Thursday 2 January 2020



Reflection for the Homily of Solemnity of  Epiphany of the Lord (05-01-2020) by Br Brijal Lopes



प्रकटीकरणाचा सण





दिनांक: ०५/०१/२०२०
पहिले वाचन:  यशया ६०:१-६
दुसरे वाचन: इफिसकरांस पत्र ३:२-,५-६
शुभवर्तमान: मत्तय २:१-१२

प्रस्तावना:
बाळ येशूच्या दर्शनाला, ख्रिस्तराजाच्या दर्शनाला, ऊंटाचा लांडा निघाला.”
आज देऊळमाता प्रकटिकरणाचा सण साजरा करीत आहे. देवाने मानवी रूप धारण करून मानवामध्ये वस्ती केली. मानवाच्या तारणासाठी त्याने स्वतःला रिक्त केले. जगाच्या उद्धारासाठी व तारणासाठी त्याने स्वतःला आपल्या प्रेमाखातर अर्पण केले. प्रकटिकरण म्हणजे परमेश्वराने लोकांना तारणप्राप्तीची केलेली घोषणा असे होय. प्रकटीकरण ह्या सोहळ्यात आपण आज पूर्वेकडून आलेल्या तीन ज्ञानी मनुष्यांचा सण असे म्हणून देखील साजरा करीत आहोत.
आजची उपासना आपणास सांगत आहे की, पूर्वेकडून आलेल्या तीन खगोलशास्त्रज्ञानी केवळ ख्रिस्त बाळाला नतमस्तक झाले नाही, तर विश्वासाच्या दानांद्वारे आपल्याला लाभलेले पाचारण त्यास विश्वासाच्या प्रतिसादाद्वारे स्वतःचे आत्मसमर्पण केले. आपल्याला सुध्दा ख्रिस्ताचा शोध दैनंदिन जीवनात घेता यावा व त्याद्वारे आपण त्याचे चांगले अनुयायी बनावेत, म्हणून लागणारी कृपा व शक्ती आपण ह्या मिस्साबलीदान मागुया.

सम्यक विवरण:
पहिले वाचन: यशया: ६०:१-६

आजच्या पहिल्या वाचनात यशया संदेष्टा भाकीत करत आहे की, सर्व राष्ट्रे जेरुसलेममध्ये एकत्र येतील. निर्जन व उजाड प्रदेशात राहणाऱ्या लोकांना परमेश्वराचे तारण प्राप्त होईल. तसेच जगाचा तारणारा हा जेरुसलेमातून मोठ्या वैभवाने प्रकट होईल. संपूर्ण राष्ट्रांतील प्रजेची तारणाची आशा वाढणार आहे.

दुसरे वाचन: इफिसकरांस पत्र ३:२-,५-६
          संत पौल आपणास सांगत आहे की, ख्रिस्ताच्या आगमनाने व त्याच्या शुभवर्तमानाद्वारे यहूदी नसलेले लोक यहुदी लोकांचे सहकारी व वारसदार म्हणून ओळखले जात होते. ख्रिस्त तारणासाठी आलेला असून तो विश्वासाने आपणा सर्वांचे तारण करील, ही आशा यहुदी नसलेल्या लोकांच्या मनात भरून त्यांनी परमेश्वराचा स्वीकार केला.

शुभवर्तमान: मत्तय: २:१-१२
आजच्या शुभवर्तमानात संत मत्तय यशया संदेष्ट्याद्वारे केलेले भाकीत आज पूर्णत्वास नेत आहे. पूर्वेकडून आलेल्या तीन खगोलशास्त्रज्ञांनी ख्रिस्त बाळापुढे नतमस्तक होऊन आपल्या परीने जे देता येईल म्हणजे सोने, उद व गंधरस त्यांनी दिव्य बाळाला अर्पण केले व ते अर्पण त्याच्या भावी जीवनाचे प्रतिक बनले असे आपल्याला सांगण्यात आले आहे. त्यांना स्वप्नात दिलेल्या वाणीने दुसऱ्या वाटेने म्हणजेच नवीन जीवनाच्या दिशेने वाटचाल करावयास सांगितले आहे.

बोधकथा:
थॉमस मेस्टन हा प्रसिद्ध ख्रिस्ती लेखक होता. त्याने ख्रिस्ती धर्मात प्रवेश केलानंतर काही वर्षांनी त्याने ख्रिस्ती मठात प्रवेश केला व आपले जीवन देवासाठी समर्पित केले. हे मठवासी जीवन जगत असताना त्यांची भेट एका हिंदू संन्यास्यांबरोबर झाली. त्यांच्यासमवेत वार्तालाप करताना संन्यास्यांद्वारे दोन महान व्यक्तींच्या उल्लेखाने त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. त्या दोन व्यक्तींची मौल्यवान भेट म्हणजे, त्यांनी लिहिलेली पुस्तके: १) संत अगस्टीन ह्यांचे पाप निवेदन. २) थॉमस कँपिस ह्यांचे ख्रिस्ताचे अनुकरण. खरोखर जो व्यक्ती अख्रिस्ती असून त्यांनी बोलावून दाखविलेली दोन पुस्तकांचे लेखकाला नवल वाटले. ही कथा त्यांनी त्यांच्या पुस्तकात नमूद केलेली आहे.

 बोध:
असेच काही तरी आपण आपल्या दैनंदिन जीवनात अनुभवत असतो. आपल्याकडे अफाट संपत्ती आहे ती म्हणजेप्रभु शब्द’ (बायबल) व संतांचे प्रेरणादायी जीवन व विचार. पण ह्या गोष्टीकडे ध्यान न देता आपण क्षणभंगुर जीवन व गोष्टी याकडे अधिक लक्ष देतो.

 मनन चिंतन:
आजच्या शुभवर्तमानात आपण तीन प्रकारची लोक अनुभवतो:
१. ज्यांना देवाचे त्यांच्या जीवनात असलेले स्थान व त्याची महानता कळाली आहे ते: ज्या देवावर ते संपूर्ण हृदयाने, मनाने व एकनिष्ठेने त्याची आराधना करतात त्या व्यक्ती म्हणजेच जोसेफ, मरिया.
२. खगोलशास्त्रज्ञ: ह्या प्रकारची लोक ज्यांचे दरबार सर्व सुख-समृद्धीने भरलेले असून आपले सर्व काही सोडून तार्‍याच्या मार्गदर्शनाने व संपूर्ण अंत:करणाची तयारी करून देवाला पाहण्यासाठी व त्याला जीवनाचा नजराणा भेट देण्यासाठी गव्हाणीजवळ येतात. आपलं संपूर्ण आयुष्य त्याच्या समोर समर्पित करतात.
३. हेरोद राजासारखी: देवाचा शोध घेण्यासाठी तयार झाला, पण सत्यपरिस्थिती वेगळी होती. ख्रिस्त बाळाचा जन्म व त्याला भेटण्यासाठी गेलेली लोक यामुळे तो घाबरून गेला होता. तो दुःखी होता.
          पवित्र मरिया व योसेफ ह्यांनी देवाची इच्छा जीवनात स्वीकारून त्याचे अनुकरण केले. खगोलशास्त्रज्ञांनी ख्रिस्त बाळाचा शोध घेण्यासाठी, त्यांनी तार्‍याकडे पाहून ख्रिस्तबाळा पर्यंत ते पोहोचले. पण हेरोद राजा मात्र स्वतःच्या बचावासाठी, राज्य मुकुट जपण्यासाठी व त्याचे राजासण बचावासाठी तो प्रयत्न करत होता.
                    खगोलशास्त्रज्ञां प्रमाणे आपण आपले जीवन वाईटाकडे न वळवता चांगल्या मार्गाकडे वळावे व संत योसेफ व मरियेप्रमाणे देवाच्या इच्छेप्रमाणे जीवन जगता यावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: हे बाळ येशू आमची प्रार्थना ऐकून घे.

१. आपले परमगुरु स्वामी पोप फ्रान्सीस, महागुरू स्वामी, धर्मगुरू व व्रतस्थ ह्या सर्वांना देवाचा आशीर्वाद लाभाव व त्यांच्या पवित्र जीवनाद्वारे त्यांचा प्रकाश इतरांपर्यंत पोहचवावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
२. आपल्या राजकीय पुढाऱ्यांना देवाचा आशीर्वाद मिळावा व आपल्या सत्तेचा वापर जनतेच्या हितासाठी करावा व खरी शांती जगात प्रस्थापित करावी त्यासाठी त्यांना कृपया शक्ती मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
३. शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या सर्व कर्मचारांसाठी आपण प्रार्थना करूया त्यांच्या मार्गदर्शनाने व त्यांच्या कार्याने समाजाची प्रगती व्हावी व वाईट गोष्टींचा धिक्कार करून चांगल्या गोष्टी आत्मसात करण्यात त्यांना यश प्राप्त व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
४. आपल्या सर्वांसाठी आपणा प्रार्थना करूया की, जसे ज्ञानी पुरुष बाळ येशूला भेटायला गेले होते, त्याच प्रमाणे आपल्या समाजातील उपेक्षित व आजारी व्यक्तींना बाळ येशूचा संदेश आपल्या जीवनाद्वारे देण्यास आपण तयार असले पाहिजे म्हणून आपण प्रार्थना करूया.
५. आता आपण थोडावेळ शांत राहून आपल्या वयक्तिक, सामाजिक, कौटुंबिक हेतूंसाठी प्रार्थना करूया. 


No comments:

Post a Comment