Thursday, 2 July 2026

Reflections for the Homily of 14th Sunday in Ordinary Time (05-07-2026) By Br. Criston Marvi


सामान्य काळातील चौदावा रविवार

दिनांक: ०५/०७/२०२६
पहिले वाचन: जखऱ्या ९: ९-१०
दुसरे वाचन: रोमकरांस पत्र ८:९-१११३
शुभवर्तमान: मत्तय:११:२५-३०



प्रस्तावना:

प्रिय भाविकांनो आज आपण सामान्य काळातील चौदावा रविवार साजरा करीत आहोत. आजची उपासना ही आपल्याला मनाची शांती मिळवण्यासाठी शांतीच्या राज्यांमध्ये विसावा घेण्यास आमंत्रित करीत आहे. शांतीचा राजा हा मनाने लीन व त्याचा आत्मा आपल्यामध्ये वस्ती करत आहे, जो आपल्याला अनंतकाळात जिवंत ठेवेल.

या पवित्र ख्रिस्तयागात सहभागी होत असताना आपण स्वतःला विचारू या की, माझ्या मनाची शांती ही मला कोठे भेटते? माझ्या मनाची शांती ही मला जगातील गोष्टीद्वारे भेटते? की, येशू ख्रिस्ताच्या सानिध्यात राहून मिळते? थकलेले व भाराक्रंत अवस्थेत असताना परमेश्वराची कृपा व येशूची शांती मनामध्ये वस्ती करावी, म्हणून आपण या ख्रिस्तयागात प्रार्थना करूया.

मनन चिंतन:

आज शुभवर्तमानमध्ये आपण ऐकले. आज आपण सामान्य काळातील चौदावा रविवार साजरा करीत आहोत. आजच्या पहिल्या वाचनात आपण एकले की, “ पाहा, तुझा राजा तुझ्याकडे येत आहे; तो न्यायी, यशस्वी आणि लीन आहे. परंतु हा राजा आहे तरी कोण? दुसऱ्या वाचनात संत पौल सांगतो की, आपण आत्म्याच्या अधीन आहोत आणि आपल्यामध्ये ख्रिस्ताचा आत्मा वस्ती करत आहे. त्याचप्रमाणे शुभावार्तामानात येशू पित्याचे स्तवन करतो, व न्यायी, यशस्वी आणि लीन असा राजा म्हणून शांती देण्यासाठी आपणा सर्वांस त्याच्याकडे बोलावतो. येशू पित्याचे स्तवन करतो. कारण की पित्याने येशूला त्याच्या शिष्यांसमोर प्रगट केले आहे. त्यामुळे पित्यामध्ये व येशूमध्ये एकीचे नाते बांधले आहे. जेव्हा आपल्यामध्ये वाढ होते तेव्हा आपण दुसऱ्या वरती अवलंबून राहण्याचे थांबतो. परंतु येशू ख्रिस्त वाढत गेला तेव्हा त्याचे व पित्याचे नाते अधिकाधिक वाढत गेले.

आपण जर का विचार केला तर आपल्याला समजून येते की, आपण प्रत्येकांवर कसले ना कसले ओझे आहेत. उदाहरणार्थ स्वतःवर असलेली शंका, कारण नसताना स्वतःला दोषी ठरवणे, स्वतःचा किस वाटणे, स्वतः विषयी वाईट विचार येणे, इत्यादी. ह्या सर्व गोष्टी सर्वसामान्य व्यक्तीमध्ये घडत असतात. परंतु आपण ह्या सर्व गोष्टींवर मात करून विजय मिळवतो का? की त्याला बळी पडतो? यावर आपण प्रत्येकाने मनन चिंतन करायला हवे.

प्रिय बंधू-भगिनीं येशू ख्रिस्ताचे जीवन हे वेदनारहित, चिंतामुक्त किंवा ओझे नसलेले असे नव्हते, तर ख्रिस्ताला सुद्धा वेदना होत्या. चिंता होती. ओझे होते. परंतु येशू ख्रिस्त आपले सर्व काही हे परमेश्वराला सांगत असे. चिंता, दुःख, भार ह्या सर्वांना सामोरे जाण्यास, त्यांच्याशी झुंज देण्यास, ख्रिस्त आपल्या पित्याकडून सामर्थ्याचा आधार मिळवत असे. आपल्याला सुद्धा आपल्या जीवनात शांतीची गरज आहे. आपण स्वतःला प्रश्न विचारू या, मला जर का एक चांगली व्यक्ती बनायचे असेल तर मला कोणत्या गोष्टीची गरज आहे? ह्या प्रश्नाची भरपूर अशी उत्तरे मिळतील, आणि मनाची शांती हे एक त्याच्यामधले उत्तर असेल. परंतु ती शांती मिळवायची कशी? हा दुसरा प्रश्न असेल. कारण की ह्या जगात सर्वजण शांती मिळवण्याविषयी बोलत आहेत. परंतु खूप कमी लोक शांती पसरविण्यात व मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. जे कोण शांतीच्या शोधात आहेत त्याच्यातले सर्वांनास ती मिळत नाही. परंतु काही लोकांना मनातली शांती मिळत असते. कारण ते खऱ्या अर्थाने व मनापासून शोधत असतात. इस्रायल लोक एकमेकांना शांतीने शुभेच्छा देत असत. कारण हे अभिवादन देवाने स्वतः स्थापित केले होते. म्हणून मोशे आणि अहरोनच्या वेळेस शांती ही एक आशीर्वाद म्हणून समजली जात होती. स्वर्ग आणि पृथ्वीचा आपला प्रभू परमेश्वर हा वेगळा आहे. नम्र आणि गरीब त्याचे मित्र आहेत. ह्याचे कारण हेच की, हे लोक खऱ्या शांतीच्या शोधात असतात. येशुख्रिस्त हा आपल्या दुःख आणि वेदना समजून घेतो आणि त्यानुसार आपल्याला हवी ती शांती देतो व आपले ओझे हलके करतो. आपण जेव्हा ख्रिस्तामध्ये एक होतो तेव्हाच आपल्याला आपले ओझे हलके वाटते.

थोडा वेळ शांत राहून आपण स्वतःला विचारूया की प्रभूची शांती मिळविण्यासाठी मी कश्याप्रकारे प्रयत्न करत आहे? सार्वकालिक शांतीच्या राजाकडे मी कधी मनाच्या शांतीसाठी विनंती केली आहे का?

विश्वासू लोकांच्या प्रार्थना

प्रतिसाद: हे शांतीच्या राजा, आमची विनंती एकून घे.

१. येशू ख्रिस्ताच्या शिकवणीनुसार वागण्यास आपल्याला आपल्या धार्मिक नेत्यांना विशेषकरून पोप लियो चोदावे, महागुरू व धर्मगुरू ह्याना प्रभूने मार्गदर्शन करावे. म्हणून आपण परमेश्वर पित्याकडे प्रार्थना करूया.

२.  हे प्रभू परमेश्वरा सृष्टीचा निर्माणकर्ता यंदाच्या पावसाळ्यात आम्हाला चांगला पाऊस दे. व शेती-भातीची कामे सुरुळीतपणे पार पाडाव. व शेतातील जमीन सुपीक व फळदृप्त कर. म्हणून आपण परमेश्वर पित्याकडे प्रार्थना करूया.

३. हे प्रभू परमेश्वरा ह्या जगातील प्रत्येक मनुष्याचे अधिकार त्याला मिळू दे. आणि त्याला त्याच्या दैनदिन भाकरीचा आस्वाद व त्याच्या मूलभूत गरजा भागवून दे. विशेषकरून जे स्थलांतरित करतात त्यांना योग्य ती नोकरी व काम दे. म्हणून आपण परमेश्वर पित्याकडे प्रार्थना करूया.

४. हे प्रभू परमेश्वरा जे युवक – युवती नोकरीच्या शोधात आहेत, व  ज्यांना जीवनात मार्गदशानाची गरज आहे, अश्या सर्वाना योग्य तो मार्ग दाखव. आणि कुटुंबात त्यांना योग्यरीतीने आधाराचा स्तंभ बनू दे. म्हणून आपण परमेश्वर पित्याकडे प्रार्थना करूया.

५. जे- जे आत्मे देवाघरी गेलेले आहेत. अशा सवा आत्म्यांना देवाच्या दयेची शांती मिळो व सर्व संतांबरोबर  एकरूप होऊन स्वर्गीय नंदनवनाचा आनंद घेता यावा. म्हणून आपण परमेश्वर पित्याकडे प्रार्थना करूया.


No comments:

Post a Comment