Thursday, 20 February 2025

 Reflection for the 7th Sunday in Ordinary Time (23/02/2025) By Br. Criston B. Marvi


सामान्य काळातील सातवा रविवार

दिनांक: २३/०२/२०२५

पहिले वाचन: १ शमुवेल २६:२, ७-९, १२-१३, २२-२३.

दुसरे वाचन: १ करिंथ. १५:४५-४९.

शुभवर्तमान: लुक ६:२७-३८.


प्रस्तावना

      ख्रिस्ताच्या नावाने एकत्र आलेल्या प्रिय बंधू भगिनींनो, आज आपण सामान्य काळातील सातवा रविवार साजरा करीत आहोत. आजची पवित्र उपासना आपल्याला क्षमेविषयी सांगत आहे. आजच्या पहिल्या वाचनात आपल्याला दाविद  शौल राजावर त्याची दया कशा प्रकारे व्यक्त केली आहे हे सांगत आहे. आणि दुसऱ्या वाचनात संत पौल सांगत आहे की, पहिल्या आदामाच्या कृत्याने आपण सर्वजण मृत्यूला बळी पडलो, परंतु दुसऱ्या आदामाच्या कृत्याने आपल्याला अनंतकाळात जीन लाभले. व आजच्या शुभवर्तमानात येशू आपल्याला आजपर्यंत दिलेल्या काही सर्वात आव्हानात्मक नैतिक सूचना शिकवतो. या शिकवणी कॅथलिक जीवनाचा गाभा बनतात, ज्या प्रेम, दया आणि क्षमा यावर आधारित आहे.

       म्हणून या पवित्र मिस्साबलिदानात सहभागी होत असताना प्रार्थना करूया की, आपण सर्वजण ख्रिस्तामध्ये रुजले जाऊ, जेणेकरून आपण आपल्या शत्रूवर अधिक प्रेम व प्रार्थना करू शकू.

बोधकथा :

       एका घरात तीन मुल होती. त्यांच्या घरात सुख आणि शांतीचे वातावरण होते. एके दिवशी त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. सर्वात लहान असलेल्या मुलावर शेजारच्या व्यक्तीने सुरीचे वार करून त्याचा खून करून टाकला. पोलिसांनी खुनीला तुरुंगात टाकले. परंतु मोठा मुलगा जो धर्मगुरू होता त्याला जेव्हा कळले तेव्हा त्याने मारेकाराच्या घरी जाऊन त्याला क्षमा केली आहे असे सांगून त्याची तुरंगातून सुटका केली. क्षमा व समेटाचा संदेश संपूर्ण जगाला दिला. 

मनन चिंतन

      दाविदपुत्र येशू, माझ्यावर दया करा हो” (लूक १८:३८). आजच्या पहिल्या वाचनात आपण जसे ऐकतो की, दाविद त्याच्या जीव घेणाऱ्या वैऱ्याला माफी करून दयेचा आणि माफीचा संदेश दिला. आणि तोच संदेश येशू ख्रिस्त आपल्याला आजच्या शुभ वर्तमानात सांगत आहे.

       “एखाद्याने तुम्हाला एका गालावर मारले तर त्याच्यापुढे दुसरा गाल कर (लूक ६:२). जेव्हा आपण येशूचे हे शब्द ऐकतो तेव्हा आपणा सर्वांना वाटते की, आपल्या वैऱ्याला माफी करणे हे खूपच कठीण आहे. परंतु आजच्या पहिल्या वचनात दाविने करून दाखवले आहे. म्हणून येशू ख्रिस्त आपणाला वारंवार सांगत आहे की, मानवाला त्याच्या वैऱ्याला माफी करणे हे अवघड नाही. आणि ह्याचेच उदाहरण येशू ख्रिस्ताने खुद्द आपणास दाखवून दिले आहे, जेव्हा येशू ख्रिस्त त्याच्या स्वर्गीय पित्याकडून त्याच्या मारेकऱ्यास माफी करण्यास सांगितले.

       आपल्या सध्याच्या युगामध्ये माफीची उदाहरण घ्यायचे ते म्हणजे संत पोप जॉन पॉ दुसरे. जेव्हा १३ मे १९८१ साली त्यांच्यावर गोळीबार ने हल्ला करण्यात आला तेव्हा पवित्र पुरुषांनी उद्गारलेले शब्द, कृपया माझा  बंधु अली अग्का त्याच्यासाठी प्रार्थना करा त्याला मी क्षमा केलेली आहे.

       दाविदाची कृती ही खरोखर असामान्य आहे. परंतु येशू ख्रिस्त त्याच्याहून अधिक मागणी करत आहे. तुमच्या शत्रूवर प्रेम करा. आणि जसा तुमच्या स्वर्गीय पिता दयाळू आहे से तुम्हीही दयाळू व्हा. क्षमाशीलता बरे करते. क्षमाशीलता हे एक नवीन जीवनाची दिशा दाखवते. जर का माझ्या मनात माझ्या शत्रू विषयी राग आणि मत्सर असेल आणि मी जर त्याला माफ केले तर माझ्यात असलेला कडूपणा निघून जातो किंवा कडूपणाला माझ्या जीवनात राहण्याचा हक्क राहत नाही. क्षमाशीलता क्षमा करणाऱ्याला आणि क्षमा मिळवणाऱ्याला मुक्त करते आणि जीवनात पुढे जाण्याचा मार्ग मोकळा करते.

       क्षमाशीलता हे एखाद्याच्या मानवी स्वभावाविषयी सांगते. कारण चुका करणे हा एक मानवी स्वभाव आहे आणि चुकांना क्षमा करणे हा एक दैवी स्वभाव आहे. जेव्हा आपण माफ करतो तेव्हा आपण पीडित नसून तर विजयी होतो. एखाद्याला माफी करणे म्हणजे स्वतःच्या हृदयात बदल घडवून आणणे. स्वतःचे दगडाचे हृदय हे देहाच्या हृदयात बदलणे. इतरांना क्षमा करून आपण देवाच्या क्षमेला आपल्या मधून वाहू देतो, ज्यामुळे प्रेम आणि कृपा विपुल प्रमाणात आढळते. त्यासाठी आपणा येशू ख्रिस्तामध्ये राहिलो पाहिजे. कारण एखाद्याच्या वैराला माफी करणे हे कठीण आहे पण अशक्य नाही.

       म्हणून ह्या ख्रिस्तत्यागात सहभागी होत असताना, आपण सुद्धा येशू ख्रिस्तासारखे दुसऱ्यांना दयेच्या आणि क्षमेच्या डोळ्यांनी पाहता यावे म्हणून आपण देवाची कृपा व सामर्थ्य मागूया. 

विश्वासू लोकांची प्रार्थना

प्रतिसाद: "हे परमेश्वराआम्हाला तुझ्या क्षमेची व प्रेमाची लेकरे बनव."

१) आपले पोप फ्रान्सिससर्व बिशप्सधर्मगुरू व व्रतस्थ बंधुभगिनी ह्यांना आपल्या कार्याकडे देवाच्या नजरेतून पाहण्याचे धैर्य लाभावे आणि त्यांच्यासाठी त्यांनी आपल्या सेवाकार्यात सतत बदल करत राहावे म्हणून आपण प्रार्थना करू या.

२) आपल्यावरील दुःखामुळेअडीअडचणी आणि संकटांमुळे आपण निराश न होता येशूच्या कृपेने जीवनाकडे अधिक आशेने पाहावे आणि तसे इतरांना आपल्या कृतीद्वारे शिकवावे म्हणून आपण प्रार्थना करू या.

३) आज आपला समाज रागद्वेष व अशांतेने व्यापून गेलेला आहे म्हणून आपण सर्व ख्रिस्ती भाविकांनी येशूचे अनुकरण करून आपल्या समाजात प्रेमएकोपा व शांतीची ज्योत पेटवण्यासाठी सदैव तत्पर असावे म्हणून आपण प्रार्थना करू या.

४) जे आजारी आहेतयातनेत आहेतअन्यायअत्याचारहिंसा यांना बळी पडलेले आहेत अशा सर्वांनी स्वर्गीय भाकरीत कृपेचा अनुभव घ्यावा म्हणून आपण प्रार्थना करू या.

५) थोडा वेळ शांत राहून आपण आपल्या वैयक्तिककौटुंबिक व सामाजिक हेतूंसाठी प्रार्थना करू या. 





No comments:

Post a Comment