Wednesday 19 February 2014

We are celebrating our Silver Jubilee Week of our service of Capuchin Marathi Homily. It has been a wonderful journey of learning and serving. We gladly thank you for your generous support by your more than 5000 views, hundreds of comments, feedback and words of encouragement. 

We hope to serve you in future with better reflections and spiritual insights. Your suggestions would be our guiding principle. 



Reflections for Homily By:- Allwyn Gonsalves.







सामान्य काळातील सातवा रविवार

दिनांक:-२३ फेब्रुवारी २०१४.
पहिले वाचन:- लेवीय; १९:-, १७-१८.
दुसरे वाचन:-१करिंथकरांस पत्र; :१६-२३.
शुभवर्तमान:-मत्तय; :३८-४८.



''तुम्ही आपल्या वै-यांवर प्रीति करा आणि जे तुमचा छळ करितात त्यांच्यासाठी प्रार्थना करा.''


प्रस्तावना:

ख्रिस्ताठायी जमलेल्या प्रिय भक्त जणांनो, आज देऊळ माता सामान्य काळातील सातवा रविवार साजरा करत आहे. आजची पवित्र वाचने आपल्याला आपल्या वै-यांवर प्रीति करण्यास जे आपला छळ करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करण्यास बोलावत आहेत.
आजचे पहिले वाचन लेवीयच्या पुस्कातून घेतलेले असून आपल्याला ह्या वाचनामध्ये एक विशिष्ट नियम पाहवयास मिळतो, तो म्हणजे ''शेजा-यांवर प्रीति करा.'' आजचे दुसरे वाचन संत पौलाचे करिंथकरांस पहिल्या पत्रातून घेतलेले आहे. संत पौल म्हणतो की, आपण देवाचे पवित्र मंदिर आहोत आणि देवाचा सहवास आपल्याबरोबर सदोदीत आहे. जर आपल्याला ज्ञानी व्हावे असे वाटत असेल तर आपण मूर्ख झाले पाहिजे कारण जगाचे ज्ञान देवाच्या दुष्टीने मूर्खपणा आहे.
आजच्या शुभवर्तमानाद्वारे येशू ख्रिस्त आपणास सांगतो की, तुम्ही कोणाचा सूड घेऊ नका, जर कोणी तुमच्या उजव्या गालावर मारितो, त्याच्यासमोर दुसरा गाल करा. तसेच तुमच्या शेजा-यांवर वै-यांवर देखील  प्रीति करा आणि जो तुमचा छळ करतो त्याच्यासाठी प्रार्थना करा". आपण जर दुस-यांना क्षमा केली, तर आपला स्वर्गीय पिता देखील आपल्याला क्षमा करील. दुस-यांना क्षमा करण्यासाठी परमेश्वराची कृपा आपल्यावर असावी म्हणून या पवित्र मिस्साबलिदानात आपण विशेष प्रार्थना करूया.

सम्यक विवरण:

पहिले वाचन:- लेवीय; १९:-, १७-१८.

प्रभू परमेश्वर मोशेला इस्त्राएलाच्या सर्व लोकांस पवित्र राहण्यास सांगतो कारण परमेश्वर त्यांचा देव आहे. तसेच शेजा-यांवर स्वत:सारखी प्रीती करा असे परमेश्वर इस्त्राएलाच्या जनतेला मोशेद्वारे सांगतो.

दुसरे वाचन:- करिंथकरांस पहिले पत्र; :१६-२३.

संत पौल म्हणतो की, आपण देवाचे पवित्र मंदिर आहोत आणि देवाचा सहवास आपल्याबरोबर सदोदीत आहे. जर आपल्याला ज्ञानी व्हावे असे वाटत असेल तर आपण मूर्ख झाले पाहिजे कारण जगाचे ज्ञान देवाच्या दुष्टीने मूर्खपणा आहे.

शुभवर्तमान:-मत्तय; :३८-४८.

प्रीति क्षमा ह्या दोन तत्वांमुळे ख्रिस्ती समाज ह्या जगात विशेषता ओळखला जातो. आपल्याला ही तत्वे समजून घेतली पाहिजेत, त्यासाठी प्राचीन काळापासून ते येशू ख्रिस्तापर्यत वै-यांविषयी जे वेगवेगळे नियम बनवले गेले होते त्यावर आपण विचार-विनीमय करूया.

. प्राचीन काळातील वै-यांविषयीचे नियमशास्त्र: मोशेच्यापूर्वी दोन प्रकारचे नियम होते.
. कुटुंबाचा प्रतिकार:
मोशेच्या अगोदरच्या काळात काही जाती-जमाती राहत होत्या त्यांच्यासाठी हा नियम खूप पवित्र होता. ह्या नियमाचे विशेष महत्व म्हणजे जर एखादया कुटुंबातील व्यक्तीचा खून किंवा त्याची मारहाण केली असेल तर कुटुंबातील जवळच्या पुरुषाने संधी मिळताच त्याचा वचपा काढणे हे त्याचे कर्तव्य होते. ''रक्तपाताबद्दल सूड घेणा-याने स्वत: त्या खुनी मनुष्याला जिवें मारावे, तो सापडेल तेथे त्याने त्याला जिवे मारावे.''(गणना; ३५:१९).
. तालिओनचा नियम:
वरील नियम खूप क्रूर होता कारण ह्या नियमाप्रमाणे जर एका माणसाने दुस-या माणसाचा खूण केला असेल तर त्यामुळे त्याचे संपूर्ण कुटुंब दु:खी होते. ह्या कारणास्तव फक्त मारेक-याचाच  नाही तर त्याच्या सर्व कुटुंबियांचा खून करण्याची परवानगी त्यांना मिळत असे. अब्राहमच्या शंभर वर्षानंतर त्या प्रदेशात हमुराबी नावाच्या राज्याची सत्ता आली. तो राजा खूप बुद्धिमान व शक्तिशाली होता; त्याने तलिओन नावाचा नियम प्रस्तापित केला. ह्या नियमानुसार जर कोणी आपल्याला इजा पोहोचविली असेल तर त्याच मापात त्याचा बदला घ्यावा:उदा:- डोळ्याबद्दल डोळा, दाताबद्दल दात, हाताबद्दल हात. ह्या नियमाद्वारे त्याने अगोदरच्या नियमाची क्रूरता कमी केली. जेव्हा ५०० वर्षानंतर मोशेने नियम तयार केला तेव्हा ह्याच नियमाचा वापर केला हे आपण अनुवाद; १९:२१ मध्ये पाहतो; ''तू दया दृष्टि करू नये, जिवाबद्दल जीव, डोळ्याबद्दल डोळा, दाताबद्दल दात, हाताबद्दल हात आणि पायाबद्दल पाय असा दंड किंवा शिक्षा करावी.''
. येशू ख्रिस्ताने वै-यांविषयी मांडलेला नियम:
 येशू ख्रिस्ताने आपला नियम सर्वांसमोर सरळ आणि सोप्या भाषेत मांडला आहे. तो म्हणजे, तुम्ही आपल्या वै-यांवर प्रीति करा आणि जे तुमचा छळ करितात त्यांच्यासाठी प्रार्थना करा आणि हा नियम सर्वांना समजावा म्हणून सर्व लोकांपुढे ख्रिस्ताने एका चांगल्या शमरोन्याचा दृष्टांत बायबलमध्ये दिलेला आहे (लूक; १०:३०-३७). येशूने जेव्हा हा नियम त्याच्या शिष्यांसमोर लोकांसमोर मांडला तेव्हा त्या नियमाचे अवलंबन करण्यास त्यांना खूप कठीण गेले. हा नियम त्यांना समजावून देण्यासाठी येशूने त्यांच्यासमोर चार उदाहरणे दिली.

. ''जो कोणी तुझ्या उजव्या गालावर मारितो, त्याच्याकडे दुसरा गाल कर.''(मत्तय; :३९):
जर कोणी आपल्याला मारत असेल तर तुम्ही त्याच्यावर हात उचलता, त्यांचा मार सहन करा, असे येशू आपल्याला सांगत आहे. तसेच आपण त्या माराचा योग्यरित्या प्रतिकार केला पाहिजे, उदा: ज्यावेळी येशूला वरिष्ट धर्मगुरूच्या  सैनिकांनी मारले त्यावेळी येशूने दाखविलेला प्रतिकार, ''मी वाईट रीतीने बोललो असलो तर कसे वाईट बोललो ते सिद्ध कर, योग्य रीतीने बोललो असलो तर मला का मारतोस?'' (योहान; १८:२३).
आपण सामान्य माणसासारखा बदला घेण्याचे विचार करू नये, ज्याप्रमाणे संत पौल रोमकरांस पत्र ह्यामध्ये सांगतो की, ''तुम्ही सूड उगवू नका, तर देवाच्या क्रोधाला वाट दया तुझा शत्रू भुकेला असल्यास त्याला खावयाला दे, … कारण असे केल्याने तू त्याच्या मस्तकावर निखा-याची रास करशील. वाईटाने जिंकला जाऊ नको, तर -याने वाईटाला जिंक'' (रोमकरांस पत्र; १२:१९-२१).

. ''जो तुझ्यावर फिर्याद करून तुझी बंडी घेऊ पाहतो त्याला तुझा अंगरखाहि घेऊ दे'' (मत्तय; :४०): ह्या शिकवणुकीची परिपूर्णता येशू ख्रिस्ताने स्वत:च्या जीवनापासून सुरूवात केली. त्याने आपल्या सर्वांसाठी क्रुसावर प्राण अर्पण केला आपल्या ख्रिस्ती जीवनाचे महत्व पटवून दिले.

. ''जो कोणी तुला वेढीस धरून एक कोस नेईल त्याच्याबरोबर दोन कोस जा'' (मत्तय; :४१):  जर तुम्हाला कोणापासून त्रास किंवा छळ होत असेल तर तुम्ही त्याच्याबरोबर जास्त वेळ रहावे जेणेकरून कदाचित त्याचे हृदय परिवर्तन होईल तुम्हाला त्रास देणार नाही.

. ''जो तुझ्याजवळ काही मागतो त्याला दे आणि जो तुझ्यापासून उसने घेऊ पाहतो त्याला पाठमोरा होऊ नको'' (मत्तय; :४२): जो कोणी आपल्या दारमध्ये उभा राहून आपल्याजवळ मदत मागत असेल तर त्यास मदत करा; पेत्र त्याच्याकडे येउन म्हणाला,'प्रभुजी माझ्या भावाने किती वेळा माझा अपराध केला असता मी त्याला क्षमा करावी? सात वेळा काय?' येशू त्याला म्हणाला,'सात वेळा असे मी तुला म्हणत नाही तर सातच्या सत्तर वेळा.'"(मत्तय १८:२१-२२) .

बोध कथा:

एकाच गावातले एकमेकांच्या ओळखीचे असलेले दोन प्रवाशी गर्दी असलेल्या बसमध्ये उभे राहून प्रवास करत होते. एका प्रवाशाच्या बुटाचा पाय दुस-या प्रवाशाच्या चप्पल घातलेल्या पायावर पडला. तो मनुष्य वेदनेने ओरडला आणि समोरच्या प्रवाशाच्या एक थोबाडीत मारून बुटाचा पाय बाजूला करायला सांगितले. थोबाडीतील चपराक सहन करून सुध्दा तो प्रवासी आपली चूक होती म्हणून लज्जीत होऊन मान खाली घालून गप्प बसला.
तो एक चांगला कॅथलिक होता.रात्री जेवणाअगोदर कुटुंबियांना एकत्र बोलावून तो रोझरी म्हणत असे. त्याने रोझरीची प्रार्थना म्हणण्यास सुरवात केली आणि आमच्या बापा म्हणताना 'जसे आम्ही आमच्या अपराध्यांना क्षमा करतो...' ह्या शब्दांपाशी येऊन तो अडखळून थांबला. बसच्या प्रसंगाची त्याला आठवण झाली. आपल्या कुटुंबियांना रोझरी चालू ठेवण्याचे सांगून तो घराबाहेर पडला. काही वेळ चालल्यावर तो त्या दुस-या प्रवाशाच्या घराजवळ पोहचला आणि दारापाशी जाऊन त्याने दरवाजा ठोठावला. दरवाजा उघडा होताच ओणवा पडून त्याने त्याचे पाय धरले म्हणाला, 'बसमधल्या प्रसंगाबद्दल मला क्षमा करा; मी सहनशीलता बाळगायला पाहिजे होती. मी नुकता रोझरीची प्रार्थना अर्धवट सोडून आलो आहे. जोपर्यंत मी तुला माफी केली नाही, तोपर्यंत मी ईश्वराकडे माझ्या अपराधांची माफी कोणत्या तोंडाने मागू?' हा सर्व प्रकार कुटुंबिय बघत होते ऐकत होते. त्या माणसाने त्याला छातीशी धरून कवटाळले व म्हटले, मी तुम्हाला क्षमा केली आहे. आपण एकमेकांचे मित्र आहोत आणि ख्रिस्तामध्ये भाऊबंद आहोत.

मनन-चिंतन:

.         आजच्या उपासनेची वाचने आपल्याला आपल्या जीवनात परिपूर्ण कसे बनावे ह्याविषयी सांगत आहेत. जुन्या करारात देवाने त्यांच्या लोकांना सांगितले होते की, तुम्ही पवित्र राहा, कारण मी तुमचा देव पवित्र आहे. हेच वचन येशू ख्रिस्त शुभवर्तमानात सांगत आहे, ''तुम्ही पूर्ण व्हा कारण तुमचा स्वर्गीय पिता पूर्ण आहे''. देव आणि त्याचा पुत्र परिपूर्ण होऊ शकतो, परंतू मानवास हे अशक्य आहे त्यामूळे देवाने पवित्र आत्मा आपल्यामध्ये पाठविलेला आहे जो आपल्यामध्ये सहवास करून आपल्याला सहाय्य करतो.
आजचे शुभवर्तमान आपल्याला आपल्या शेजा-यांवर शत्रूवर प्रेम करावयाचे आवाहन करते. आपल्याला खरे ख्रिस्ताचे अनुयायी बनायचे असेल तर आपल्याला सर्वांना क्षमा करावी लागेल विशेष करून जे आपल्याला त्रास देतात आपला छळ करतात त्या सर्वांवर आपण प्रेम केले पाहिजे. जी. के. चेस्टटन म्हणतात, ''आपल्याला आज्ञा केली आहे की आपण आपल्या शेजा-यांवर आणि वै-यांवर प्रीती केली पाहिजे, कारण आपण सर्व सारखेच एकाच देवाची मुले आहोत.'' जे आपल्यावर प्रेम करतात त्यावर प्रेम करण्यास आपल्याला काही त्रास होत नाही, परंतू जे आपल्याला आपल्या जीवनात त्रास देतात छळ करतात त्यावर प्रेम करणे कठीण असते. खूपवेळा आपण असे ऐकतो की, एका माणसाला मी क्षमा करू शकतो परंतू त्या माणसाने दिलेल्या त्रासाला मी कधीच विसरू शकत नाही परंतू प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, "जर तुम्ही लोकांना क्षमा केली नाही तर तुमचा पिताही तुमच्या अपराधांची क्षमा करणार नाही"(मत्तय ५:१५). अपराध करणे मानवी असते, परंतू क्षमा करणे हे दैवी असते. जगावेगळी शिकवण देणारा प्रभू ख्रिस्त क्रुसावर प्राण सोडण्याअगोदर आपल्या मारेक-यांना क्षमा करत म्हणतो, ''हे बापा, त्यांना क्षमा कर; कारण ते काय करितात हे त्यांना समजत नाही''(लुक २३:३४).आपल्याला जर येशूचे चांगले आदर्श शिष्य व्हावे असे वाटत असेल तर आपण आपल्या अपराध्यांना मनापासून क्षमा करणे गरजेचे आहे.

.        कोणतीही सेवा करायची असेल तर त्याची सुरूवात आपल्या घरापासून झाली पाहिजे व ती आपल्या शेजारी वै-यांपर्यंत पोहचली पाहिजे. आपण ज्या लोकांना प्रत्यक्ष ओळखत नाही त्यावर प्रेम करणे खूप सोपे जाते, त्यांना आपण प्रत्यक्षपणे ओळखत नाही, ते आपल्या सान्निध्यात येत नाहीत परंतू आपला शेजारी हा आपला शत्रू होतो, कारण आपण त्याच्यासोबत एका गावात राहतो व दररोज देवाण-घेवाण करतो
परंतू ख्रिस्ती धर्म आपल्याला शेजा-यांवर वै-यांवर प्रीती करा जो आपला छळ करतो त्यांच्यासाठी प्रार्थना करा, अशी शिकवण देतो. ही शिकवण आत्मसात करण्यासाठी ख्रिस्ताने त्याचा पवित्र आत्मा आपल्या मार्गदर्शनासाठी सदोदीत आपल्या बरोबर असेल असे आपल्याला अभिवचन दिले आहे. आजच्या ह्या पवित्र मिस्सा बलिदानात आपण ह्याच पवित्र आत्म्याकडे विशेष प्रार्थना करूया, जेणेकरून आपल्याला शेजा-यांवर वै-यांवर प्रेम क्षमा करण्यास धैर्य सामर्थ्य मिळावे.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

प्रतिसाद: हे प्रभो, आम्हाला क्षमा प्रेम करण्यास धैर्य दे.
. हे प्रभो परमेश्वरा, जेथे लोकांच्या मनात जातियतेचा वणवा पेटला आहे; तो वणवा विझवून तेथे ख्रिस्ताने माणुसकीचे मंदिर सजवावे आपल्या समाजात शांतीचे प्रेमाचे वातावरण निर्माण करावे म्हणून आपण प्रार्थना करू या.
. धर्मगुरू, राज्यकर्ते, कलाकार, अभिनेते आणि प्रशासकीय अधिकारी यांनी ख्रिस्ताच्या शांतीचे साधन बनावे, ख्रिस्ताचा प्रेममय संदेश आपल्या शब्दाद्वारे कृतीद्वारे जगजाहीर करावा म्हणून आपण प्रार्थना करू या.
. जे तरुण तरुणी देवापासून दूर गेलेले आहेत त्यांना प्रभू-प्रेमाचा स्पर्श होऊन येशुख्रिस्त हाच खरा मार्ग,प्रकाश व जीवन आहे हे सत्य त्यांनी स्वीकारावे, म्हणून आपण प्रार्थना करू या.
. आपण आपले दैनदिन जीवन जगत असताना ख्रिस्ताचे उदाहरण समोर ठेऊन आपण आपल्या अपराध्यांना क्षमा करावी ख्रिस्तीधर्माची क्षमेची शिकवण आपल्या आचरणात आणावी, म्हणून आपण प्रार्थना करू या.
. थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक गरजांसाठी आपण प्रार्थना करू या.

3 comments: