Reflections for the Homily of Second Sunday of Easter (19-04-2020)
By Br. Brijal Lopes.
पुनरुत्थान
काळातील दुसरा रविवार
दैवी दयेचा
रविवार
दिनांक:
१९/०४/२०२०
पहिले वाचन:
प्रेषितांची कृत्ये २:४२-४७
दुसरे वाचन: १पेत्र
१:३-९
शुभवर्तमान: योहान
२०:१९-३१
प्रस्तावना:
आज
आपण पुनरुत्थान काळातील दुसरा रविवार साजरा करीत आहोत. हा रविवार दैवी दयेचा रविवार
सुद्धा म्हणून साजरा केला जातो. ह्या सणाच्या नोव्हेनाची सुरुवात गुड-फ्रायडे
किंवा उत्तम शुक्रवार पासून सुरू करण्यात आलेली आहे. प्रत्येक निर्मित केलेली व्यक्ती
ही देवाला प्रिय असते. त्याला देवाने दिलेली एक महान देणगी म्हणजे विश्वास, आशा व
प्रेम आहे. प्रेमाने प्रत्येक मनुष्य देवाकडे ओढला जातो; कारण संत फाँस्तीनाला
प्रकट झालेल्या दैवी दयेने भरलेल्या ख्रिस्तामुळे. त्या म्हणतात की, परमेश्वराचे
मानवावरील असलेले अस्सीम प्रेम, दया व क्षमा ह्यामुळे आपण पापापासून दूर राहून
परमेश्वराच्या अधिका अधिक जवळ येण्यासाठी तो आपणास आमंत्रित करीत आहे.
आजची
उपासना आपणा सर्वांना परमेश्वराची आपल्यावर असलेल्या अमर्याद प्रेम, दया, करुणा, व
क्षमा ह्या विषयी सांगत आहे. विश्वासाद्वारे व दैवी क्षमेद्वारे आपण सर्वांनी
ख्रिस्ती मुल्ये जोपासून सुंदर समाज निर्माण करण्यासाठी ख्रिस्तसभा आपणास आमंत्रित
करीत आहे.
सम्यक
विवरण:
पहिले
वाचन: प्रेषितांची कृत्ये २:४२-४७
आजचे
पहिले वाचन ‘ख्रिस्ती मंडळाचे धार्मिक जीवन’ ह्यावर मार्गदर्शन करीत आहे. ह्या
वाचनात आपण चार प्रकारचे महत्वपूर्ण वैशिष्ट्ये ख्रिस्तमंडळात कशा प्रकारे
दाखवलेले आहेत हे आपण समजून घेणार आहोत. ते पुढील प्रमाणे.
१) चर्च: विश्वासूपणे शिष्य त्यांच्या
शिकवणुकीवर भर देत होते.
२) सामाजिक जीवनातील चर्च: चर्चच्या शिकवणुकीनुसार
सर्वजण एकमेकांशी समानतेने व गरिबांची काळजी घेणारे चर्च.
३) प्रार्थनामय चर्च: पवित्र भाकर मोडून व त्या
भाकरीत वस्ती करणाऱ्या ख्रिस्ताचे प्रार्थनेद्वारे पाचारण करणे.
४) एक हर्षभरित व आनंदित असणारे चर्च: देवाचे
आभार म्हणून लोकांत आनंद मानणारे. अशा प्रकारची ही वैशिष्ट्ये आजच्या वाचानाद्वारे
आपणासमोर ठेवलेली आहेत.
दुसरे वाचन: १पेत्र
१:३-९
आजच्या
दुसऱ्या वाचनात संत पीटर आपल्याला ख्रिस्तमंडळाची ओळख, निष्ठा व प्रतिष्ठा ह्याविषयी
सांगत आहे. विश्वास ह्याद्वारे देवाची तारणदायी योजनेद्वारे मानवाला दिलेली
महत्त्वाची भेट म्हणजे कृपा आहे. ह्या कृपेद्वारे व विश्वासाद्वारे आपण
ख्रिस्तासाठी मौल्यवान ठरावेत ह्याविषयी आपणास सांगण्यात येत आहे.
शुभवर्तमान: योहान
२०:१९-३१
आजच्या
शुभवर्तमानात संत योहन ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाबद्दल, भीतीने घाबरून गेलेल्या शिष्यांबद्दल
व संत थॉमसच्या ख्रिस्ताच्या पुनरूत्थानावरील शंकेबद्दल सांगण्यात आलेले आहे.
ख्रिस्त पुनरुत्थित झाल्यावर शिष्यांचे आनंदी चेहरे व त्यातून त्यांचा विश्वास ह्याबद्दल
आपणास सांगण्यात आलेले आहे. ज्यावेळी ख्रिस्त शिष्यांना प्रकट झाला; त्यावेळी ख्रिस्ताने
त्याच्या प्रिय शिष्यांना नूतनीकरणाचे दान, पापांपासून क्षमा मिळवण्याचे व सर्वात
महत्त्वाचे म्हणजे ख्रिस्ताच्या शांतीचे दान त्यांना प्रदान केले. ख्रिस्ताच्या
पुनरूत्थाना अगोदर व त्याच्या पुनरुत्थाना नंतरची परिस्थिती ह्या वाचना द्वारे आपणा
समोर ठेवण्यात आली आहे.
बोधकथा:
मेरी
व विल्सन यांचे एक छान कुटुंब होते. प्रेम विवाह असल्यामुळे ते अगदी
आनंदात होते. एकमेकांशी चांगले राहत होते. परंतू लग्नाअगोदर ते एकमेकांना “मी तुझ्यावर प्रेम करतो, करते असे ते
एकमेकांना म्हणायचे. पण लग्न होऊन दहा वर्ष झाली तरी सुद्धा मेरी आसुसलेली व
अक्षरशा थांबली होती की, विल्सन मला “मी तुझ्यावर प्रेम करतो,” असे म्हणेल. ह्या
आशेवर असताना एक दिवस मेरी विल्सनला म्हणाली, “की तू माझ्यावर प्रेम करतोस का?”
मेरीने इतक्या वर्षानंतर हा प्रश्न विचारल्या नंतर तो स्तब्ध झाला आणि तिला
विचारले कि, “तू हा प्रश्न का विचारत आहेस?” त्यावर तिने प्रत्युत्तर दिले की, “तू
मला गेली दहा वर्षे ‘मी तुझ्यावर प्रेम करतो’ असे कधीच म्हणाला नाहीस म्हणून.
परंतु त्याने तिला म्हटले की, “जेव्हा आपलं लग्न झालं तेव्हा मी तुला ‘मी तुझ्यावर
प्रेम करतो’ असे म्हणालो तेवढे पुरेसे नव्हते काय?” पण त्यावर ती उद्गारली की, “तुम्ही
पुन्हा म्हणा, मला ते ऐकायला फार आवडते.” तिचे हे प्रेमळ शब्द ऐकून त्याला खूप
आश्चर्य वाटले व त्या आनंदभरीत हर्षाने म्हटले की, “मी तुझ्यावर प्रेम करतो.” असे
बोलून पुढे तो म्हणाला की, “आता तुझे समाधान झाले आहे का?” आणि ताबडतोब तिने उत्तर
दिले की, “मी तुला सांगितले होते म्हणून तू म्हणालास की, तू खरोखर तुझ्या अं:तकरणातून
म्हणाला आहेस?”
मनन
चिंतन:
ख्रिस्ताठायी
माझ्या प्रिय बंधु आणि भगिनींनो ह्या बोधकथेद्वारे आपणास जाणवते की, कशाप्रकारे
आजची श्रद्धावंत भाविक किंबहुना भाविक हे एक प्रबळ पुरावा शोधत आहेत. कशाचा पुरावा?
तर आपण जे ऐकतो, जे पाहतो किंवा स्पर्शाने
आपण पुरावे एकत्र करतो; तेव्हा ती गोष्ट किंवा घटना ही आपण विश्वासाने, श्रद्धेने
व पूर्णत: स्विकारत असतो. ह्या विषयीचा पुरावा. त्याद्वारे आपण सत्य परिस्थिती स्विकारत
असतो.
प्रेषित
थॉमस ह्यांची अवस्था ही आपल्या प्रमाणे आहे. ती म्हणजे ज्या अवस्थेमध्ये आपण आहोत
किंवा ज्या प्रसंगांमध्ये आपण आहोत, तो प्रसंग किंवा अवस्था आपण टाळतो किंवा त्याचा
स्विकार करण्यासाठी आपली इच्छा होत नाही. येशूच्या प्रेषितांनी व शिष्यांनी थॉमसला
येशूच्या पुनरुत्थानाबद्दल सांगितले तेव्हा त्याने त्याच्या प्रभूच्या पुनरुत्थानाबद्दल
पुरावा मागितला. अर्थात ठामपणे व स्पष्टपणे सांगितले, “त्याच्या हातात खिळ्यांचे व्रण
पाहिल्यावाचून, खिळे होते त्या जागी आपले बोट घातल्यावाचून आणि त्याच्या कुशीत
आपला हात घातल्यावाचून मी विश्वास धरणारच नाही.” पण जेव्हा ख्रिस्त पुन्हा
त्याच्या शिष्यांना भेटतो, तेव्हा थॉमस देखील त्यांच्यात हजर असतो. आणि येशू
शिष्यांमध्ये हजर असलेल्या थॉमसला सांगतो, तेही सौम्य फटकाराद्वारे ख्रिस्त म्हणतो
की, “तू आपले बोट इकडे कर व माझे हात पहा. आपला हात पुढे करून माझ्या कुशीत घाल
आणि विश्वासहीन होऊ नकोस तर, विश्वास ठेवणारा हो.”
ख्रिस्त
आपणाकडून काय अपेक्षा करत आहे? तो आपणास सांगत नाही की, पाठपुरावा करू नका किंवा
कोणतीही गोष्ट अंधपणाद्वारे किंवा कोणत्याही प्रकारची कारणे नसताना व निर्लज्य
होण्यास प्रोत्साहन करत नाही. तर, ख्रिस्त आपणास ‘साधी राहणी व उच्च विचारसरणी’ ह्या
प्रकारे जीवन जगण्यास आमंत्रण करीत आहे. ह्याद्वारे ख्रिस्त आपणास सांगत आहे की,
प्रत्येक प्रसंगाला किंवा घटनेला पुरावे मागून किंवा ते सिद्ध करून सुंदर व आनंदी
जीवन जगता येत नाही. तर, व्यक्तीचा व्यक्तीवर असलेला विश्वास महत्वाचा आहे.
थॉमस
ह्याचा विश्वास हा एका लहान बालकाप्रमाणे होता. कारण, जे इतर शिष्यांनी पाहिले ते
पाहण्यासाठी तो फार उस्तुक होता. पुनरुत्थित ख्रिस्ताला पाहण्यासाठी थॉमसचा संशय
हा एक आपणासाठी आशीर्वाद होता. वेश बदलणारा नव्हता, त्याचा संशय आपणासाठी पुनरुत्थित
ख्रिस्ताचा अनुभव मिळाल्यावर व ठामपणे विश्वास ठेवल्यावर प्रेषित केवळ एकाच जागेवर
राहिले नाहीत तर त्यांनी ख्रिस्ताची सुवार्ता संपूर्ण जगाला दिली. थॉमसने भारतामध्ये
येऊन देवाची योजना त्यानी साकारली व त्यात त्याने विश्वासाचा पाया रोवला. तोच
विश्वास संत थॉमसने पूर्णपणे मातीत रुजवला, फुलवला आणि बहरला.
आपण
देखील ख्रिस्तामध्ये एक होऊन त्याची सुवार्ता, दया, करुणा, ममता व प्रेम
इतरांपर्यंत आपल्या कार्याद्वारे व आपल्या वागणुकीद्वारे देता यावे म्हणून प्रयत्न
करूया. दैवी दयेचा रविवार हा केवळ मुखाने नव्हे तर, दैनंदिन जीवनात आपल्या कृतीने
व आपल्या वागणुकीद्वारे इतरांपर्यंत पोहोचवावे म्हणून आपण ह्या दानांकारीता
प्रार्थना करूया. तसेच कोरोना ह्या महाभयंकर आजारामुळे भरपूर लोकांचे बळी गेले
आहेत व अजूनही लोक त्या आजाराचा सामना करत आहेत, अशा सर्वांसाठी विशेष प्रार्थना
करूया.
विश्वासू
लोकांच्या प्रार्थना
प्रतिसाद: “हे
प्रभू आमची श्रद्धा दृढ कर.”
१. आपले परमगुरु पोप फ्रान्सिस, कार्डीनल्स,
बिशप्स, धर्मगुरू व व्रतस्थ ह्यांच्यावर परमेश्वराचा भरघोस आशीर्वाद असावा,
त्यांना चांगले आरोग्य लाभावे, त्यांच्यावर सोपवलेल्या जबाबदाऱ्या, नैतिक मूल्ये व
परमेश्वराची दया व करुणा इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी परमेश्वराने त्यांना सहाय्य
करावे म्हणून प्रार्थना करू या.
२. जी लोक आजारी आहेत, खाटेला खिळलेली आहेत,
करोना व्हायरसच्या गंभीर आजाराने त्रस्त आहेत, अशा सर्वांना परमेश्वराच्या दयेचा
अनुभव यावा, परमेश्वराच्या स्पर्शाने ते लवकरात लवकर ते बरे व्हावेत म्हणून आपण
प्रार्थना करू या.
३. जी लोक देवापासून दूर गेलेली आहेत ज्यांनी
देवाच्या श्रद्धेला स्विकारले नाही, त्या सर्वांची परमेश्वरावरील श्रद्धा वाढावी व
त्याद्वारे परमेश्वराच्या दयेने व क्षमेने त्यांनी इतरांपर्यंत परमेश्वराची दया,
शांती, प्रेम व क्षमा पोहचवावी म्हणून आपण प्रार्थना करू या.
४. कोरोना व्हायरसमुळे त्रस्त झालेल्या व भीतीने
घाबरून गेलेल्या लोकांना तसेच जगाला परमेश्वराच्या शांतीचा अनुभव यावा व त्यांनी
देवाचा स्विकार करावा. त्याद्वारे देवाची शांती, करुणा व क्षमा ही सर्वत्र नांदावी
म्हणून आपण प्रार्थना करू या.
५. पुनरुत्थित ख्रिस्तावर आपली श्रद्धा दृढ
व्हावी व त्याच श्रद्धेद्वारे देवाचे साम्राज्य आपण इतरांपर्यंत पोहोचवावे व
इतरांना देवाचा अनुभव यावा म्हणून आपण प्रार्थना करू या.
६. थोडा वेळ शांत राहून आपण आपल्या सामाजिक,
कौटुंबिक, आणि व्ययक्तिक हेतूंसाठी प्रार्थना करू या.
No comments:
Post a Comment