Friday 10 May 2024

 Reflection for the SOLEMNITY OF THE ASCENSION OF  THE LORD(12/05/2024) By Fr. Rakesh Ghavtya 


प्रभू येशूचे स्वर्गरोहण

दिनांक: १२/०५/२०२४

पहिले वाचन: प्रेषितांची कृत्ये १:१-११

दुसरे वाचन: इफिसकरांस पत्र ४:१-१३

शुभवर्तमान: मार्क १६:१५-२०

प्रस्तावना

आज आपण येशूच्या स्वर्गरोहणाचा सण साजरा करीत आहोत. आजची उपासना, शुभवार्ता, शुभ-संदेश प्रकट करण्यासाठी पाचारण करत आहे. येशूचे स्वर्गरोह हे आमच्या ख्रिस्ती जीवनाची नवीन आशा आहे. येशू स्वर्गात चढला व आम्हाला स्वर्गाची दार उघडून, आम्ही त्याच्याबरोबर राहावे असे दर्शविले. येशूने शिष्यांना पवित्र आत्म्याचे दान दिले आणि संपूर्ण जगात जाऊन शुभवर्तमान प्रकट करावे म्हणून पाचारण केले. अशाप्रकारे शिष्यांनी सर्व ठिकाणी जाऊन शुभवर्तमान प्रकट केले.

ज्याप्रकारे येशू स्वर्गात चढला त्याच प्रकारे आम्ही त्याच्याबरोबर असावे म्हणून आमच्या जीवनाद्वारे शुभवर्तमान प्रकट करताना आम्हाला शक्ती व सामर्थ्य लाभावे म्हणून या पवित्र मिस्सात प्रार्थना करूया.

मनन चिंतन:

आजच्या पहिल्या वाचनात: प्रेषितांचे कृत्ये या पुस्तकात आपण ऐकतो की येशूने स्वर्गात जाण्याअगोदर आपल्या शिष्यांना शेवटल्या वेळी भेटून अशी आज्ञा करतो की शुभवर्तमान संपूर्ण जगात पोचवा म्हणून मी तुम्हाला पाचारण करतो.

दुसऱ्या वाचनात: संत पॉल इफिसकरांस पत्रात म्हणतात; येशु स्वर्गात गेल्यावर त्यांनी शिष्यांना आपले कार्य चालू राहण्यासाठी त्यांना वेगवेगल्या देनग्यांनी भरले. ही दाने वापरून त्यांनी येशूचे शरीर म्हणजे येशूचे राज्य स्थापन करावे म्हणून सांगितले.

आजच्या शुभवर्तमानात: संत मार्क असे सांगत आहे की, येशू शिष्यांना प्रकट झाला व त्यांना संपूर्ण जगाला शुभवर्तमान प्रकट करण्यास सांगितले. येशूने शिष्यांना विशेष शक्ती व सामर्थ्य दिले व नंतर येशू स्वर्गात चढला व परमपित्याच्या उजवीकडे बसला. शिष्यांनी सुवार्तेद्वारे हे सर्व प्रकट केले व  त्यांच्याबरोबर प्रत्येक क्षणी येशू होता.

येशूचे स्वर्गरोहन झाले तेव्हा शिष्यांनी त्यांच्या नजरा स्वर्गाकडे ठेवल्या त्याच प्रकारे आम्ही आपली नजर स्वर्गाकडे लावूया म्हणजे आम्ही सुद्धा येशूच्या बरोबर राहून स्वर्गाचा अनुभव घेऊ.

ज्याप्रमाणे शिष्यांनी येशूचे शुभवर्तमान सर्वत्र पसरवले व त्यांच्या जीवनात येशू ने अनेक चमत्कार केले त्याचप्रमाणे आम्ही आमच्या दैनंदिन ख्रिस्ती जीवनाद्वारे ख्रिस्ताचे शुभवर्तमान प्रकट करूया की जेणेकरून ख्रिस्त आमच्या जीवनात खरा आनंद व सुख देईल.

आम्ही सर्वजण ख्रिस्ती भाविक या नात्याने ख्रिस्ताचे मिशन कार्य करूया, व गरजवंतांस तसेच जे दुर्बळ आहे त्यांची सेवा करताना खरे समाधान या मिस्साबलीदानात अनुभवूया.

 

मनन चिंतनासाठी मुद्दे.

१)पोप फ्रान्सिस म्हणतात; येशूचे स्वर्गरोह हे येशूने आमच्यासाठी पूर्ण केलेल्या मिशन कार्याविषयी स्पष्ट करते.

२)येशूच्या स्वर्गरोहणाने ख्रिस्त सभेच्या मिशन कार्याची स्थापना झाली.

३)येशू जरी स्वर्गात गेला तरी त्याचे राज्य या संपूर्ण जगात चालूच आहे. येशूचे मिशन कार्य संपूर्ण विश्वात होत आहे.

४)जो येशू स्वर्गात चढला तो आमच्यामध्ये उपस्थित आहे.

५)येशू जरी स्वर्गात गेला तरी त्यांनी त्याची शिकवण आपल्या शिष्यामार्फत प्रकट केली.

६)जर आपल्याला येशूचे खरे शिष्य अनुयायी व्हायचे असेल तर त्याची शुभवार्ता सर्वत्र जगाला पसरूया, त्यासाठी आम्ही मिशन कार्यात स्वतःला झोकून घेऊन प्रभूचा संदेश चांगल्या कार्याद्वारे प्रकट करूया.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

प्रतिसाद: हे प्रभू तुझे सुवार्तिक होण्यास आम्हांस कृपा दे.

१. आपले पोप फ्रान्सिस, बिशप्स, धर्मगुरू व व्रतस्थ ह्यांनी संपूर्ण सृष्टीस प्रभू येशूची सुवार्ता घोषविण्यासाठी पवित्र आत्म्याचे सहाय्य त्यांच्यासाठी मागुया.

२. आपल्या सरकारी अधिकाऱ्यांनी एक चांगलं, न्यायचं व एकोप्याचं राज्य स्थापन करण्यासाठी झटावं म्हणून त्यांच्यासाठी परमेश्वराची कृपा मागुया.

३. प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीला आपल्या जीवनाद्वारे ख्रिस्ताची सुवार्ता प्रगट करता यावी व ख्रिस्ताचे खरे अनुयायी बनून त्याने दिलेले मिशनकार्य पूर्ण करण्यास कृपा व सामर्थ्य मिळावं म्हणून आपण प्रार्थना करू या.

४. यंदाच्या वर्षी पावसाळी मोसमात चांगला पाऊस व्हावा, शेती-बागायतीसाठी योग्य ते हवामान मिळावे व शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहाबरोबरच त्यांच्या शेतातील भरगोस पिकाने इतरांचेदेखील पोषण व्हावे, म्हणून आपण प्रार्थना करू या.

५. आपल्या वैयक्तिक व सामाजिक हेतूंसाठी थोडा वेळ शांत राहून प्रार्थना करू या.

No comments:

Post a Comment