Reflection for the Good Friday (18/04/2025) By Br. Criston B. Marvi
शुभ-शुक्रवार
दिनांक: १७/०४/२०२५
पहिले वाचन: यशया ५२:१३-५३:१२.
दुसरे वाचन: इब्रीलोकांस पत्र ४:१४-१६, ५:७-९.
शुभवर्तमान: योहान १८:१-१९:४२.
प्रस्तावना:
आज आपण प्रभुच्या
दुःखसहनाचा शुक्रवार साजरा करत आहोत ज्याला शुभ शुक्रवार असे म्हटले जाते.
प्रभुने मानवाच्या
तारणासाठी दुःख व मरण पत्करले व आम्हाला पुनरुत्थानाचा मार्ग दाखवला. ह्याच प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या अति पवित्र पाण्याने व अति पवित्र रक्ताने
पापी मानवाची मुक्तता करून संपूर्ण मानव जातीला तारण प्राप्त करून दिले.
आजच्या या मंगल
विधीसाठी आपण एकत्र जमलेलो असताना आजच्या या तीन विधीमध्ये भक्ती भावाने सहभाग
घेऊया.
भाग पहिला प्रभू शब्द वधी. येथे आपण सामान्य व
विविध हेतूनसाठी प्रार्थना करणार आहोत.
भाग दुसरा पवित्र क्रुसवंदना. दुसऱ्या भागात
दोन प्रकार आहेत. पहिला प्रकार
क्रुसदर्शनाचा व दुसरा प्रकार
क्रुसवंदनाचा.
भाग तिसरा. ह्या तिसऱ्या भागात पवित्र ख्रिस्त शरीर वाटप केले
जाईल.
म्हणून आजच्या या
पवित्र विधीत भक्तीभावाने व प्रार्थनामय वातावरणात सहभाग घेऊया व प्रभूयेशुच्या दुःखसहनात सामील होऊया
“मला तहान लागली आहे”
आजच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखसहनात आपण ऐकले की, येशू ख्रिस्ताने क्रुसावरून उच्चारलेल्या शेवटच्या सात शब्दांपैकी एक शब्द तो म्हणजे ‘मला तहान लागली आहे’. दोन हजार वर्षा अगोदर
कदाचित येशू ख्रिस्ताला पाण्याची तहान लागली असेल. परंतु
प्रिय बंधू भगिनीनो आजही हेच शब्द आपण ऐकत आहोत. तर खरोखर आजही येशू
ख्रिस्ताला पाण्याची तहान लागलेली आहे, की दुसरी कुठली
तहान लागली आहे? ह्यावर खरोखर आपण आज मनन चिंतन करायला हवे.
येशू ख्रिस्त
जेव्हा तहानलेला होता तेव्हा त्याने याकोबाच्या विहिरीजवळ येऊन समारिया स्त्री कडे पिण्यासाठी पाणी मागितले (योहान ४:५). यावरून आपल्याला
दिसून येईल की मानव या कारणाने येशूला शारीरिक तहान लागली होती. अनेक अशे कष्ट, यातना सहन केल्यावर व थकलेल्या व भागलेल्या येशूला पाण्याची तहान लागली असावी. हाच येशू जेव्हा वधस्तंभवर होता तेव्हा तो पाण्याच्या थेंबासाठी व्याकुल झाला
असावा म्हणून त्यांने म्हटले असावे “मला तहान लागली आहे”. आज सुद्धा येशू वधस्तंभावर असताना म्हणत असेल की, मी तहानलेला आहे. कारण आजच्या आधुनिक
जगात आपण पाहतो की, पाण्याचा गैरवापर
खूप प्रमाणात होत आहे. पाणी वाया घालवले
जाते. बऱ्याच ठिकाणी पाण्याची कमतरता आहे. तसेच पाणी दुषित केले जाते. व त्याच पाण्याच्या अभावामुळे अनेकांचे तहानेने जीव जात आहेत. अशा लोकांची तहान कोण भागवणार? फक्त येशू ख्रिस्तच की जो जिवंत
पाण्याचा झरा आहे. त्याच्याच सेवनाने
प्रत्येकाची खरी तहान तृप्त होणार. परंतु तोच येशू ख्रिस्त आज तहानलेला आहे व कशासाठी? तसेच कसली ही तहान असावी? येशूला आध्यात्मिक तहान लागली होती.
जर का आपण लूकलिखित
शुभ वर्तमानात (२३:४३) पाहिले तर आपल्याला समजून येते की, येशू ख्रिस्त क्रुसावर टांगलेला असताना त्याने त्याच्या उजव्या हाताकडील
चोराला म्हटले, “मी तुला खचित सांगतो की, आज तू माझ्याबरोबर स्वर्गात असशील” आणि त्याच्यानंतर आपण योहानाच्या शुभ वर्तमानात पाहतो (१९:२८) येशू ख्रिस्ताचे शब्द “मला तहान लागली आहे”. एकदम शेवटच्या घटकेपर्यंत येशू ख्रिस्त आपल्यासाठी तहानलेला आहे जेणेकरून आपण आपल्या पापांची कबुली देऊन देवाकडे वळावे म्हणून येशू ख्रिस्त आपल्याला पश्चाताप करण्यास बोलावत आहे.
आजही येशू
ख्रिस्ताला तहान लागत आहे. आज आपण जगात पाहतो की उष्णता वाढत आहे. जमीन कोरडी होत आहे. परंतु आपण जेव्हा उष्णता
म्हणतो तेव्हा कसली ती उष्णता असेल हे सर्वप्रथम आपण स्वतःला विचारायला हवे. ती सूर्याची उष्णता असेल की आपल्या पापांची उष्णता असेल? आणि जेव्हा आपण कोरडी जमीन म्हणतो तेव्हा कोणती ती कोरडी जमीन असेल? शेतातली कोरडी जमीन की चर्च मधली कोरडी जमीन, जिकडे आपल्या पापांमुळे आपण चर्च मध्ये जात नाही किंवा कामामध्ये मग्न राहून देवापासून दूर जातो. येशू ख्रिस्त वधस्तंभावार असताना म्हणाला, “मला तहान लागली आहे”. येशू ख्रिस्ताला पापी लोकांच्या आत्म्याची तहान लागली होती.
आणि आपल्याला देवाच्या भेटीची तहान लागली पाहिजे. येशू ख्रिस्त मानवाच्या तारणासाठी तहानलेला होता. आजही प्रभू येशू
मानवाची मुक्ती व्हावी त्याचे खरे तारण व्हावे म्हणून पापी मनुष्याच्या शोधात आहे.
दोन हजार वर्षा अगोदर कदाचित येशू ख्रिस्ताला पाण्याची तहान लागली असेल परंतु मानव ती तहान तृप्त करू शकला नाही. कारण मानवाला पापांची तहान लागली होती. म्हणून तो
देवापासून दूर गेला आणि देवाच्या पुत्राची तहान तृप्त करू शकला नाही. आजही येशू
ख्रिस्ताला तहान लागली आहे. व ती मानवाच्या पश्चातापाची आहे. आज मानव काय करत आहे हे मानवाला सुद्धा कळत नाही म्हणूनच येशू ख्रिस्त वधस्तंभावरून उच्चारून सांगतो की, “हे बाबा त्यांना
क्षमा कर कारण ते काय करत आहे हे त्यांना समजत नाही” (लूक २३:३४).
माझ्या प्रिय बंधू भगिणीनो येशू ख्रिस्ताला लागलेली मानवाच्या पश्चातापाची- क्षमेची तहान आपण कशाप्रकारे भागवू शकतो? यावर आपण मनन चिंतन
करूया.
ही तहान भागवण्यासाठी आपल्याला एका दूरवर तिर्थस्थानात जाऊन भेट
देणे किंवा एखाद्या गरीब व्यक्तीला दान देऊन करणे नाही, तर आपल्या स्वतःच्या घरात, कुटुंबात, आपल्या स्वतःच्या परिवर्तनाने आपण ही तहान भागवू शकतो. आज देवाला आपल्या परिवर्तनाची गरज आहे. जेव्हा आपण आपल्या जीवनाचे परिवर्तन करू तेव्हाच आपण देवाच्या सानिध्यात राहू
शकतो.
देवाला प्रसन्न करण्याचा मार्ग म्हणजे स्वतःचे परिवर्तन करणे आहे. देव आम्हा सर्वांवर प्रेम करतो कारण देव प्रेम आहे. देवाचे प्रेम हे पाण्यासारखे आहे. ज्याच्यामध्ये आपण पडू शकतो, आपण पोहू शकतो, आपण त्याच्यातून अनुभव घेऊ शकतो, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण त्याच्या विना राहू शकतच नाही. प्रिय भाविकानो देव त्याचे प्रेम हे तहानलेल्या मानवासाठी मोफत देत असतो परंतु मानव हा नेहमी तहानलेला राहणे पसंत करतो. म्हणून आजच्या या प्रभूयेशूच्या दुःखसहनात सहभाग घेताना देवाचा अस्सिम प्रेमाचा अनुभव घेऊया व आपल्या स्वतःच्या परिवर्तनाने देवाच्या अधिका अधिक जवळ राहून त्याची तहान भागवण्यास तत्पर राहूया.
No comments:
Post a Comment