Reflections for the homily for the Holy Family of Jesus, Mary, Joseph (28-12-2025) by Br. Criston Marvi
पवित्र कुटुंबाचा सण
दिनांक: २८/१२/२०२५
पहिले वाचन: प्रवक्ता:
३: २-६, १२-१४
दुसरे वाचन: कलस्सैकरांस
पत्र: ३: १२-२१
शुभवर्तमान: मत्तय: २:
१३-१५, १९-२३
प्रस्तावना:
ख्रिस्ताठायी जमलेल्या बंधू-भगिनींनो आज
संपूर्ण ख्रिस्तसभा पवित्र कुटुंबाचा सण साजरा करत आहे. आजची सर्व वाचणे आपल्याला
कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीने कशापकारे कुटुंबात राहून कुटुंबात पावित्रता नांदावी
याविषयी सांगत आहेत.
आजच्या पहिल्या वाचनात प्रवक्ता सांगतो
की, जर का खरे व भरपूर धनदौलत जमवायची असेल
तर प्रथम आपल्या आई-वडिलांना मान द्यावा. त्यांचा सन्मान करावा. आणि दुसऱ्या
वाचनात संत पौल कुटुंबाच्या प्रत्येक सदस्यांची जबाबदारी काय आहे हे पटवून देताना
त्याद्वारे आपण देवपित्याची उपकार स्तुती करतो,
या याविषयी
सांगत आहे. तसेच शुभवर्तमानात संत जोसेफ एक पिता व कुटुंब प्रमुख म्हणून
कशाप्रकारे देवाच्या संदेशाचे पालन करतो याबद्दल नमूद करण्यात आले आहे.
मनन चिंतन
स्नान संस्काराने आपण परमेश्वराच्या
कुटुंबाची मुलं बनलो आहोत. तीन दिवसा अगोदर आपण नाताळ साजरा केला. आणि आज आपण ह्या
पवित्र कुटुंबाचा सण साजरा करत आहोत. ह्यावरून आपल्याला दिसून येते की, देऊळ माता ही कुटुंबाला किती महत्त्व
देते. आणि नाझरेथच्या पवित्र कुटुंबाचे उदाहरण घेऊन आपल्याला आपले स्वतःचे कुटुंब
शांतीने व जबाबदारीने नांदायला आव्हान करीत आहे.
देऊळ माता आपल्याला ख्रिस्ताच्या नेतृत्वाखाली
आपले कुटुंब उभारण्यास सांगत आहे.
संत पौल सांगतो की, देव सर्व सत्ताधारी असावा (१ करंथि १५:
२८). म्हणून आपण कुटुंबात एकत्र राहत असताना दुसऱ्यांमध्ये देव पण पाहिलं पाहिजे
आणि आपण स्वतः सुद्धा आपल्यामध्ये देव पण दाखवलं पाहिजे.
ख्रिस्ती कुटुंबाचा अविभाग्य घटक म्हणजे
एकत्र प्रार्थना करणे. नाझरेथच्या कुटुंबावर लक्ष केंद्रित करत असताना आपण त्या
तीन व्यक्तींच्या जीवनावर मनन चिंतन करूया.
पहिली व्यक्ती संत जोसेफ यांच्या जीवनावर
आपण मनन चिंतन करूया.
संत जोसेफ हा शांत आणि सज्जन माणूस होता.
प्रत्येक कुटुंब प्रमुखाने ह्या गोष्टी आत्मसात करायला हव्यात. आपण आपल्या समाजात
पाहतो की, मुलांना किंवा आईला हवी असली एखादी गोष्ट
वडील पुरवत असतात. परंतु वडिलांनाही हवी असलेल्या गोष्टी न पुरवता ज्या गोष्टींनी
गरज आहे अशाच गोष्टी दिल्या पाहिजेत. आणि जेव्हा आपल्या कुटुंबात वादविवाद किंवा
अशांती असते तेव्हा शांत मनाने व विचारपूर्वक निर्णय घेऊन घरात शांतता पसरवीने.
दुसरी व्यक्ती पवित्र मरिया: मरीयेला
जेव्हा तिचा पुत्र लहान असताना तिच्या पुत्रामुळे दुःखाच्या डोंगराची भविष्यवाणी
झाली तेव्हा सुद्धा तिने तिच्या पुत्राचा,
एक आदर्श आई
म्हणून त्याचे संगोपन व पालनपोषण केले. व घडलेल्या सर्व गोष्टी आपल्या मनात
ठेवल्या. कुटुंबातील प्रत्येक बाळ हे त्याच्या आईच्या सानिध्यात वाढत असते. आई
त्या बाळाची वाढ ही कोणत्या सद्गुणाने करते हे बाळाला पाहून ओळखता येते. म्हणून
आईने आपल्या दापत्यांना धर्माची गोडी लावावी व ख्रिस्तसभेच्या कार्यात सहभागी
घेण्यास प्रोत्साहन करावे.
तिसरी व्यक्ती येशू ख्रिस्त, जरी
स्वर्गीय पित्याने येशू ख्रिस्ताला एका महत्त्वाच्या कार्यासाठी पाठवलेले होते
तरीसुद्धा येशू हा संत जोसेफ व पवित्र मरियेच्या आज्ञेत व सुसंवादात वाढत गेला. कुटुंबातील
प्रत्येक दांपत्यां समोर त्याला आज हे आव्हान आहे. जरी दांपत्य बाळ किंवा लग्न
झालेली व्यक्ती असो. प्रत्येक मुलाने आपल्या आई-वडिलांच्या आज्ञेत व सुसंवादात
राहणे. आता प्रश्न आहे तो म्हणजे ज्या दापत्यांना एकच पालक आहे. आई किंवा वडील
कदाचित देवाघरी निघून गेले असतील किंवा कदाचित दोन्ही पालक नसतील. अशा या
परिस्थितीत मुलांनी ज्या गोष्टी आपल्या पालकांनी आपल्याला ते जिवंत असताना करू
दिल्या नाहीत अशा गोष्टी आजही करण्यापासून टाळाव्यात. अशाच प्रमाणात आपण आपल्या
पालकांच्या आज्ञेत, सुसंवादात व प्रेमात वाढू शकतो.
नाझरेथचे पवित्र कुटुंब, हे पवित्रतेत करणारे व एकीने राहणारे होते
कारण त्यांच्यात असलेले एकमेकावरचे प्रेम होते. त्या तिघांनी एकमेकांच्या अहंकार
पासून दूर राहून प्रेमाचे वातावरण आपल्या कुटुंबात पसरवून आपले कुटुंब पवित्र
केले. आणि संपूर्ण जगाला शांती, एकी, आज्ञाधारक,
पवित्रता व
प्रेमाचा संदेश दिला.
माझे कुटुंब पवित्र करण्याची जबाबदारी ही
कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची आहे. माझ्या कृतीद्वारे मी माझे कुटुंब पवित्र
करण्याचा प्रयत्न करतो का?
आज आपण पवित्र कुटुंबाचा सण साजरा करताना
आपण नाझरेथच्या कुटुंबाचा आदर्श आपल्या कुटुंबासाठी घेवून व आपल्या कुटुंबात
प्रेम, दया, शांती नादण्यास देवाकडे विशेष आशीर्वाद मांगुया तसेच माझे कुटुंब
पवित्र करण्यासाठी हवे असलेली कृपा परमेश्वराकडे आपण आजच्या या पवित्र मिस्सा बलीदानात
मागूया.
विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: हे पवित्र कुटुंबा, आम्हासाठी प्रार्थना कर.
१) आपले परमगुरुस्वामी पोप लियो, महागुरू, सर्व धर्मगुरू, धर्मभगिनी-धर्मबंधू ह्यांच्यावर व
त्यांच्या कार्यावर प्रभूचा आशीर्वाद असावा, तसेच त्यांच्या कार्याद्वारे त्यांनी
लोकांना एक पवित्र व आदर्श कुटुंब उभारण्यास मदत करावी म्हणून आपण प्रार्थना
करूया.
२) जी कुटुंबे काही कारणास्तव उध्वस्त झाली आहेत, अशांना योसेफ, मरिया व येशू ख्रिस्ताचे चांगले
मार्गदर्शन लाभून त्यांना शांतीचे, प्रेमाचे व समजूतदारपणाचे वरदान लाभावे
म्हणून आपण प्रार्थना करुया.
३) इथे हजर असलेल्या प्रत्येकाच्या कुटुंबात शांती, प्रेम, ऐक्य सतत नांदावे व सर्व इच्छा, हेतू व आकांक्षा पवित्र कुटुंबाच्या
मध्यस्थिने पूर्ण व्हाव्यात म्हणून आपण प्रार्थना करूया.
४) जी कुटुंबं देवापासून दुरावली आहेत, अशा सर्व कुटुंबांना देवाचा स्पर्श
व्हावा आणि ती देवाच्या सानिध्यात परत यावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
५) आता आपण थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक आणि आध्यात्मिक हेतूंसाठी
प्रार्थना करूया.
No comments:
Post a Comment