Reflections for the Homily on Feast of Epiphany (03/01/2016) By: Sadrick Dapki.
प्रकटीकरणाचा
सण
दिनांक: ०३/०१/२०१६
पहिले वाचन: यशया ६०:१-६
दुसरे वाचन: इफिसिकारंस पत्र
३:२-३अ, ५-६
शुभवर्तमान: मत्तय: २: १-१२
‘ताऱ्याने
दाखविले बाळ येशू’
प्रस्तावना:
आज आपण ‘प्रकटीकरणाचा
सण’ साजरा करीत आहोत. आजची तिन्ही वाचने आपणास येशू ख्रिस्त हा राजांचा राजा आहे व
तो आपले तारण करावयास आला आहे ह्या रहस्याबद्दल सांगत आहे.
आजच्या पहिल्या वाचनात यशया संदेष्टा भाकीत
करतो की, ‘अनेक राष्ट्रे देवाचा जयजयकार करण्यासाठी येतील व त्याच्यापुढे नतमस्तक
होतील’. दुसऱ्या वाचनात संत पौल आपणास सांगतो की, ‘देवाची गुपित योजना व त्याचे
रहस्य ज्याची आपण वर्षानुवर्षे वाट पाहत होतो ती येशू ख्रिस्त येण्याने परिपूर्तीत
झाली आहे’.
तर शुभवर्तमानात संत मत्तय आपणास सांगतो की,
तीन ज्ञानी लोक पूर्वेकडून ताऱ्याचा पाठलाग करत येशू बाळाचे दर्शन घेण्यासाठी
येतात. त्या तीन ज्ञानी लोकांनी आकाशात ताऱ्याचे चिन्ह पाहून येशू ख्रिस्ताचा शोध
केला आणि त्यांस ख्रिस्त बाळ सापडला. आपल्या जीवनात आपण सुद्धा येशू ख्रिस्ताचा
शोध घ्यावा व त्याचे दर्शन आपणा प्रत्येकाला व्हावे म्हणून ह्या मिसाबलीदानात परमेश्वराकडे
विशेष प्रार्थना करूया.
सम्यक विवरण
पहिले वाचन: यशया ६०:१-६
यशया संदेष्टा
हा भाकीत करणारा संदेष्टा होता. येशू ख्रिस्ताबद्दल व त्यास निगडीत असणाऱ्या
दुसऱ्या बाबिंबद्द्ल यशया संदेष्ट्याने भाकीत केले आहे. कुमारी मरिया गर्भवती
होण्याची व येशू ख्रिस्त जन्माला येण्याची भाकिते यशया संदेष्ट्यानेच केलेली आहेत.
आजच्या उताऱ्यात
सुद्धा यशया संदेष्टा भाकीत करतो की, ‘अनेक राष्ट्रे येशूचा जयजयकार करण्यासाठी
येत आहेत. ‘अनेक राष्ट्रे’ म्हणजे ‘तीन मागी लोक’ जे दुसऱ्या राष्ट्रांतून
राजांच्या राजास जयजयकार करण्यासाठी आले होते. यशया संदेष्टा सियोनीकरांस उत्तेजून
सांगत आहे की, “उठा, प्रकाशमान व्हा, कारण प्रकाश तुमच्याकडे आला आहे” (यशया ६०:१).
‘तुमचा प्रकाश’ हा ‘देवाच्या ऐश्वर्याबद्दल’ सूचित करतो. यशया पुढे म्हणतो, ‘तुमचे
डोळे वर करून चोहोबाजूंकडे पाहा! तुमचे पुत्र बंदिवासातून परत येत आहेत. तू त्यांस
पाहून आनंदित होणार कारण ते उंटावर बसून धन-संपत्ती, सोने व उद घेऊन येत आहेत. आणि
आज मागी लोक उंटावर बसून सोने, उद व गंधरस घेऊन आले.
दुसरे वाचन: इफिसिकारंस पत्र ३:२-३अ,
५-६
परराष्ट्रीयांना
ख्रिस्ताचा आशीर्वाद आणण्याकरिता पौल ख्रिस्ताचा बंदिवान झाला आहे. संत पौल हा
रोमी तुरुंगात बंदिवान असताना इफिसिकारंस पत्र लिहितो व देवाची सुवार्ता पसरवितो.
संत पौल म्हणतो, ‘तुम्ही कदाचित् ऐकलेले असेल की देवाने त्याचा आशीर्वाद
तुमच्यापर्यंत पोहचविण्याचे काम माझ्याकडे सोपविले आहे. ह्याच्यावरून आपणास असे
स्पष्ट होते की, ‘देवाच्या योजना पौलाला प्रगट झाल्या आहेत. तो आपल्या मनातले काही
विचार सांगत नव्हता. तो सत्य सांगत होता. देवानेच त्याला ही सत्ये प्रगट केली’.
संत पौल हा ख्रिस्तासमवेत नव्हता तरीपण तो आज
प्रेषित म्हणून गणला जातो. कारण येशू ख्रिस्ताने देवाच्या योजना त्याच्यामध्ये
प्रगट केल्या होत्या. देवाने त्याला अतिमानवी ज्ञान बहाल केले होते आणि हे ज्ञान
पूर्ण व उत्कृष्ट होते. पूर्ण कारण ख्रिस्ती रहस्ये त्यास प्रगट केली होती आणि
उत्कृष्ट कारण हे शिष्यांना सुद्धा असाधारण होते.
शुभवर्तमान: मत्तय २:१-१२
मत्तयलिखित
शुभवर्तमानात येशूच्या जन्मानंतर लगेच मागी लोकांच्या भेटीची नोंद केलेली आहे.
मागी लोकांनी पूर्वेस एक तर उगवताना पहिला, त्यांनी त्या ताऱ्याचा अभ्यास केला
कारण ते खगोल शास्त्रज्ञ होते. जेव्हा त्यांस कळले की तो तर यहुदियांचा राजा जो
जन्माला येणारा आहे त्याचा आहे, तेव्हा ते लगेच त्या ताऱ्याच्या शोधात निघाले व
राजांचा राजा येशू ख्रिस्त ह्यास नमन करावयास येरुशालेमेत आले.
ते मागी लोक
पहिले हेरोद राजाकडे गेले व त्याच्याकडे यहुदियांच्या राजाच्या जन्मा विषयी
विचारपूस केले; ‘यहुदियांचा राजा कुठे जन्माला आला आहे?’ हे एकून हेरोद राजा
घाबरून गेला कारण हेरोद हा इस्राएल लोकांच्या वंशातील नव्हता. ख्रिस्त जन्माला
येणार आहे याची हेरोद्ला कल्पना होती व तो कोठे जन्मेल हे जुन्या करारात मिखा
संदेष्ट्याने अगोदरच लिहिले होते. मिखा संदेष्टा म्हणतो की, “त्याचा जन्म बेथलेहेम
गावात होईल” (मिखा ५:२). ख्रिस्ताला नमन करण्याचे कारण सांगून त्याला ठार करण्याचा
निश्चय हेरोद्ने तेव्हाच केला.
जेव्हा मागी लोक
बाळ येशूला गव्हाणीमध्ये बघतात तेव्हा त्यांना फार आनंद होतो. ते प्रत्यक्षात
त्याचापुढे शरण जाऊन त्याला नमन करतात व त्यांनी आणलेल्या भेट वस्तू: सोने,
सुवासिक उद व गंधरस त्यास अपर्ण करतात.
बोधकथा:
एकदा काही कोळी
बांधव मासळी पकडण्यासाठी खोल समुद्रात गेले होते. तेव्हा आकाशवाणीवर अशी बातमी आली
की थोड्या वेळानी मोठे वादळ होण्याची शक्यता आहे, म्हणून सर्व कोळी बांधवांनी
समुद्रात जाऊ नये. हे एकूण घरची माणसे घाबरली आणि विचारात पडली की जे आता समुद्रात
गेलेले आहेत त्यांना बोलवायचे कसे.
रात्र झाली आणि
अचानक वारा वाहण्यास सुरवात झाली. थोड्या वेळांनी त्या वाऱ्याचे रुपांतर वादळात
झाले, समुद्र खवळला, मोठ-मोठ्या लाटा फुटू लागल्या. रात्र झाल्यामुळे कोळी लोकांना
समुद्राच्या लाटांशिवाय दुसरे सर्व काही दिसेनासे झाले. काही वेळांनी त्या कोळी
बांधवांनी एक मोठा दिवा पहिला व असे सूचित केले की कदाचित तिथे किनारा आहे. आपण
आपली नाव त्या दिशेने वळून व सुखरूप समुद्र किनारी पोहचू.
भल्या पहाटे
जेव्हा ते समुद्र किनाऱ्याकडे पोहचले तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. कारण
ते आपल्याच किनारी पोहचले होते आणि जेव्हा मोठ्या दिव्या बद्दल विचारले तेव्हा
लोकांनी उत्तर दिले. ‘तुम्हांस दिशा मिळावी व सुखरूप समुद्र किनारी पोहोचावे
म्हणून एक महिलाने तिच्या झोपडीला आग लावली होती. तिच्या ह्या बलिदानामुळे तुम्ही
सुखरूप येथे पोहोचलात.
मनन-चिंतन:
होय माझ्या प्रिय
बंधू-भगिनींनो कोळी बांधव दिव्याच्या दिशेने आले आणि त्यांस जीवनदान प्राप्त झाले.
तसेच मागी लोकांनी तर पहिला त्याचा खगोल अभ्यास केला, त्याच्या शोधात निघाले. म्हणूनच
राजांचा राजा येशू ख्रिस्त त्यांस सापडला. कोळी लोकांना जसा दिव्याने दिशा दाखवली
तसेच मागी लोकांस ताऱ्याने तारणारा दाखवला. ते मागी लोक आनंदित झाले, त्यांनी येशू
बाळाला नमन करून आणलेल्या भेट वस्तू त्यास अपर्ण केल्या.
तारा हा
विश्वासाचे प्रतिक म्हणून संबोधित केले जाते आणि हे प्रतिक पूर्वेकडून आलेल्या
मागी लोकांच्या विश्वासाचे प्रतीनिधित्व करते. हे मागी लोक खूप अंतरावरून प्रवास
करून येतात. आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, त्या काळचा प्रवास आजच्या
प्रवासारखा नाही. त्याकाळी नीट रस्ता नव्हता किंवा नकाशा नव्हता आणि अशा सुविधांचा
अपवाद असून सुधा हे मागी लोक उंटाच्या पाठीवर बसून प्रवास करतात. परंतु त्यांचा
शोध व्यर्थ जात नाही. शेवटी ते नेमक्या जागेवर पोहोचतात. जेव्हा मागी लोक येशू
बाळाला बेथलेहेम गावात गाईच्या गोठ्यात पाहतात तेव्हा त्यांना कळून चुकते की
त्यांनी एकच खरा देव येशू ख्रिस्ताच्या रुपात पहिला आहे. त्यांनी जगाचा तारणारा
पहिला व आनंदित झाले आणि आणलेल्या भेटवस्तू: सोने, उद आणि गंधरस अपर्ण केले.
सोने हे ऐश्वर्य
व श्रीमंतीचे प्रतिक आहे, तसेच ते कधीच नाश न पावणारे आहे. अशी ही मौल्यवान वस्तू
असण्याची परिस्थिती फक्त श्रीमंताकडेच असायची. हे सोने मागी लोक येशू बाळाला अपर्ण
करतात कारण हे सोने येशू ख्रिस्त हा राजांच्या राजा आहे असे चिन्हांकित करते. हा
राजा विश्वाचा निर्माता, प्रभूचा प्रभू आहे असे त्यांना कळून चुकले होते. मागी
लोकांना येशू ख्रिस्ताच्या राजेपणाची जाणीव झाली आणि त्या महान राजाचे या जगात
स्वागत केले. जरी येशू ख्रिस्त राजा असला तरी आपणास ठाऊक आहे की त्याने आपल्या
राजेपणाची कधीच बढाई मारली नाही परतू विनयशील राहून आपल्या पवित्र पित्याचे कार्य
पूर्ण केले.
येशू बाळास
दुसरी भेटवस्तू दिली होती ती म्हणजे ‘उद’. उद हे एक प्रकारची धूप आहे, जिचा फक्त
विशेष कारणासाठी वापर केला जातो. हे धूप एक प्रकारच्या झाडापासून काढले जाते, आणि त्या धूपमध्ये
वेगवेगळ्या प्रकारचा सुगंध येत असतो. हे धूप वेगवेळ्या धर्मामध्ये फक्त देवालाच
अपर्ण केले जाते. ह्यावरून आपणास कळते की येशू बाळ हा ‘ख्रिस्त’ (तारणारा) आहे. तो
सार्वकालिक देव आहे आणि म्हणूनच फक्त त्याचीच आराधना केली पाहिजे. सोने ज्याप्रमाणे
येशू ख्रिस्ताचे राजेपण दर्शविते तसेच उद सुद्धा त्याचे देवत्व दर्शविते.
तिसरी भेटवस्तू
म्हणजे ‘गंधरस’. गंधरस हा एक द्रव पदार्थ आहे जो मृत शरीर जतन करण्यासाठी वापरला
जातो, जेणेकरून मृत शरीराचा दुर्गंध येण्यास व ते कुजण्याचे टाळण्यास मदत होते.
आपण कदाचित
आश्चर्य चकित होऊ शकतो किंवा गोंधळात पडू शकतो की अशी भेटवस्तू जी मरण पावल्यावर
दिली जाते ती येशू बाळाच्या जन्माच्या वेळी त्या तीन राजांपैकी एका राजाने का
दिली? सोने व उद हे येशू ख्रिस्ताचे ऐश्वर्य व देवत्व दर्शविते; मग गंधरस का? तो
अशासाठी की, ‘येशू ख्रिस्त हा आपल्या तारणासाठी व पापांतून मुक्त करण्यासाठी आला
होता. असे करण्यासाठी त्याला स्वताला क्रुसावर मरण पत्कारावे लागले.
प्रिय बंधू-भगिनिंनो
जर आपणास आजच्या दिवसाचे सार्थ कळायचे असेल तर सर्व प्रथम आपण मागी लोकांचे उदाहरण
आपल्या डोळ्यासमोर आणूया ज्यांनी विश्वासाने ताऱ्याकडे पाहून येशू बाळाचा शोध
लावला व तो त्यांस सापडला. आब्राहामाने सुद्धा देवावर विश्वास ठेवला म्हणून त्यास विश्वासू
पिता म्हणून नेमून दिले आणि संपूर्ण राष्ट्रे त्याचा नावाखाली केली. म्हणून अशा
प्रकारे आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की हे सर्व करण्यासाठी आपणामध्ये
विश्वास असणे गरजेचे आहे. कारण देव आपल्याला अनेक चिन्हांद्वारे त्याचाकडे
येण्याचा मार्ग दाखवीत असतो. हा देवाचा मार्ग आपणास दाखवण्यासाठी ख्रिस्त आज
जन्मला आहे आणि तोच आपला मार्ग, सत्य व जीवन आहे.
विश्वासू
लोकांच्या प्रार्थना
प्रतिसाद: हे
प्रभू, आम्हांला तुझे दर्शन घडव.
१. ख्रिस्त सभेची धुरा वाहणारे आपले
पोप महाशय, बिशस्प, धर्मगुरू व तसेच धर्म-भगिनी ह्यांना देवाचे प्रेम, द्या व
शांती इतरांपर्यंत पोहचवण्यासाठी कृपा व शांती लाभावी म्हणून आपण प्राथर्ना करूया.
२. प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीने देवाची
मुळे म्हणून जीवन जगावे व ख्रिस्ताच्या व वचनांचे आज्ञाधारकपणे पालन करून देवाच्या
इच्छेला प्रथम प्राधान्य द्यावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
३. आज जगात अशांतता असल्यामुळे वैरीपणाचे
वातावरण निर्माण झाले आहे. म्हणून जगात शांती पसरावी व एकात्मतेचे वर्चस्व स्थापन
व्हावे म्हणून आपण प्राथर्ना करूया.
४. हे नवीन वर्ष चांगले,
सुखा-समाधानाचे, शांतीचे व भरभराटीचे जावे म्हणून आपण प्राथर्ना करूया.
No comments:
Post a Comment