Thursday 20 October 2022


          Reflections for the homily for 30th  Sunday in Ordinary Time (23-10-2022) by Fr. Benjamin Alphonso. 


दिनांक:  -१०-२०२२

पहिले वाचन: बेनसिरा ३५:१२-१४ 

दुसरे वाचन: २ तीमथी ४:६-८८,१६-१८

शुभवर्तमान: लुक १८:९-१४ 



“स्वतःला जो उंचवतो त्यास नमविले जाईल, व जो नम्र होतो, त्यास उंचावले जाईल”.

प्रस्तावना

आज आपण सामान्य काळातील तिसावा रविवार साजरा करत आहोत. आजची उपासना आपणास देवासमोर नम्र व लीन हृदयाचे असण्यास पाचारत आहे. आज आपण जगात पाहतो की भरपूर लोक ही गर्विष्ठ व स्वार्थी झालेली आहेत पण जर आपले तारण व्हायचे असेल तर आपण नम्र झाला पाहिजे. आजच्या पहिल्या वाचनात देवाच्या न्यायाची गणना केली आहे. देव सर्वांना न्यायाने एक समान वागणूक देत असतो. दुसऱ्या वाचनात संत पॉल आपल्या शिष्यांना स्वतःचे उदाहरण देत असतो त्यांनी जसे खडतर जीवन जगून ख्रिस्तासाठी सर्वस्व अर्पण केले तसे शिष्यांनीही करावे अशी तो अपेक्षा बाळगतो. तर शुभवर्तमानात संत लुक आपल्याला परुशी आणि जकातदार ह्याच्या दाखल्याद्वारे नम्रतेचा बोध करत आहे. "जो कोणी स्वतःला उंचावतो त्याच नमविले जाईल आणि जो कोणी नम्र होतो त्याच उंच केले जाईल". आपणही जकात दाराप्रमाणे नम्र होऊन परमेश्वराची नितांत सेवा करावी म्हणून आपण विशेष प्रार्थना करूया.

 

मनन चिंतन

एकदा एक मूर्तिकार होता. परंतु तो थोडा गर्विष्ठ होता. लोक नेहमी त्याच्या कलेची स्तुती करायची. त्याने बनवलेल्या मूर्ती बघण्यासाठी लोक लांबून यायची. जेव्हा त्याच्या मृत्यूची वेळ जवळ आली तेव्हा त्याने आपल्या मनात ठरवलं की आपण देवाला फसवूया म्हणून त्याने आपल्या स्वतः सारख्या बारा हुबेहूब पुतळे बनवले व तो ज्या खोलीत राहत होता त्या खोलीत ठेवले. जेव्हा त्याची वेळ पूर्ण झाली तेव्हा देवाचा दूत त्याला नेण्यासाठी त्याच्या घरी आला. तेव्हा दुताला त्या मूर्तिकारासारखी तेरा जण दिसू लागले. देवाचा दूत गोंधळून गेला की खरा मूर्तिकार कोण? दूत देवाजवळ परत गेला. दूताने देवाला आपली अडचण सांगितली तेव्हा देवाने दुताच्या कानात एक मंत्र सांगितला. देवाचा दूत परत त्या मूर्तीकाराच्या घरी आला. देवाचा दूत मूर्तिकाराच्या खोलीत येऊन म्हणाला  की मूर्ति फार सुंदर आहेत पण त्यात काही त्रुटी आहेत. इतक्यात खरा मूर्तिकार बाहेर आला आणि म्हणाला काय त्रुटी आहेत देवाचा दूत म्हणाला की त्रुटी ही आहे की तू तुझ्या अहंकाराला विसरू शकत नाही आता चल माझ्याबरोबर.

अहंकार हा माणसाचा नाश करत असतो आजच्या शुभवर्तमानात आपण ऐकतो की पुरुषी हा अहंकारी होता व गर्विष्ठ होता. आजच्या शुभवर्तमानामध्ये येशू ख्रिस्ताने परुषाची व जकातदाराची बोधकथा सांगितलेली आहे. परुशी मंदिरामध्ये प्रार्थना करण्यासाठी गेला परंतु प्रार्थना करण्याची त्यांनी देवाला स्वतःविषयी बढाया मारायला सुरुवात केली. त्या उलट जकातदार मंदिरामध्ये नम्र होऊन देवाची क्षमा मागतो म्हणून त्यास देवाची दया क्षमा प्राप्त होते. देव प्रत्येकाच्या बाह्यागांवर नव्हे तर हृदयाकडे पाहतो व त्यानुसार त्यांना न्याय देत असतो. जकातदार नम्र व पापी अंतकरणाने देवासमोर उभा राहिला म्हणून तो न्यायाने घरी गेला. त्यांनी त्याच्या भावना नम्रतेद्वारे व अपात्रपणे व्यक्त केल्या. आपणही त्या जकातदाराच्या वृत्तीचे असावे. देव नेहमी लीन आणि नम्र रुदय असणाऱ्याची प्रार्थना ऐकतो. जेव्हा आपण देवापुढे उभे राहतो तेव्हा आपण देवाकडे आदराने व पवित्र दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे. आपल्या कपड्यांमध्ये सभ्यता लीनता असावी. देव कोणाचा कर्जदार नाही. आपण चर्चमध्ये किंवा मंदिरामध्ये आल्याने देवावर उपकार करत नसतो. लोक मंदिरात जाऊन बाजारात गेल्यासारखे वागतात, थोडे पैसे दान टाकून काही मागत असतात कधी कधी काही लोक जे उच्च पदावर किंवा राजकारणी आहेत त्यांना वाटते की त्याला उच्च ठिकाणी बसवून सन्मानित करायला हवे. परंतु मंदिरामध्ये सर्व मनुष्य एक समान असतात तेथे भेदभाव चालत नाही जेव्हा एखादा मनुष्य चर्चमध्ये येतो तेव्हा तो नम्र हृदयाचा असायला हवा.

आजच्या शुभवर्तमानामध्ये आपल्याला उदाहरण आहे ते म्हणजे जकात दाराचे त्यांनी स्वतःला नमवले म्हणून परमेश्वराने त्याला उंचावले देव हा महान व सर्वज्ञ आहे. देव आपल्यासाठी जे काही चांगले ते करत असतो. जकात दाराला त्याच्या अपात्रत्रेचा उदय देवाच्या पवित्रतेचा अनुभव होता. त्यामुळे त्यांनी प्रार्थना करताना डोके वर करून पाहिले नाही, तर प्रामाणिकता  व नम्रता दाखविली. त्यामुळे देवाची कृपा व आशीर्वाद मिळाला. आजच्या पवित्र मिस्साबलीदांनात आपण सगळ्यांसाठी प्रार्थना करूया की आपण गर्विष्ठ होऊ नये अहंकारी होऊ नये तर नेहमी नम्र  व्हावे जेणेकरून देव आपल्या प्रार्थनेची जकात दाराप्रमाणे स्वीकार करेल आमेन.

 

प्रतिसाद:

 परमेश्वरा, करुणा करा, आमची प्रार्थना स्वीकारा.

१) आपले पोप फ्रान्सिस सर्व कार्डिनल महागुरु धर्मगुरू व व्रतस्त ज्यांनी आपले आयुष्य प्रभू सेवेसाठी अर्पण केले आहे. त्यांना देवाची कृपा व आशीर्वाद मिळावा व त्यांनी देवाची स्वार्थ जगाच्या कानाकोपऱ्यात पसरवावी म्हणून प्रार्थना करूया.

२) जे युवक व युवती देवापासून दूर गेले आहेत व त्यांच्या जीवनामध्ये काही धैर्य नाही अशा सर्वांना देवाच्या प्रेमाचा स्पर्श व्हावा व ते देवाच्या अधिक जवळ यावेत म्हणून आपण प्रार्थना करूया.

३) जे लोक मानसिक व शारीरिक रित्या आजारी आहेत. देवाने त्यांना स्पर्श करावा व ते लवकर बरे व्हावे म्हणून आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करूया.

४) जे लोक देवापासून दूर गेलेले आहेत व त्यांना जगाच्या ऐहीक वस्तूमध्ये आनंद मिळतो अशा लोकांना सर्व काळाचा नाही तर तो क्षणभंगुर आहे याची जाणीव व्हावी व त्यांनी देवाच्या सानिध्यात जास्तीत जास्त वेळ घालवावा म्हणून प्रार्थना करूया.

५) जे मुले अनाथ आश्रम मध्ये आहेत व ज्या  मुलांना आई-वडिलांनी सोडून दिले आहेत त्यांची परमेश्वराच्या मायेच्या पंखाखाली वाढ व्हावी व उदारमतवादी आश्रयदात्यांनी त्यांचे आश्रयस्थान बनावे म्हणून प्रार्थना करूया.

६) थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक व कौटुंबिक हेतूसाठी प्रार्थना करूया.

 


No comments:

Post a Comment