Thursday, 8 August 2019



Reflection for the Homily of 19th SUNDAY IN ORDINARY TIME (11-08-19) By Br. Rahul Rodrigues





सामन्य काळातील एकोणिसावा रविवार




दिनांक: ११/०८/२०१९
पहिले वाचन: शालमोनाचा ज्ञानग्रंथ १८: ६-९
दुसरे वाचन: इब्रीलोकांस पत्र ११: १-२ ; ८-१०
शुभवर्तमान: लुक १२: ३२-४८ 

प्रस्तावना:

          आज आपण सामन्य काळातील एकोणीसावा रविवार साजरा करीत आहोत. आजची उपासना आपल्याला नेहमी तत्पर  व तयार राहून देवाच्या सेवेत मग्न राहण्यास आमंत्रण करीत आहे.
          आजच्या पहिल्या वाचनात आपण ऐकतो की, परमेश्वर आपले शत्रूपासून तारण करतो जेणेकरून आपण त्याच्या आनंदात सहभागी होऊ शकू. दुसऱ्या वाचानात इब्रीलोकांस पत्र ह्यात आपल्याला विश्वासाच्या दोन बाजू आहेत असे सांगण्यात येते आणि त्या म्हणजे, “आशा आणि भरवसा”. हि गोष्ट प्रत्येक श्रद्धावंतासाठी अतिशय आनंददायक व आशादायक  आहे असे आपणास सांगण्यात आले आले आहे. शुभवर्तमानात   प्रभू येशू म्हणतो, नेहमी चांगल्या सेवकाप्रमाणे आपल्या धण्याची सेवा करा व पुढे येशू म्हणतो, “ज्या कोणाला पुष्कळ दिले आहे त्याच्याकडून पुष्कळाची अपेक्षा केली जाईल.
          तर आपणही आपल्या दैनंदिन जीवनात चांगल्या सेवाकाप्रमाणे सतत देवाची सेवा करावी व पुष्कळ पटटीने आपल्या कर्मादवारे फळे द्यावी म्हणून लागणारी कृपा शक्ती ह्या पवित्र मिस्साबलिदानात एक चित्ताने मागुया.

 सम्यक विवरण

 दुसरे वाचन: इब्रीलोकांस पत्र ११: १-२ ; ८-१०

          देवावर विश्वास ठेवणे म्हणजे काय? या वाचनाचा अर्थ ह्या अध्ययात स्पष्ट केला आहे व त्यासाठी जुन्या करारतील देवाच्या सेवकांची उदाहरणे घेतली आहेत. विश्वासाने मनात खात्री उत्पन्न होते. ख्रिस्तामुळे जे मिळाले आहे व पुढे मिळणार आहे व ज्या स्वर्गास आपण जाणार आहोत या सर्व गोष्टी आपल्या डोळ्यांनी पाहिल्या नाहीत. मात्र विश्वासामुळे त्या आपल्याला मिळाल्या आहेत असा आपल्याला भरवसा आहे व मिळणार आहेत अशी खात्री आहे. हि खात्री व भरवसा ज्यांना ज्यांना होती त्यांची उदाहरणे या अध्यायात आहेत.

 शुभवर्तमान: लुक १२: ३२-४८ 

          आजचे शुभवर्तमान हे प्रामुख्याने दोन भागात विभागते. पहिल्या भागात आपली वृत्ती या जगात कशी असावी याचे शिक्षण येशूने आपल्या शिष्यांना दिले आहे. पुढे येशू म्हणतो तुमच्या कडे जे काही आहे ते गोर गरिबांना दया व स्वर्गात आपली संपत्ती साठवण्यास आव्हान येशू आपल्या शिष्यांना करत आहे.
          तर दुसऱ्या भागात येशू म्हणतो तुम्ही सतत तत्पर व विश्वासू बना कारण प्रभू येशू ख्रिस्त अकस्मात येणार आहे. निष्काळजी व बेफिकीर होऊ नका. तर त्याच्या येण्याची उत्सुकतेने वाट पाहा. जो अशा प्रकारे वाट पाहिलं  तोच शेवटपर्यंत त्याची सेवा करीत राहील.
          तुम्हांला प्रभू येशूने जी सेवा दिली आहे ती करीत जा. प्रभू येशू आपणाकडून प्रामाणिक व्यवहाराची अपेक्षा करतो. कारभारी म्हणजे व्यवस्था पाहणारा. हे काम धन्याची इच्छा काय आहे ते समजून करावयाचे आहे हे लक्षात राहू दया. जो माणूस अविचारी व अविश्वासू असतो तो जुलूम करतो. खाण्याविषयी जास्त बोलतो व खादाड असतो. तो वाट पाहणारा नसतो. त्याला शिक्षा चुकणार नाही. मला कोणी विचारणार नाही असे त्या मनुष्याने समजू नये.

बोधकथा:   उबंतू 
        
          आफ्रिकेत उबंतू नावाची एक गोष्ट आहे व त्या मागचे प्ररेणास्थान ही त्यांची उबंतू
संस्कृती आहे. एकदा एका मानववंशशास्त्रज्ञानी आफ्रिकन मुलांसाठी खेळ ठेवला.
        त्याने झाडाजवळ मिठाईची एक टोपली ठेवली आणि मुलांना १०० मीटर अंतरावर उभे केले.  मग घोषित केले की जो प्रथम पोहोचेल त्याला टोपलीतील सर्व मिठाई मिळेल. जेंव्हा त्या व्यक्तीने त्यांना जा म्हटले तेंव्हा माहिती आहे काय झाले असेल? त्या सर्व मुलांनी एक दुसऱ्याचे हात पकडले व सर्व एकत्र त्या मिठाई जवळ पळाले व सर्वानी बरोबरीने वाटून आनंदाने खाले.  जेव्हा त्या महाशयाने विचारले त्यांनी असे का केले तेंव्हा ते म्हणाले ‘उबंतू’ म्हणजेच इतर जेंव्हा दुखी असतील तेव्हा मी कसा काय आनंदी राहू शकतो?
          उबंतू त्याच्या भाषेत म्हणजे, “मी आहे कारण आम्ही आहोत.” 

मनन चिंतन:

          नेहमी प्रमाने आजही येशू आपल्या शिष्यां समोर एक नवीन आव्हान व कठिण असा पर्याय ठेवत आहे. ख्रिस्ताने त्याच्या कडून एक मुलभूत जीवन शैली  निवडण्याची अपेक्षा केली. कारण आज काल समाज्यात पाहता प्रत्येक व्यक्ती जीवनात अल्प कालावधीत, शक्य तितकी  संपती जमवण्याचा मोह करतो. जेव्हा येशूने आपले शिष्य निवडले तेव्हा त्याने त्यांच्या समोर कठीण पर्यायच ठेवले होते. लोकांचा पैश्यासाठी, संपत्तीसाठी, अधिकार गाजवण्यासाठी चाललेली धडपड पाहून ख्रिस्त आपल्या शिष्यांना सर्व काही त्याग करावयास सांगतो व गरिबांना  द्यावयास सांगतो आहे.  “तुमच्याकडे असलेले सर्व विका आणि गरिबांना  पैसे दया. जुन्या न होणाऱ्या व स्वर्गातही न संपणाऱ्या अशा थैल्या स्वतःसाठी करा कारण तेथे चोर जाऊ शकणार नाही व कसरही त्याचा नाश करू शकणार नाही.”- लुक १२: ३३.                      
          असिसिकार संत फ्रान्सिस ह्यांनी येशूला तंतो अनुकरण केले व त्यामुळेच त्यांना आज आपण आलतेर ख्रिस्तूस किंवा दुसरा ख्रिस्त म्हणून संभोदित करतो. त्याने आपले कपडे काडून फेकून दिले व आपले जे काही होते नव्हते ते गोर गरिबांना देऊन टाकले. इतकेच नव्हे तर त्याने आपले आई-वडील,घरदार सोडून येशूची सुवार्ता लोकांना सांगितली व इतरांची सेवा केली.
          महात्मा गांधी ह्यांनी सुद्धा आपले चांगले कपडे टाकून धोतीचा स्वीकार केला. कारण भारतात असंख्य लोक गरिब आहेत व त्यांच्याकडे घालावयास पुरेसे कपडे नाहीत म्हणून त्यांच्याशी एकरूप होऊन त्याच्या बरोबरीने जीवन जगण्यास त्यांनी धोती परिधान केली.
          आपले सर्व विका आणि गरिबांना दया म्हणजे नक्की काय? स्वर्गात संपत्ती गोळा करणे म्हणजे काय? जेव्हा आपण गरिबांच्या सेवेसाठी आपले काही देतो तेंव्हा देव आपल्याला आनंदाने व पूर्णतेने भरतो. आपले दिल्याने आपले कधीच कमी होत नाही तर त्यात अधिक भर पडते. गरिबांसाठी केलेला त्याग आपल्याला एक प्रकारचे आंतरिक आनंद देतो. त्यामुळे शेकडो कोल आपल्याला बघून प्रेरित होतात व त्यांना सुद्धा तसे दान किंवा त्याग  करावयास प्रेरणा मिळते व आपला एक वारसा बनून जातो. आपण लोकांकडून प्राप्त केलेली चांगली इच्छा आणि प्रशंसा श्रीमंत संपत्तीसारखे आहे जे भविष्यासाठी केलेली एक प्रकारची गुंतवणूक आहे.
          येशूने शिष्यांस नेहमी सावध व जागृत राहण्यास सांगितले. कायम सज्ज व तयारीने राहा ज्या प्रमाणे एखादा नोकर आपल्या मालकाच्या परत येण्याची वात पाहात असतो. देव कुठल्याही वेळी आपल्या भेटीला येउ शकतो. ज्याप्रमाणे येशू आपल्या शिष्यांना म्हणतो, “मनुष्याचा पुत्र कुठल्याही वेळी येईल, जेंव्हा तुम्ही त्याची अपेक्षा करीत नाही.” आध्यात्मिक मनुष्य नेहमी तत्पर व देवाच्या येण्यासाठी तयार असतो. तो देवाला प्रत्येक गोष्टीमध्ये स्विकार करतो.
          ज्याप्रमाणे येशू आपल्या शिष्यांस सांगतो तो आपणास सुद्धा सांगत आहे. शिष्यांस हे कळणे गरजेचे होते की देवाने त्यांचे कार्य फक्त त्यांच्या हाती सोपविले होते. एखाद्या दासाची किंवा सेवकांची निष्ठा त्यांच्या कामातून दिसून येते. परंतु जो सेवक आपले कर्तव्य, आपले काम सोडून खाण्या-पिण्या मध्ये मग्न असेल त्याला देव शिक्षा देतो. जो सेवक आपल्या मोज मजेत व्यस्त आहे तो आपल्या कर्तव्यावर लक्ष  केंद्रित करू शकणार नाही व जेव्हा घर धनी येईल तेव्हा तो त्याच्या समोर आपली बाजू मांडू शकणार नाही. दुदैवाने आज येशूचे शिष्य मानले जाणारे लोक अशाच जगाच्या मोह मध्ये गुंतून गेले आहेत व ते आपले कर्तव्य, प्राधान्य, प्रेषितीय कार्य विसरून गेले आहेत.
          ज्या सेवकाचे आयुष्य आध्यात्मिकतेवर आधारित आहे तो नेहमी देवाच्या राज्ययावे म्हणून कार्यरत राहील, त्यामुळेच आजच्या शुभवर्तमानात येशू म्हणतो ज्यांना पुष्कळ दिले आहे त्याच्या कडून पुष्कळाची अपेक्षा करत आहे. आपल्याला पुष्कळ दिले आहे व आपल्याकडून सुद्धा पुष्कळाची अपेक्षा आपला देवा करत आहे. आपल्याला दिलेले दान व वस्तू हे आपले वर्चस्व गाजवण्यास आणि स्वतःसाठी बनविण्यासाठी नसतात तर चांगल्या सेवाकाप्रमाणे देवावर प्रेम व त्याची सेवा करण्यास असतात.
          आपणही येशूचे चांगले शिष्य बनून सतत देवाची सेवा करावी म्हणून ह्या पवित्र मिस्साबलिदानात मागुया.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

प्रतिसाद: “हे प्रभो दया कर व तुझ्या लोकांची प्रार्थना ऐक”.

१.    ख्रिस्त सभेची दूरा वाहणारे आपले परमगुरु स्वामी, महागुरू स्वामी, धर्मगुरु –धर्मभगिनी व व्रतस्त ह्यांना प्रभूची सेवा करावयास निरोगी आरोग्य लाभावे व त्यांच्या कडून जास्तीत जास्त प्रभू सेवा घडून यावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
२.    आपल्या धर्मग्रामात जे कोणी आजारी व पिडीत आहेत, खाटेला खिळलेले आहेत ह्यांना प्रभूचा प्रेम दायी स्पर्श व्हावा व  त्याचे दुःख सहन करण्यास त्यांना प्रभूची कृपा मिळावी म्हणून अओन प्रार्थना करूया.
३.    आज बर्याच ठिकाणी  अतिवृष्टी मुळे बरीचसी जीवित हानी व नुकसान झाले आहे त्यांना धीर मिळावा व सरकार कडून योग्य ती मदत मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
४.    आज बरेचसे युवक पीडी वाम मार्गाला जात आहे, बेरोजगारी वाढत आहे अश्यांना प्रभूचा आशीर्वाद मिळावा आणि त्यांनी त्याच्या आयुष्यात चांगले कार्य करून आपला व समाजाचा विकास करावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
५.    थोडा वेळ शांत राहुण आपल्या वैयक्तिक गरजासाठी प्रभू कडे मागुया.


Thursday, 1 August 2019


Reflection for the Homily of 18th SUNDAY IN ORDINARY TIME (4-8-19) By Br. Lipton patil





सामन्य काळातील अठरावा रविवार



दिनांक: ४/८/२०१९
पहिले वाचन: उपदेशक: १:२; २:२२-२३
दुसरे वाचन: कलस्सैकरांस पत्र ३:-; -११.
शुभवर्तमान: लुक १२:१३-२१
                             
                              “सर्व प्रकारच्या लोभापासून दूर रहा”
प्रस्तावना:

          आज आपण सामान्य काळातील अठरावा रविवारात प्रदार्पण केले आहे. आजच्या उपासनेद्वारे देऊळ माता आपल्याला लोभापासून दूर राहण्याचे आव्हान देत आहे. आजच्या तिन्ही वाचनांवर सखोल विचार केल्यास आपल्याला असे शिकावयास मिळते की, लोभापासून दूर रहावे  हे अतिशय महत्वाचे आहे. अर्थात स्वर्गाकडच्या  गोष्टीकडे लक्ष दिले पाहिजे.
आजच्या पहिल्या वाचनात उपदेशक ठामपने सांगतो कि, मनुष्य जे काही परिश्रम करितो व आपला जीव उलथापालथा करून या भूतलावर  खटाटोपी करितो त्याचा त्याला काय लाभ? दुसऱ्या वाचनात पौल कल्स्सैकरांस लिहिलेल्या पत्रात सांगतो की, वरील स्वर्गीय गोष्टीकडे लक्ष लावा पृथ्वीवरील गोष्टीकडे लावू नका, कारण ख्रिस्त सर्व काही आहे आणि सर्वात ख्रिस्त आहे. तसेच लुक लिखित शुभवर्मानात ख्रिस्त धनवान व श्रीमंत मूर्ख मनुष्याचा दुष्टांत देतो व सांगतो जो कोणी स्वत:साठी द्रवसंचय करितो व देवा विषयक बाबतीत धनवान नाही त्याचा काही फायदा नाही.
          आज आपण प्रभू ख्रिस्ताच्या भोजनात सहभागी होत असताना प्रत्येकांनी स्वत:ला प्रश्न विचारला पाहिजे की, मी ख्रिस्ताच्या बाबतीत धनवान आहे. जर आपण कुठे चुकलो असाल तर देवपित्याकडे क्षमा मागुया व ख्रिस्ताच्या बाबतीत धनवान होण्यास यश मिळावे म्हणून या ख्रिस्तयागात भक्ती भावाने प्रार्थना करूया.       

सम्यक विवरण:

पहिले वाचन:  उपदेशक: १:२; २:२२-२३

उपदेशक ह्या पुस्तकात आपण का जगतोह्यावर चिंतन  केलेले  आहे. उपदेशक ज्ञान, मनोरंजन, व्यवसाय, सत्ता, धन, धर्म, व इतर गोष्टींचे बारकाईने निरीक्षण करतो. या सर्व गोष्टींना विशिष्ट प्रसंगी किंवा वेळी काय महत्व आहे व त्या कशा उपयोगी आहेत; जर देव मानवाच्या आयुष्याच्या केंद्रस्थानी असेल तरच ह्या गोष्टींना टिकणारे मोल आहे. देवाविषयीचा आदर, देवाचा सन्मान व देवाची सेवा करण्यासाठी वाहिलेले आयुष्य यामुळेच एखाद्याच्या जीवनाचे सार्थक होते. देवावाचून सारे व्यर्थच आहे असे उपदेशक म्हणतो.
      या पुस्तकाचा लेखक शलमोन स्वत:ला म्हणतो, ‘सर्वकाही व्यर्थ आहे’. तो जे घडत आहे त्याकडे पाहून विचार करतो व या निराशेच्या उद्गारांनी तो सुरुवात करतो. "व्यर्थ" याचा अर्थ वाफ-समान, क्षणभंगुर, आयुष्यभर परिश्रम केल्यावर काही शिल्लक राहत नाही असा होतो.

दुसरे वाचन: कलस्सैकरांस पत्र ३:-;-११

          विश्वासणारे ख्रीस्ताबरोबर मेले आहेत व ख्रीस्ताबरोबर जिवंत झालेले आहेत. आपले लक्ष आता स्वर्गात असलेल्या येशुख्रीस्तावर केंद्रित करा. तो देवाच्या उजवीकडे आपला प्रमुख याजक आहे. प्रभू येशू ख्रिस्त आज आपल्याला दिसत नाही, त्याच्यावर आपण विश्वास ठेवतो व त्याच्या पुनरुत्थानाच्या सामर्थ्याने जगतो. पृथ्वीवरील गोष्टी क्षणभंगुर आहेत. आपण या जगात दुर्बल आहोत तरी ख्रिस्तात जिवंत, सबळ व सुरक्षित आहोत. आपणास नवा स्वभाव मिळालेला आहे. तो स्वभाव ख्रीस्ताप्रमाने आचरण करतो व तुमचे शील या प्रकारे बदलत चालले आहे.

शुभवर्तमान: लुक १२:१३-२१

          सर्व प्रकारच्या लोभापासून दूर रहा. एखद्या गोष्टीबद्दल लोभ सुरणे हा प्रत्येकाचा स्वभाव आहे. संपतीमुळे आपण सुखी होऊ अशी कल्पना करणारे शेवटी मूर्ख ठरतात. या जगातील गोष्टी काही काळ शारीरिक सुख देतात तरी त्याच्याद्वारे अंतःकरणात शांती मिळत नाही . जगातील शारीरिक सुखामागे लागणारे मरणांनंतर दुःख भोगतात. धनवान माणसाने काय केले?  त्याने देवाचे आभार मानले नाहीत.  त्याने आपल्या सुस्थिताचा विचार केला नाही, त्याने मूत्यूनंतरच्या काळाचा विचार केला नाही. जगातल्या गोष्टीनी हवे ते मिळते असे त्याने मानले. या सर्व कारणामुळे देवाने त्याला मूर्ख म्हटले. तो स्वतःसाठी द्रव्याचा संचय करण्यासाठी आपले आयुष गुंतवीत होता. देवाच्या सेवा करण्यासाठी बाबतीत तो दरिद्री होता.

मनन चिंतन:

“लोभात गुंतू नका सूजनहो
लोभात गुंतू नका”

          होय माझ्या ख्रिस्ती बांधवांनो वाईट लोभाचा अंत शेवटी दुःखातच होतो. त्यामुळे आजच्या उपासनेतून आपल्याला सांगण्यात येते की, लोभापासून दूर राहण्याला हवे. वाचनात सांगण्यात आले आहे की, वाईट लोभ कधीही कायमस्वरूपी आनंद देत नाही, काही काळासाठी किंवा क्षणासाठी आपण आनंद घेतो. आज कितीतरी लोक वाईट लोभाला बळी पडलेले आहेत. या वाईट लोभामुळे चांगले व वाईट यांच्यातील साम्य विसरून गेले आहेत. आज सांगायचे झाले तर आजच्या घडीचे लोभ आहेत मोबाईल, फसवणूक, काळाबाजार, अनैतीक्ता व इत्यादी. आज आपल्याला मोबाईलचा इतका लोभ आहे की, घरातील व्यक्तीबरोबर बसायला किंवा बोलायला वेळ नाही. कुंटुंबात व्यवस्थित प्रार्थना होत नाही.त्यामुळे साहजिकच कुंटुंबात अशांतीचे वातावरण निर्माण होते. तरून-तरुणी जास्त वेळ मोबाईलवर घालवतात. आज खूप ठिकाणी फसवणूक व अत्याचार होत आहेत. माणूस स्वतः आनंदी राहण्यसाठी वाईट मार्गाचा अवलंब करतो. तसेच दुसऱ्याचे वाईट करतो. माणूस पैसे व  संपती मध्ये धनवान व्हायला पाहत आहे. पैसे व धन दौलत कधीही आपली प्रतिष्ठा वाढवत नाही तर आपण कसे जीवन जगतो यावरून आपली ओळख कळते. आपण सर्वजण ख्रिस्तधन जोपासले  पाहिजे; म्हणून संत पौल म्हणतो, “मी कुठेही कसा ही असे  ख्रिस्त माझ्यामध्ये दिसो.” खरोखर तो ख्रिस्त आपल्यामध्ये दिसत आहे का? ख्रिस्ती लोकांना ख्रिस्ती तत्वांचा  लोभ असला पाहिजे.
          जेंव्हा आपण ‘लोभ’ हा शब्द ऐकतो तेंव्हा आपल्या मनात नकारत्मक विचार येतो. लोभ हा वाईट शब्द आहे असे म्हणतो. परंतु लोभ आपला हा वाईट शब्द आहे असे नाही, तर आपल्याला चांगल्या गोष्टीचा लोभ असला पाहिजे. वाईट लोभ सोडून चांगला लोभ आपण आत्मसात करू शकतो. आपल्या ख्रिस्तसभेत खूप संत होऊन गेले जे आपल्यासारखे होते. त्यांनी सर्वस्वाचा त्याग करून पापी, निर्दयी व वाईट कृत्ये करणारे ख्रिस्ताला अनुसरायचा ध्यास  घेतला. ते ख्रिस्तामध्ये इतके तल्लीन झाले की, त्याच्यामध्ये ख्रिस्त दिसून आला. ते ख्रिस्तमय झाले. असिसिकार संत फ्रान्सिस ह्यांनी ख्रिस्ताला तंतोतंत अनुसरले, ख्रिस्तासारखे तो  जीवन जगला आणि म्हणूनच आज देऊळ माता त्यांना दुसरा ख्रिस्त म्हणून संभोधते.  दुसरा ख्रिस्त संत फ्रान्सिस एका दिवसाने किंवा महिन्याने झाला नाही तर त्याच्यासाठी त्याच्यामध्ये असलेले वाईट गुण काडून घेतले. संत जॉन मारी व्हीयानी आज आपण त्यांचा सण साजरा करीत आहोत. त्यांचे जीवन चरित्र्य आपल्याला माहीतच आहे. अभ्यासत कमी परंतु ख्रिस्ताचे प्रेम देण्यास हुशार होते. ज्यांनी अधिकतम वेळ प्रायश्चित्त संस्कारासाठी देऊन लोकांना ख्रिस्ताकडे आणले. लोकांना जिवंत ख्रिस्त दिला.
          आपण सुद्धा सर्वजण तो जिवित ख्रिस्त दुसऱ्याला देऊ शकतो. जर आपल्यामध्ये वाईट कृत्ये सोडण्याची ताकद असेत तर दारुड्या दारूचा लोभ सोडून त्याचे कुंटूंब आनंदात ठेऊ शकतो. जे लोक दुसऱ्याला नाश करतात ते हे सर्व  सोडून दुसऱ्याच्या कुंटूंबात प्रेमाचा वर्षाव करू शकतात. दुसऱ्याचे वाईट न करता चांगले करता येते. 

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

प्रतिसाद: हे प्रभू दया कर व तुझ्या लोकांची प्रार्थना ऐक”   

१.    आपले पोप फ्रान्सिस, कार्डीनल, बिशप्स, धर्मगुरू व सर्व व्रतस्थ ज्यांनी आपले आयुष्य प्रभूकार्यासाठी अर्पण केले आहे, अशाना पवित्र आत्म्याच्या कृपेने तारण व्हावे व त्यांना प्रभूपरमेश्वराचे प्रेम, कृपा व आंनद मिळावा तसेच प्रभूची सुवार्ता जोमाने पसरावी म्हणून आपण प्रार्थना करू या.
२.    जे लोक, युवक चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत, या सर्वाना परमेश्वराच्या कृपेने चांगली नोकरी मिळावी म्हणून आपण प्रार्थाना करूया.
३.    जे लोक देवावर श्रद्धा ठेवत नाहीत तसेच पैशाच्या किंवा जगातील आर्थिक गोष्टीवर लक्ष देत आहेत अशा सर्व लोकांना चांगले मार्गदर्शन मिळून देवाच्या अधिका-अधिक जवळ यावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
४.    आज कितीत्तरी लोक आजारी, दुःखात व एकटेपणाचे जीवन जगत आहेत. अशा लोकांना देवाची साथ मिळावी व सर्व अडचणीत मुक्त व्हावे म्हणून आपण प्रार्थना करू या.
५.    जगामध्ये कितीतरी अन्नाची नाशदूष केली जाते. गरीब लोकांना एक वेळेचे अन्न मिळत नाही. जे लोक अन्नाची नासाडी करतात अशाना बुद्धी मिळून गरिबांना द्यावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
६.    थोडावेळ शांत राहून आपल्या सामाजिक, कौटुंबिक व वैयक्तिक गरजासाठी प्रार्थना करूया.


Thursday, 25 July 2019


Reflection for the Homily of 17th SUNDAY IN ORDINARY TIME (28-07-19) By Br. Godfrey Rodriques



सामान्य काळातील सतरावा रविवार





दिनांक: २८/०७/२०१९
पहिले वाचन: उत्पत्ती १८:२०-३२.
दुसरे वाचन: कलस्सैकरांस पत्र २:१२-१४.
शुभवर्तमान: लुक ११:१-१३


 प्रस्तावना :

आज आपण सामान्य काळातील सतरावा रविवार साजरा करीत आहोत. आजची उपासना आपल्याला प्रार्थनेचे महत्व पटवून देत आहे.
आजच्या पहिल्या वाचनात आपण ऐकतो कि, अब्राहाम देवाकडे सदोम आणि गमोरा ह्या देशांसाठी प्रार्थना करत आहे आणि त्याच्या प्रार्थने मुळेच परमेश्वर एका नितीमानासाठी सुद्धा पूर्ण शहराचा नाश करणार नाही असे वचन अब्राहामाला देत आहे. संत पौलाचे कलस्सैकरांस लिहिलेल्या पत्रात पौल सांगतो कि तुमच्या बाप्तिस्मा द्वारे आणि देवावरील विश्वासामुळे तुम्हांला तारण प्राप्त झाले आहे. तर आजच्या शुभवर्मानात  येशू ख्रिस्त त्याच्या शिष्यांना परमेश्वर पित्याकडे प्रार्थना करण्यास शिकवतो व प्रार्थनेचे महत्व ख्रिस्त त्यांस पटवून देतो. ख्रि
स्ताने शिकविलेल्या प्रार्थने द्वारे ख्रिस्त आपल्या निदर्शनास आणतो कि प्रार्थना हि देवाने मानवाला दिलेली अमुल्य असे दान आहे. म्हणून आजच्या ह्या पवित्र मिस्साबालीदानात सहभागी होत असताना, आपल्याला शिकविलेली प्रार्थना आपण सातत्याने करावी व त्यांचे महत्व इतरांना पटवून द्यावे म्हणून आपण स्वतासाठी आणि एकदुऱ्यासाठी विशेष  प्रार्थना करूया.

सम्यक विवरण

पहिले वाचन: उत्पत्ती १८:२०-३२

उत्पत्ती ह्या पुस्तकातून घेतलेल्या पहिल्या वाचनात, आब्राहाम हा आपल्या देवपित्याकडे सदोम आणि गमोरा ह्या देशासाठी प्रार्थना करतो. ह्या दोन्ही प्रांतामध्ये फार वाईट कृत्ये घडली होती, हे दोन्ही प्रांत  देवा पासून दूर गेले होते.त्यामुळे देवाला त्या देशांचा नाश करायचा होता. पंरतु आब्राहामाची त्या देशांचा नाश  व्हावा अशी इच्छा होती, कारण त्याच्या भावाचे कुटुंब त्या देशात वस्ती करत होते म्हणून त्याने देवाची दया त्या प्रांतांवर व्हावी म्हणून प्रार्थना केली. परमेश्वराने त्याची प्रार्थना एकली परमेश्वर त्याला म्हणला कि त्या देशात दहा माणसे जरी नीतिमान असली तरी मी त्यांचा नाशकरणार नाही’. आब्राहामाने देवाशी साधलेल्या सततच्या संवादामुळे व प्रार्थनेमुळे  त्या प्रांतांचे संरक्षण झाले.

दुसरे वाचन: कलस्सैकरांस पत्र २:१२-१४

आजच्या दुसऱ्या वाचनात संत पौल कलस्सैकरांस लिहिलेल्या पत्रातून आपल्या आठवणीस आणून देतो कि, आपल्या देवावरील विश्वासामुळे आपले तारण झाले आहे, कारण ज्यावेळी प्रभू येशू ख्रिस्ताच्या मरणाने आपल्या सर्वाचा बाप्तिस्मा झाला तेंव्हाच आपण त्याच्याबरोबर मरण पावलो व पुरले गेलो आहोत व ज्याने त्याला मेलेल्यांतून उठविले त्याच देवाने आपल्यालादेखील आपल्या मरणातून उठविले आहे, म्हणून देवाच्या सतत सानिध्यात व प्रार्थनेत राहून त्याचे विश्वासू सेवक होण्यास व त्याची साक्ष बनण्यास संत पौल आपणास आमंत्रण करीत आहे.

शुभवर्तमान: लुक ११:१-१३

आजच्या शुभवर्तमानात नमूद केलेल्या उताऱ्यातून आपल्या निदेर्शनास येते कि, प्रभू येशू ख्रिस्त प्रार्थना करताना त्याच्या शिष्यांनी त्याला अनेकदा पाहिले होते व त्यांच्या मनांत प्रार्थना करण्याची इच्छा उत्पन्न झाली. म्हणून येशूच्या शिष्यांनी येशूला प्रार्थना शिकविण्यांस विनंती केली. प्रार्थना म्हणजे आपल्या स्वर्गीय पित्यावर भरवसा ठेऊन सर्व गोष्टीकरिता त्याच्यावर अवलंबून राहणे. आपला देवपिता अति प्रेमळ व ज्ञानी आहे.  तो आपल्या मुलांच्या प्रार्थना नेहमी ऐकतो. त्यांच्या पूर्ण ज्ञानाने तो तुमची प्रत्येक मागणी पूर्ण करीत आहे हे खरे, तरी आपली अडचण त्याला कळते. तो आपली काळजी घेतो. त्याच्याकडे चांगले ते मागणाऱ्यान तो कधीच वाईट देत नाही.

मनन चिंतन : 

छत्री पावसाला थांबवू शकत नाही पण पावसात थांबण्याचे धाडस मात्र देऊ शकते.आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही परंतु सघर्ष करण्याची प्रेरणा नक्कीच देऊ शकते. त्याच प्रमाणे दु:खात केलेली प्रार्थना आपल्याला कधी-कधी लगेच उत्तर देत नाही परंतु दु:ख सहन करण्याचे धाडस मात्र  नक्कीच देते. म्हणून प्रत्येक परिस्थितीत प्रार्थनेची साथ असणे अतिशय महत्वाचे आहे. कारण प्रार्थना हि सुख-दु:खाचा आधार, अधंकारात दिप, असाह्य लोकांचे सहाय्य, निराशितांची आशा, दुर्बळांचे बळ, थकलेल्या मनाचा विसावा, हृदयाची आस आहे. प्रार्थना ही देवाने मानवाला दिलेली अमुल्य अशी देणगी आणि शक्ती आहे. प्रार्थना आपण कोणसाठीही व कोणत्याही हेतुसाठी करू शकतो; मात्र हे हेतू देवाच्या वचनाशी सबंधित असावेत.
आजच्या पहिल्या वाचनात आपण ऐकले की, देवाने मोशेची प्रार्थना ऐकली. मोशे हा फक्त देवाचा निवडलेला भक्तहोता. परंतु येशूख्रिस्त हा देवाचा एकुलता एकपुत्र,आपल्या तारणासाठी, देवाने ह्या धरतीवर पाठवला. मग ख्रिस्त जो आपला तारणारा आहे,त्याच्या नावाने केलेली प्रार्थना देव कधीच नाकारू शकत नाही. कारण ख्रिस्त ह्याविषयी स्वत:च साक्ष देताना म्हणतो, “पुत्राच्या ठायी पित्याचा गौरव व्हावे म्हणून तुम्ही जे काही माझ्या नावाने मागाल ते मी करीन.
म्हणून आपल्या दररोजच्या जीवनात आपण ख्रिस्ताच्या नावाने सातत्याने स्वर्गीय पित्याजवळ प्रार्थना करणे अगत्याचे आहे. म्हणूनच प्रभू येशू म्हणतो, ‘सातत्याने खचून न जाता,नित्य करावी आपण प्रार्थना’. त्यासाठी ह्या मिस्साबलिदानात एकत्र जमलो असताना विशेष प्रार्थना करूया कि, दु:खांना घाबरून न जाता व संकटांत डगमगून न जाता ख्रिस्ताने त्याच्या शिष्यांना शिकवलेल्या प्रार्थनेद्वारे स्वत:साठी व एकदुसऱ्यासाठी प्रार्थनामय आधार बनूया.

विश्वासु लोकांच्या प्रार्थना

प्रतिसादहे प्रभू आमची प्रार्थना एकूण घे.

.ख्रिस्त सभेचे पोप महाशयसर्व बिशप्सधर्मगुरू व व्रतस्थ जे ख्रिस्ताच्या मळ्यात कार्य करत आहेत त्यांची ख्रिस्ताने शिकाविलेलेया प्रार्थनेद्वारे त्यांची श्रद्धा बळकट व्हावी व इतरांची श्रद्धा त्यांनी बळकट करावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
२. जे तरुण-तरुणी देवापासून दूर गेलेले आहेत त्यांना प्रार्थनेची गोडी लाभून प्रभु प्रेमाचा स्पर्श होऊन, त्यांनी अंधाराचा मार्ग सोडून प्रकाशाचा मार्ग निवडण्यास त्यांस प्रेरणा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
३. आजच्या उपासनेमध्ये सहभागी झालेल्या सर्व भाविकांनी ख्रिस्ताने शिकविलेल्या प्रार्थनेद्वारे  जीवनावर मनन-चिंतन करून सर्व वाईटांपासून व मोहांपासून दूर रहावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
४. जे आजारी व दु:खी कष्टी आहेत त्यांना त्यांच्या जीवनात प्रार्थनेद्वारे ख्रिस्ताचा स्पर्श लाभाव व  प्रार्थना त्यांचा आधारस्तंभ  बनावा  म्हणून आपण प्रार्थना करूया.
५. ओरिसातील पुरग्रस्तात जे लोक मरण पावले आहेत त्यांच्या आत्म्यांना चिरकाळ शांती लाभावी व ज्या लोकांची आर्थिक व इतर हानी झाली आहे अश्यांना आर्थिक मदत मिळावी व पुन्हा त्यांचे जीवन सुरळीतपणे चालावे म्हणून आपण प्रार्थना करूया. 
६. थोडावेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक, सामाजिक व कौटुंबिक  हेतूंसाठी प्रार्थना करूया.