Reflections for the
homily for the Christmas Day Mass (25-12-2025) by Fr. Glen
Fernandes
नाताळ २०२५ (दिवसाची मिस्सा)
विषय : ख्रिस्ताच्या
जन्मातील दैवी प्रेम
यशया
९:१-६ – “कारण आम्हाला पुत्र देण्यात आला आहे... त्याचे
नाव आश्चर्यदायी सल्लागार,
सामर्थ्यवान
देव, शाश्वत पिता, शांतीचा राजकुमार असेल.”
तीत २:११-१४ – “देवाची कृपा सर्व माणसांसाठी प्रकट झाली
आहे... तो स्वतःला आमच्यासाठी अर्पण करील.”
लूक २:१-१४ – “आज दाविदाच्या नगरीत तुमच्यासाठी तारणारा
जन्मला आहे, जो ख्रिस्त प्रभू आहे.”
प्रस्तावना
प्रिय बंधू आणि भगिनींनो,
नाताळ हा केवळ एक कुठलातरी सण नाही; हा एका दैवी
रहस्याचा उत्सव आहे,
ज्याने
मानवजातीचा इतिहास कायमचा बदलला. आर्चबिशप फुल्टन जे. शीन यांच्या शब्दांत, ख्रिस्त हा
एकमेव आहे ज्याच्या येण्याची भविष्यवाणी शतकांपूर्वी केली गेली होती, ज्याने
इतिहासाला दोन भागांत विभागले,
त्याच्या
येण्यापूर्वी आणि नंतर आणि जो या जगात
मरण्यासाठी आला,
जेणेकरून
आपण सारे जगू शकू.
ख्रिसमसचा हा
पवित्र सण आपल्याला पुन्हा एकदा त्या दैवी प्रेमकथेची आठवण करून देतो. हे रहस्य तत्वज्ञानी सॉरेन कियर्केगार्डने
आपल्या “राजा आणि
कन्येची प्रेमकथा” या रूपकात
सुंदर रीतीने व्यक्त केली आहे. ही कथा आपल्याला ख्रिसमसच्या गाभ्याकडे घेऊन जाते –
देवाच्या प्रेमाची कहाणी,
ज्याने
आपल्यासाठी स्वतःला पूर्णपणे दिले.
आज ह्या
मिस्साबलीदानात सहभागी होत असताना बाळ येशूने आपल्याला आशीर्वादित करून आपल्या अंतकरणात जन्म घ्यावा म्हणून आपण
प्रार्थना करूया.
चिंतन
कियर्केगार्डच्या
कथेत, एक राजा एका
झोपडीत राहणाऱ्या सामान्य मुलीवर प्रेम करतो. तो इतका सामर्थ्यशाली आहे की तो तिला
आपल्या साम्राज्यात आणू शकतो,
तिला
संपत्ती आणि वैभव देऊ शकतो. पण त्याला भीती आहे की जर त्याने आपली शक्ती आणि वैभव
दाखवले, तर ती कन्या
त्याच्यावर खरे प्रेम करणार नाही,
तर त्याच्या
संपत्तीवर किंवा भीतीमुळे त्याच्याशी बांधली जाईल. तो आपल्या सल्लेगारांना विचारतो
की त्याने काय करावे जेणेकरून ती त्याची होईल. ते अनेक असे सल्ले देतात, परंतु
राजाला मात्र त्यातील एकही सल्ला पटत नाही. राजाला तिच्याशिवाय जगणेही अशक्य होते.
म्हणून, राजा एक
धाडसी निर्णय घेतो. तो आपले राजवैभव सोडतो. एक सामान्य माणूस बनतो, आणि त्या
कन्येच्या गावात तिच्या जवळ राहायला येतो. तिच्यासारखच साध जीवन जगतो, जेणेकरून ती
त्याच्यावर खरे प्रेम करेल,
त्याच्या
हृदयासाठी,
न की
त्याच्या साम्राज्यासाठी.
ही कथा
ख्रिसमसच्या रहस्याचे सुंदर चित्र रंगवते. आजच्या वाचनांमध्ये आपण पाहतो की देव, जो विश्वाचा
राजा आहे,
आपल्यावर
इतके प्रेम करतो की त्याने स्वतःला मानव बनवले. संदेष्टा यशयाच्या भविष्यवाणीत आपण
ऐकले, “आम्हाला
पुत्र देण्यात आला आहे.” हा पुत्र
कोण आहे?
तो
सामर्थ्यवान देव आहे,
शांतीचा
राजकुमार आहे,
जो
आपल्यासाठी मध्यस्थी येतो,
आपल्यासारखाच
माणूस बनतो.
संत लूकच्या
शुभवर्तमानात आपण पाहतो की हा राजकुमार गोठ्यात जन्मला, साध्या
गाईच्या गोठ्यात,
मेंढपाळ आणि
ज्ञानी लोकांच्या नजरेत पडला,
जणू काही तो
एक सामान्य माणूस आहे.
कियर्केगार्डच्या
कथेप्रमाणे,
देवाने आपले
वैभव आणि सामर्थ्य दाखवले नाही. त्याने आपले स्वर्गीय सिंहासन सोडले आणि
आपल्यामध्ये,
आपल्यासारखा, एक नाजूक
बालक बनून आला. का?
कारण त्याला
आपले खरे प्रेम हवे आहे. तो आपल्याला त्याच्या सामर्थ्याने किंवा भीतीने बांधू
इच्छित नाही. तो आपले हृदय जिंकू इच्छितो, आपले प्रेम मिळवू इच्छितो, जे
स्वतंत्रपणे दिले जाते.
संत पौलाने
तीताला लिहलेल्या पत्रात आपण वाचतो की “देवाची कृपा सर्व माणसांसाठी प्रकट झाली
आहे.” ही कृपा
म्हणजे ख्रिस्ताचे येणे,
जो आपल्याला
पाप आणि मृत्यूपासून मुक्त करण्यासाठी स्वतःला अर्पण करतो. नाताळ हा केवळ एका
बालकाच्या जन्माचा उत्सव नाही;
हा देवाच्या
प्रेमाचा उत्सव आहे,
ज्याने
आपल्यासाठी सर्वकाही सोडले. ज्याप्रमाणे कियर्केगार्डच्या कथेतील राजा कन्येच्या
जवळ येण्यासाठी आपले वैभव सोडतो,
त्याचप्रमाणे
येशू आपल्यामध्ये येतो,
आपल्या
दुखण्यात,
आपल्या
संघर्षात,
आपल्या
आनंदात आणि दुःखात सहभागी होतो.
आज, जेव्हा आपण
गव्हाणीत त्या बालकाकडे पाहतो,
तेव्हा आपण
खऱ्या अर्थाने काय पाहतो?
आपण पाहतो
एका राजाला,
जो आपल्या
प्रेमासाठी साधा बनला. आपण पाहतो एका तारणहाराला, जो आपल्याला
मुक्त करण्यासाठी आपला जीव देईल. संत लूकच्या शुभवर्तमानात, देवदूत
घोषणा करतात,
“आज तुमच्यासाठी तारणारा जन्मला आहे.” हा तारणारा आपल्या प्रत्येकासाठी आला
आहे – तुमच्यासाठी,
माझ्यासाठी, आणि
प्रत्येकासाठी ज्याला त्याच्या प्रेमाची आवश्यकता आहे.
प्रिय
मित्रांनो,
नाताळचा हा
सण आपल्याला चिंतन करण्यास आमंत्रित करत आहे.
आपण या दैवी प्रेमाला कसा प्रतिसाद देणार आहोत? कियर्केगार्डच्या
कथेतील कन्येप्रमाणे,
आपणही या
राजाच्या प्रेमाला स्वीकारू शकतो. तो आपल्याला त्याचे सर्व काही सोडून आपल्या
पातळीवर,
आपल्या
जीवनात, भेटायला आला
आहे. आपण त्याला आपल्या हृदयात स्थान देऊ शकतो का? आपण
त्याच्यावर खरे प्रेम करू शकतो का,
त्याच्या
सामर्थ्यासाठी नव्हे,
तर त्याच्या
नम्रतेच्या आणि बलिदानाच्या प्रेमासाठी?
या
ख्रिसमसला,
चला आपल्या
जीवनात येशूला आमंत्रित करूया. ज्याप्रमाणे मेंढपाळांनी आणि ज्ञानी लोकांनी त्याला
शोधले आणि त्याला भेट दिली,
त्याचप्रमाणे
आपणही त्याच्याकडे जाऊया. आपल्या प्रार्थनेत, दयाळूपणाच्या
कृतीत, आणि आपल्या
शेजाऱ्यांशी प्रेम वाटून आपण नाताळ साजरा करूया. ख्रिसमसच्या या प्रेमकथेला आपल्या
जीवनात खरी करूया,
जेणेकरून
आपणही ख्रिस्ताच्या प्रेमाचे साक्षीदार बनू शकू.
प्रार्थना:
हे प्रेमळ देवा, तू आमच्यासाठी स्वतःला नम्र केलेस आणि गव्हाणीत बालक बनून आमच्यामध्ये आलास. तुझ्या या दैवी प्रेमाबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. आम्हाला तुझ्या प्रेमाला स्वीकारण्याची आणि आमच्या जीवनात ते जगण्याची शक्ती दे. ख्रिसमसचा हा आनंद आमच्या हृदयात आणि जगात पसरू दे. आमेन.
विश्वासू
लोकांच्या प्रार्थना:
१. आपले
परमगुरु,
पोप लियो
चौदावे, आपले बिशप, सर्व
धर्मगुरू आणि सर्व ख्रिस्ती बांधवांना बाळ येशूचे दैवी मार्गदर्शन लाभावे आणि
त्याद्वारे ख्रिस्तसभेची समृद्धी वाढावी यासाठी प्रार्थना करूया.
२. आज
देशादेशात अशांतता आहे. देश-विदेशात आणि प्रत्येक प्रांतात देवाच्या प्रेमाला
जाणून घ्यावे,
सर्वत्र
शांती नांदावी यासाठी आपण प्रभूकडे याचना करूया.
३. आपल्या
धर्मग्रामात मूलगामी समूहांद्वारे समाज एकजुटीला गती मिळावी, गावोगावी
असलेले भेदभाव दूर होऊन आपण सर्व एक कुटुंब बनावे यासाठी प्रार्थना करूया.
४. आपल्या
धर्मग्रामातील आजारी,
दुखी आणि
पीडित व्यक्तींना येशू बाळाचा कृपाशीर्वाद मिळावा, त्यांचे
दुःख आणि आजार कमी व्हावेत परमेश्वराने त्यांचे सांत्वन करावे यासाठी प्रार्थना
करूया.
५. आता काही
क्षण शांत राहून आपल्या वैयक्तिक गरजा आणि हेतूसाठी प्रार्थना करूया.
No comments:
Post a Comment