हा पुन्हा पडताळणी करून बघतो. जर आपण ह्या जागतिक गोष्टींची एवढी तयारी करत असू तर प्रभूला स्विकारण्यासाठी किती तयारी केली पाहिजे?

आजची तिन्ही वाचने आपल्याला एकच संदेश देत आहेत तो म्हणजे जो प्रभू येणार आहे त्याचा मार्ग तयार करा. हा संदेश फक्त आजच आपल्याला दिलेला नाही तर देवाचा पुत्र ह्या भुतलावर येण्या अगोदर वेगवेगळ्या संदेष्ट्याद्वारे देण्यात आला. आजच्या शुभवर्तमानामध्ये आपण एकतो कि योहान बाप्तीस्ता आपल्या पापांचा पश्चाताप करून प्रभूचा मार्ग तयार करण्यास आवाहन करत आहे. संत अगुस्तिन म्हणतात, ''जेव्हा आपण आपल्या पापांचे प्रायश्चित करायला सुरवात करतो त्याचवेळी आपण चांगल्या कार्याची सुरवात करतो.'' योहान बाप्तीस्ता हा नेता नव्हता अथवा कुठला महान व्यक्ती नव्हता, पण त्याने काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्या ह्या प्रयत्नाने  लोकामध्ये फरक दिसून आला कारण भरपूर लोक त्याच्या जवळ येऊन, पापांची क्षमा मागून, पाण्याने आपला बाप्तिस्मा करून घेऊ लागले. योहानाने लोकांना प्रायश्चित करायला सांगून प्रभूचा  मार्ग तयार करायला सांगितलेपण प्रभूचे येणे आपल्या इच्छेवर अवलंबून राहत नाही. आपण नेहमी त्याच्या स्वागतासाठी तयार असायला हवे. कारण असे म्हटले  जाते कि 'प्रयत्नांती परमेश्वर' आणि जर आपण प्रयत्नच केले नाही तर आपल्याला यश  मिळणे कठीण आहे. उदारणार्थ, डोंगर चढण्यासाठी प्रत्येक पाऊल महत्वाचे असते. आपण नेहमी चांगल्या मार्गाने जगण्यासाठी झटत असतोपण हि माझी तड-जोड योग्य दिशेने चाललेली आहे का हे पडताळने तेवढेच महत्वाचे आहे. रस्त्यावर काहीतरी शोधण्या-या आपल्या व्यक्तीला एक मित्र विचारतो, 'तू काय शोधतो?' तेव्हा व्यक्ती म्हणते, 'माझ्या घराची चावी हरवली आहे.' पुन्हा त्याचा मित्र त्याला विचारतो, 'तुझी चावी इथे हरवली आहे का?' तेव्हा तो म्हणतो, 'नाही, माझी चावी त्या कोप-यात हरवली आहे पण येथे प्रकाश आहे म्हणून मी येथे शोधत आहे.' आपल्या जीवनातील अंधाराकडे दुर्लक्ष करून काल्पनिक प्रकाशाकडे आपले मन भरारी मारत असताना आगमन काळ आपल्याला आपल्या वस्तुस्थितीची जाणीव करून देत आहे. पश्चतापी अंतकरणाने वाईट सवयी बाजूला सारून परमेश्वराचा धास घेण्यास ख्रिस्तसभा आपणां सर्वास प्रवृत्त करित आहे.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना
प्रतिसाद: हे प्रभू आमची प्रार्थना  ऐकून  घे
१. आपल्या धर्माची धुरा वाहणारे पोप, बिशप, धर्मगुरू आणि धर्मभगिनी ह्या सर्वांनी प्रभूच्या मार्गाची घोषणा करून प्रभूचा मार्ग तयार करण्यासाठी लोकांना मदत करावी म्हणून आपण प्रार्थना करू या.
२. जे तरुण-तरुणी देवापासून दूर गेलेले आहेत त्यांना प्रभू-प्रेमाचा स्पर्श होऊन त्यांनी जागतिक मार्ग सोडून प्रभूच्या मार्गावर चालावे म्हणून आपण प्रार्थना करू या. 
३. आजच्या उपासनेमध्ये सहभागी झालेल्या सर्व भाविकांनी ह्या आगमनकाळात ख्रिस्तीजीवनावर मननचिंतन करून सर्व वाईटापासून व मोहापासून दूर राहावे म्हणून आपण प्रार्थना करू या.
४.सर्व डॉक्टरानी त्यांच्या सेवा कार्याचे महत्व जाणून घेऊन निस्वार्थीपणे आजारी लोकांची सेवा करावी म्हणून आपण प्रार्थना करू या.   
५.आपण आपल्या वयक्तिक हेतूसाठी प्रार्थना करू या.



8 comments: